मनुष्यबळ खात्याची दिवाळखोरी
Category:
अवर्गिकृतमनुष्यबळ विकास खात्याने विश्वनाथन आनंदला डॉक्टरेट देण्याच्या प्रक्रियेत नागरिकत्त्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. स्पेनमध्ये राहत असल्याने तो भारतीय नागरिक नसल्याचा जावईशोध या खात्याने लावला. केंद्रिय मंत्री कपिल सिब्बल यांनी आनंदची माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकला असला तरी एकूणच खेळाडू आणि क्रीडासंस्कृती याबाबत आपल्याकडे केवढी मोठी उदासिनता आहे, हे नव्याने पहायला मिळाले.
September 20, 2010