साहित्य - ललित

मराठी भाषाभिमान्यांसाठी मार्गदर्शक ग्रंथ : भाषाशुद्धीचे व्रत!

Category:

 

कोणताही समाज हा राष्ट्राभिमानी होण्यासाठी तो प्रथम स्वभाषाभिमानी असावा लागतो. स्वभाषाभिमानाविषयी महाराष्ट्राची, तसेच राजभाषा मराठीची स्थिती काय आहे, हे सर्व जण जाणतात. बहुतांश मराठी जनांकडून दहा शब्दांच्या एका वाक्यात इंग्रजी, अरबी, फारसी आदी परकीय भाषांतील एक-दोन शब्द सहजपणे वापरले जातात. अन्य भाषेतील शब्दांची सरमिसळ करून मराठीत बोलणार्‍या किंवा ते बोलणे ऐकणार्‍या मराठी माणसाला त्याची खंतही वाटत नाही. राजकीय लाभासाठी मराठीची ढाल पुढे करणारे पुष्कळ आहेत, मराठीसाठी वर्षातून एकदा होणार्‍या साहित्य संमेलनात गळा काढणारेही उदंड आहेत; पण खरोखर मराठी जिवंत ठेवण्यासाठी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा स्तर (दर्जा) देण्यासाठी झटणारे मराठीप्रेमी अल्प आहेत. सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत आठवले हे या अल्प मराठीप्रेमींपैकीच एक आहेत. प.पू. डॉ. आठवले यांनी मराठी भाषेच्या रक्षणासाठी `भाषाशुद्धीचे व्रत’ या एका मार्गदर्शक ग्रंथाची निर्मिती करून मराठी भाषेच्या रक्षणाची चळवळ अत्युच्च वैचारिक स्तरावर पोहोचवली आहे. प.पू. डॉ. आठवले हे अध्यात्मक्षेत्रातील सर्वश्रुत नाव. अध्यात्माशी निगडित १६० हून अधिक ग्रंथांचे लिखाण त्यांनी केले आहे. थोर विभूतींनी निर्मिलेले वाङ््मय सर्वच दृष्टीकोनांतून मौलिक असते. म्हणूनच डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या `भाषाशुद्धीचे व्रत’ या ग्रंथाच्या माध्यमातून `मराठी भाषाशुद्धीच्या चळवळीला अध्यात्माचा स्पर्श झाला’, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

  April 16, 2010


रामदास बंडू आठवले
व्यक्ती-परिचय

रामदास बंडू आठवले

Category:

 

रामदास बंडू आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ह्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्री आहेत.

  April 15, 2010


अवर्गिकृत

धर्मांतर

Category:

 

प्रत्येक धर्म आणि धर्माची शिकवण पवित्र असते. धर्म हा व्यक्तिगत असतो. त्यामागे त्या व्यक्तीची श्रद्धा आणि विश्वास असतो. समधर्मीय व्यक्तींना एकत्रित आणण्याचा तो एक धागा असतो. धर्म मानणे, धर्माचे संस्कार मानणे, ती शिकवण व्यवहारात पाळणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. ही एक खोलवर जपलेली श्रद्धा आहे.

  April 15, 2010


लेखसंग्रह

मुंबईची दैना

Category:

 

आज मुंबई अस्वस्थ आहे. काय करावे हे तिला सुचत नाही. कसे जगावे हे उमजत नाही. कोणाला सांगावी तिची व्यथा? कोणाकडे मांडावी तिची कथा? जगासाठी ती या देशाची आर्थिक राजधानी आहे. एक महानगरी आहे. पण काय आहे आता तिच्याकडे?

  April 15, 2010


व्यक्ती-परिचय

रंजना देशमुख

Category:

 

१९७०-८०च्या दशकांत अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांमधून रंजना देशमुखांनी विविधांगी भुमिका साकारल्या. रंजना देसमुख यांचे इतर प्रमुख चित्रपट म्हणजे ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘जखमी वाघीण’, ‘भुजंग’, ‘एक डाव भुताचा’, आणि ‘चानी’

  April 14, 2010


व्यक्ती-परिचय

सयाजी शिंदे

Category:

 

दाक्षिणात्य चित्रपटात त्याने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून अभिनयाची हुकूमत गाजवली.त्यांनी जोडी नंबर १ आणि सरकार राज सारख्या अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केले आहे. त्यांनी बिग ब्रदर, जॅकपॉट,देवधर गांधी, दिशा, वास्तुशास्त्र, परवाना,दानव, लाल सलाम अशे अनेक हिट सिनेमे आपल्या अभिनयाने गाजवले.

  April 14, 2010


व्यक्ती-परिचय

विक्रम गोखले

Category:

 

दिग्दर्शक प्रत्येकाला त्याच्या सवडीनुसार स्वतंत्र तालीम देऊन नाटक (कसेबसे) उभे करतो. अशा जमान्यात नाटकाचा सखोल आणि सर्वागीण विचार संभवणे अवघडच; परंतु काही मोजके नट याला अपवाद आहेत. त्यापैकी एक : विक्रम गोखले!

  April 14, 2010


आनंदराव विठोबा अडसुळ
व्यक्ती-परिचय

आनंदराव विठोबा अडसुळ

Category:

 

शिवसेनेचे खासदार. माजी केंद्रिय अर्थ राज्यमंत्री, सहकारी बॅंकांच्या युनियनचे नेते.

  April 14, 2010