लेखसंग्रह

वजन कमी करण्यासाठी मोलाच्या आयुर्वेदिक टिप्स

Category:

 

आयुर्वेदिक म्हटल्या बरोबर आपल्या मनात प्रथम येतं “परिणाम हळू होत असला तरी साईड-इफेक्ट नसतात”. आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल. वर्षानुवर्ष सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांत हे त्रिकालाबाधित सत्य आहेत.

  November 21, 2009


लेखसंग्रह

विरोधाभासात बुडाला विकास!

Category:

 

सरकारी शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांविना ओस पडत आहेत आणि खासगी शिकवणी वर्ग दुथडी भरून वाहताना दिसतात, हा विरोधाभास नाही का?

भारतासारख्या प्रचंड मनुष्यबळ आणि नैसर्गिक साधनसंपत्ती लाभलेल्या देशाचा विकास इतका का रखडला किंवा आपण अजूनही विकसनशील अवस्थेतच का आहोत, हा प्रश्न खरोखरच रहस्यमय म्हणावा लागेल. या संदर्भात भारताची तुलना नेहमीच चीनसोबत केली जाते आणि ती स्वाभाविकही आहे.

  November 15, 2009


लेखसंग्रह

फायदेशीर काय? धंद्याच्या सुरुवातीला भांडवल जास्त असणं का कमी असणं?

Category:

 

एकदा एक युवक एका उद्योगपतीला भेटला आणि त्यांना म्हणाला ‘मला धंदा करायचा आहे. पण माझा खिसा रिकामा आहे मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे’.तो उद्योगपती त्याला म्हणाला, ‘तुझा खिसा रिकामा आहे याची तू चिंता करुच नकोस. तुझं डोकं अथवा हृदय रिकामं असेल तर तो मात्र चिंतेचा विषय ठरेल.

  November 12, 2009


लेखसंग्रह

लोकशाहीची लक्तरे!

Category:

 

राजकारणी आणि बड्या नोकरशहांमध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भात साटेलोटे असतात, ही बाब जगजाहीर असली तरी यावेळी राजकारणी मंडळींनी मलईदार खात्यांसाठी जो जाहीर तमाशा मांडला तो लोकशाहीची उर्वरित लत्त*रे वेशीवर टांगणारा ठरला.त्यामुळे भविष्यात आता परीपूर्ण भ्रष्टाचाराकरीता जनतेने तयार राहावे हेच उत्तम.महागाई एवढ्यातच कमी होणार नाही, हे सांगुन शरद पवारांनी ह्याची पुष्टी केलीच आहे.

  November 8, 2009


लेखसंग्रह

घात सेनेचा झाला की मराठी माणसाचा?

Category:

 

शिवसेनेकडून सातत्याने वापरल्या गेलेल्या मराठी माणसाने संधी मिळताच आपली खरी ताकद दाखवून दिली. आज राज ठाकरे सेनेसोबत असते, राणे, भुजबळांना बाळासाहेबांनी बाहेर पडू दिले नसते तर राज्यातील चित्र वेगळे दिसले असते; परंतु दुर्दैवाने केवळ उद्धवचे भले पाहताना बाळासाहेबांनी सेनेच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या भल्याकडे साफ दुर्लक्ष केले. शेवटी बाळासाहेबांना आपला मुलगा शिवसेनेपेक्षा, मराठी माणसाच्या हितापेक्षा अधिक प्यारा वाटला, असेच म्हणावे लागेल.

  November 1, 2009


लेखसंग्रह

कलाकार

Category:

 

त्या भर उन्हात कर्जतच्या बाजारपेठेनं एका अस्सल कलावंताचा अभूतपूर्व असा उत्स्फूर्त आविष्कार पाहिला. त्या कलावंताला नव्हतं भान बाजारपेठेचं, तिथल्या गर्दीचं, नव्हतं भान कशाचं! तो नव्हता यशवंत दत्त, तर त्या क्षणी तो होता – अप्पासाहेब बेलवलकर, नटसम्राट!

  October 27, 2009


लेखसंग्रह

सत्पात्री दान

Category:

 

नुकतीच एक बातमी वाचली की मुंबईतील भिकारी दरवर्षी रुपये १८० कोटी कमावतात. काय हा दानशूरपणा! खरोखरच भीक मागणे हा सुध्दा एक मोठा उद्योगच झालेला आहे.

  October 27, 2009


लेखसंग्रह

कौल स्थिरतेला!

Category:

 

आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यात विशेष खबरदारी घेतली. शरद पवारांसारखा अतिकुशल रणनीतीकार आघाडीकडे होता. जनमानसाची नाडी अचूक ओळखण्याचे त्यांचे कसब शेवटी युतीला भारी पडले.

  October 25, 2009


साहित्य - ललित

हॅप्पी दिवाळी!!

Category:

 

सोनू, अगं उठ, आज दिवाळी, अशी उशीरा उठून कसं चालेल? आज लवकर उठायचं, पहाटे पहाटे अंगाला उटणं लावून गरम गरम पाण्यानं आंघोळ करायचा दिवस. हो, रोज जरी तू आंघोळ करत असलीस तरीही, आजची गोष्टच वेगळी. त्यात आज आपण लोकांना शुभेच्छा द्यायला जायचंय, हॅप्पी दिवाली असं म्हणायचंय. असं, काय करतेस, तुला मी शिवसेना किंवा मनसे चा अजेंडा उचलायला सांगितला नाहीये, आपण दिवाळीच्या शुभेच्छा, असं संकुचित मराठीत बोलायचं नाही, आपण धेडगुजरी समाजात रहात असल्याने, आपण हॅप्पी दिवाली असंच म्हणायचं!! चल आटप लवकर. आपण थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला जाऊ या मुंबईला.

  October 18, 2009


साहित्य - ललित

मेघमल्हार. . .

Category:

 

आज त्यांना कदाचित हा प्रसंग आठवणारही नाही. खरं आहे, अमृतवर्षावाला थोडंच माहित असतं, की, अमृत कुठं कुठं साडतं आहे. पण तो वर्षाव, त्या कणांना टिपण्याचं भाग्य लाभलेल्या आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्याला अमृतमय करतो!!

  October 16, 2009