निजसखया अनिरुद्धा !



|| हरि ॐ ||

ये जवळी घे जवळी
निजसखया अनिरुद्धा,
असशी मनात्मना तू,
राहसी का दूर दूर आता !

रे सुंदर श्रीगुरुक्षेत्री,
मुखचंद्र दर्शन तुझे
कवटाळीतो धुंद उरी,
ठेवितो डोई तुझ्या चरणी,
परी सेवा क्वचित करी,
शोभे न मम चित्ता !

निशिदिनी रागावूनी रुसुनी,
बघ किती जाती दिनी,
चरण स्पर्शासस्तव आतुर मी,
दुर्लभ का होता !

चमचमती लखलखती,
धर्मक्षेत्री दीप किती,
गरिबांची अंधारी झोपडी ही,
वाचतील कशी तुझी गाथा !

जगदीश पटवर्धन, बोरिवली (प.)

— जगदीश पटवर्धन

Author