यशाच्या पुढे समाधान आहे

काही गोष्टी मनावर बिंबवायलाच हव्यात. आजच्या पिढी समोर फक्त डर के आगे जीत हे हेच सातत्याने येत आहे. श्रम आणि चिकाटी असेल तर यश तुमच्या पायाशी लोळण घेतं.32 तासांच्या अतिशय जटिल शस्त्रक्रियेनंतर मेंदूतील ट्यूमर काढून टाकल्यानंतर, दोन शल्यचिकित्सक पूर्णतः थकून जमिनीवर पडले,तरीही विजयी भावनेने भारलेले होते. हा क्षण उच्च-जोखमीच्या प्रक्रियेचा शारीरिक आणि मानसिक ताण दर्शवतो, जिथे प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक निर्णय जीवन आणि मृत्यूमध्ये फरक करू शकतो.



काही गोष्टी मनावर बिंबवायलाच हव्यात. आजच्या पिढी समोर फक्त डर के आगे जीत हे हेच सातत्याने येत आहे. श्रम आणि चिकाटी असेल तर यश तुमच्या पायाशी लोळण घेतं.32 तासांच्या अतिशय जटिल शस्त्रक्रियेनंतर मेंदूतील ट्यूमर काढून टाकल्यानंतर, दोन शल्यचिकित्सक पूर्णतः थकून जमिनीवर पडले,तरीही विजयी भावनेने भारलेले होते. हा क्षण उच्च-जोखमीच्या प्रक्रियेचा शारीरिक आणि मानसिक ताण दर्शवतो, जिथे प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक निर्णय जीवन आणि मृत्यूमध्ये फरक करू शकतो.

मेंदूची शस्त्रक्रिया करणे म्हणजे अत्यंत अचूकता, अढळ लक्ष आणि अपार सहनशक्तीची कसोटी. तब्बल एका दिवसाहून अधिक काळ या शल्यचिकित्सकांनी थकव्याशी झुंज दिली, तासन्‌तास उभे राहून मेंदूच्या नाजूक संरचनांमधून अत्यंत काळजीपूर्वक मार्ग शोधला, ट्यूमर काढताना कोणतेही नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली. या शस्त्रक्रियेच्या प्रचंड कालावधीमुळे तिची गुंतागुंत स्पष्ट होते. कदाचित यामध्ये अनेक टप्पे, सूक्ष्म शस्त्रक्रियात्मक तंत्र आणि सतत रुग्णाच्या जीवनावश्यक चिन्हांचे निरीक्षण यांचा समावेश असतो.

थकव्याने जरी ते त्या क्षणी जमिनीवर पडले असले, तरी त्यामागे केवळ शारीरिक विश्रांती नव्हतीतर त्यांची समर्पित सेवा काय करू शकते याचा उत्तम वास्तुपाठ होता. प्रत्येक चमत्कारा मागे काहीतरी कहाणी असते. हवेत चमत्कार घडत नाहीत व हवेतून सोन्याची साखळीही काढता येत नाही.

यश मिळविण्याच्या नादात थकणं अपरिहार्य आहे. समाधानाचे विश्रांतीचे थांबे नसले तरीही, स्वतःहून त्याच्या स्वाधीन होऊन पुन्हा नव्याने कामाला लागणे हा यशाचा मार्ग आहे. नैराश्याचे अनेक थांबे असतात,आत्महत्या, खुणावत असतात. स्वप्नपूर्तीच्या आनंद स्वतःला समाधानात झोकून देण्यातच आहे. यशाचंही एव्हरेस्ट शिखर असतं ते पार केलं की समाधानाचे तेज चेहऱ्यावर येतं. यशाच्या क्रेझ पेक्षा समाधानच तेज आयुष्य जगताना आवश्यक असतं. कुठे थांबायचं हे कळलं की तो समाधानाचाच थांबा असतो. यश मिळवायला जसा वेळ लागतो तसेच समाधान भोगायलाही वेळ द्यायला हवा.

वेळच नाही म्हणणारी माणसे, शांत बसतच नाहीत, विचार करत नाहीत, शांत बसून आधी स्वतःचं शिल्प घडवायला हवं, स्वतःवर प्रेम करायला हवं. स्वतःमधील सुप्त गुण ओळखण्यासाठी सुद्धा वेळ हवा. आयुष्यासाच्या उत्तरार्धातच अनेकांचे सुप्तगुण बहरतात, कारण वेळ असतो.

वाचनापासून दूर गेलेली व सतत मोबाईल मध्ये व्यस्त असणारी तरुणाई स्वतःला वेळ कुठे देते? स्वतः विचार कुठे करते?स्वतःमध्ये काय आहे, काय उणीव आहे याचा विचार करण्यासाठी सुद्धा वेळ हवा, पण तो आज कुणाकडेच नाही. स्वतःमध्ये सुद्धा प्रचंड काही दडलेलं असतं, लपलेलं असतं ते फक्त शोधायला हवं व त्यासाठी स्वतःला वेळ द्यायला हवा. माणसांनी स्वतःला उसाप्रमाणे चरकात स्वतःला झोकून दिलं आहे आणि स्वतःचे निसत्व चिपाड करून घेतलं आहे.

छंद जोपासले तरच यशाची फळे चाखायला मिळतात. अनेकांना अनेक छंद असतात पण त्याला वेळ देणं, जोपासणं मनापासून ज्यांना जमलं तेच आयुष्यात यशस्वी झालें. वाचन हा अनेकांचा छंद असतो पण काय वाचलं किती आत्मसात झालं हे जसं अनुत्तरीत असतं तसंच गाणं गुणगुणनं हा छंद असला तरीही गाण्याला वेळ द्यायला हवा, रियाज करायला हवा तरच गाणं बहरतं. छिन्नी हातोड्या शिवाय जशी मूर्ती घडत नाही, तसंच छंदाला ही घडवावं लागतं.

मुलांना आज स्वतःला वेळ द्यायला पालक किती शिकवतात. ऊस चाकात घातल्याप्रमाणे ते आपल्या पाल्याला सतत अपेक्षाच्या ओझ्या खाली ठेवतात.

मुलावर अनेक गोष्टी लागल्या जातात त्यामुळे स्वतः मूल उमलत नाही. फुल जसं स्वतः स्वतःतून उमंलतं, तसं मुलांना उमलूच दिल जात नाही, त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अविष्कार होत नाही.लादण्या मुळे व्यक्तिमत्व गुदमरतं.

स्वतःच्या मुलाला अनेक पालक आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचं व्यासपीठ मानतात. मुलांच्या इच्छा मुलांच्या इच्छांचा विचार केला जात नाही. तुला काही कळत नाही या वाक्याने अनेक सुप्तगुण सुत्तावस्थेतच राहतात.

कुटुंबाच्या आणि शाळेच्या चार भिंतीत सुप्तगुण बहरत नाहीत. चोरून. लपवून अनेकांनी आपले सुप्तगुण विकसित केले म्हणून पुढे ते नावाजलें. शाळेत न जाणाऱ्या अनेकांनी आपल्यातल्या सुप्त गुणामुळे आपल्याला सिद्ध केलं आहे. कोणतीही चाकोरी विचारच करू देत नाही.

चाकोरी बाहेर, चौकटी बाहेर जे जगले त्यांनी स्वतःचे वेगळेपण सिद्ध केलं आहे. घाण्याच्या बैलाला स्वतःचे अस्तित्व कुठे असतं?

श्रमात सुद्धा आनंद असतो हे मुलांना कळण्यासाठी, श्रम आवश्यक आहेत श्रमप्रतिष्ठा आवश्यक आहे. पाल्यांना काहीच न करून देणाऱ्या हळव्या पालकांना आवरायला हवं. नदी पार करून शिकणाऱ्यांनी, दिव्याच्या खाली बसून अभ्यास करणाऱ्यांनी स्वतःला सिद्ध केलं. प्रवेश,परीक्षा ही आता पालकांची जबाबदारी झाल्यासारखं ते वागत आहेत. मुलं दहावीत असतात पण पालक दहावीत असल्यासारखं वागतात.

आई वडीलांना विचारून छंद पूर्ण होत नसतात. मुलांनी स्वतःला विचारून ठरवायला हवं, त्यासाठी त्यांना वेळ हवा. मोबाईल आजच्या मुलांना इतका व्यस्त ठेवतो की त्यांना विचार करायला, स्वतःवर प्रेम करायला वेळच देत नाही, मग सुप्तगुण ओळखणं व बहरणं तर दूरच राहिलं. शाळेत अभ्यासक्रमाच्या चरकात व कुटुंबात धाकाच्या चरकातातमुलांना पर्यायच ठेवला नाही.

पालक बदलले तरच मुलं बदलतील.यशस्वी की समाधानी याचा प्राधान्यक्रम ठरवता आला पाहिजे.

Author