“व्यक्तिमत्व घडविण्यात आईची भूमिका छिन्नी प्रमाणेच”

छिन्नी हे हरीश बोढारे यांचे दोन अंकी नाटक समाजातील वास्तवाचे दर्शन घडविते. छिन्नी शिवाय जशी सुंदर मूर्ती घडत नाही, तसेच माणसाला घडविण्यासाठी काही माणसांची केवळ उपस्थितीही आयुष्याला वेगळं वळन देते, जसे घाव घालून सुंदर मूर्ती अवतरतें, तसेंच.काही माणसें, छिन्नी प्रमाणे आपल्यावर योग्य संस्कार करून आपल्यातलं सुंदर व्यक्तिमत्त्व साकार करतात.छिन्नी दगडावर घाव घालून मूर्ती घडतें.



छिन्नी हे हरीश बोढारे यांचे दोन अंकी नाटक समाजातील वास्तवाचे दर्शन घडविते. छिन्नी शिवाय जशी सुंदर मूर्ती घडत नाही, तसेच माणसाला घडविण्यासाठी काही माणसांची केवळ उपस्थितीही आयुष्याला वेगळं वळन देते, जसे घाव घालून सुंदर मूर्ती अवतरतें, तसेंच.काही माणसें, छिन्नी प्रमाणे आपल्यावर योग्य संस्कार करून आपल्यातलं सुंदर व्यक्तिमत्त्व साकार करतात.छिन्नी दगडावर घाव घालून मूर्ती घडतें.

कलाक्रुती सुंदर घडली तरी दगडाला वेदना होतातच. दगडाला ही काही तक्रारी असतात. या नाटकात अशाच एका आईची गोष्ट सांगितली आहे जी छिन्नी प्रमाणे भूमिका बजावून आपल्या मुलांना घडवितें.

हरीष बोढारें यांनी ग्रामीण भागातील व गरीब कुटुंबातील जेवणाची भ्रांत असणाऱ्या कुटुंबाची कहाणी जशी दिसली तशी चितारली आहे. नाटकातील भाषा, संवाद यांना अलंकारिक व उपदेशाचा साज चढवला नाही.

विधवा आई प्रतिकूल परिस्थितीत आपल्या दोन्ही मुलांना सर्वोत्तम पुरुष म्हणून घडविते. तिच्या आक्रमक अट्टाहास असणाऱ्या महत्वाकांक्षेचा मुलांना त्रास होतो,त्यांना तिचे प्रेम, धडपड समजते,पण तिच्या हट्टाला आपण कां बळी पडावे? हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण होतो.तरीही आईचे कष्ट पाहून तिची स्वप्नं पूर्ण करण्याचे ते ठरवितात.

आई मुलासाठी एवढे कष्ट घेते पण शेवटी मुलगा आपल्या आईला म्हणतो “आई अगं चूक तुझीच आहे. तूच सगळं सुरू केलंस! तूच मला गरूडाचे पंख लावलेस? कावळ्याचे पंख लावले असतेस तर घाण चिवडीत तुझ्या भोवती घिरट्या घालीत फिरलो असतो. हाक मारताच हजर झालो असतो पण आता माझे पंख गरुडाचे आहेत, गगनाला गवसणी घालणारे आता तू दूर आकाशात पाहून दूर दूर लांब उंचावरती ठिपका दिसतोय ना तो तुझा मुलगा!,तो तरंगतोय सर्वांना हवाहवासा वाटतोय पण खाली येणार कसा. आता फक्त टिकून राहा. मी येतोय तुझ्या आयुष्यभराच्या कष्टाचं साफल्य होऊन! पण तोपर्यंत माझी वाट पहा. थोडा धीर धर. मी येतोच आहे”.

आई आपल्या दोन मुलांना सुरेश‌ व चंदर यांना नोकरी शिकता शिकता मिळत असतानाही करू देत नाही. आईचं म्हणणं असतं की आधी शिक्षण पूर्ण करा. हाल अपेष्टा सहन करत ती दोघांनाही शिकवते.

आपल्या मुलांमधील सर्वोत्कृष्ट बाहेर यावं म्हणून आई छिन्नी प्रमाणे त्यांना घडवतें व वेळ प्रसंगी टक्के टोणपे ऐकवते, त्यामुळे मुले प्रगती करतात.

दोन्ही भाऊ एकाच घरात असले तरी काही दिवस त्यांनी आईची स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मोठ्याने जबाबदारी पत्करून घराला स्थैर्य देण्याचा निर्णय घेतला. भाऊ चंदर याने आईची स्वप्नं निवडली.निवडली म्हणण्यापेक्षा ती त्याच्यावर लादली गेली. स्वप्नाच्या मागे धावत तो निघाला. स्वप्नं वास्तव नसतात परंतु तो स्वतःच अवास्तव झाला,जगावेगळा.कुठलाही मोठेपणा ही मोठ्या प्रमाणात कुचंबणाच असते.कालांतराने तो एक यशस्वी चित्रकार होतो.आपण यश कमावलं पण आपण आईजवळ नाही. आईची सेवा करू शकत नाही याची त्याला खंत वाटते.

आर्ट ची सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणून त्याच्या चित्राला पारितोषिक दिलेलं असतं. चंदर जेंव्हा येतो तेव्हा आई त्याला म्हणते बस एवढंच सांगायला आलास. तेव्हा चंदर म्हणतो आई हे पारितोषिक म्हणजे कलाकारांचे स्वप्न असतं.उभं आयुष्य वेचून सुद्धा फार मोठ्या माणसांना ते मिळतं, तरी आई म्हणते पण’ तुला तरी याच्या बी पुढचं मिळायला पाहिजे’. तेव्हा चंदर म्हणतो याच्यावरून श्रेष्ठ पारितोषिक आज तरी जगात नाही. आई मी माझं काम केलं जगातला सर्वश्रेष्ठ चित्रकार म्हणून तुझ्यासमोर उभा राहिलोय तरी आई म्हणते तू नुसता चित्र काढण्यात हुशार झालास आणि अशा रीतीने आईला वाटतं आपल्या मुलाने अजून प्रगती करावी.कारण सुबक मूर्ती झाल्याशिवाय छिन्नीचं काम पूर्ण होत नाही.

एका वेगळ्या आदिवासी मुलीला तो त्याच्या मर्जीने आणि कल्पनेने आदर्श घडविण्याचा प्रयत्न करतो.जिजाऊ व आई व‌ तो स्वतः अशी साखळी त्याला समजते. त्याच्या लक्षात येते की कलाकृती आणि कलावंत यांचा संबंध कधीच संपत नसतो व पुढेही असेच चालत राहणार.हरीश बोढारे यांचे छिन्नी हे दोन अंकी नाटक मनाला केवळ स्पर्श करून जात नाही तर एक अस्वस्थतेचा अनुभव देऊन जातं.

Author