विक्रमोऽर्वशीयम्

महाकवी कालिदास यांचे हे पाच अंकी नाटक विक्रम अर्थात राजा पुरूरवा आणि अप्सरा उर्वशी यांच्या प्रेम प्रकरणावर आधारलेले आहे.



महाकवी कालिदास यांचे हे पाच अंकी नाटक विक्रम अर्थात राजा पुरूरवा आणि अप्सरा उर्वशी यांच्या प्रेम प्रकरणावर आधारलेले आहे.

कुबेराच्या भवनातून परततांना उर्वशी आणि तिची मैत्रीण चित्रलेखा यांना केशी नावाचा दैत्य पकडतो. स्वाभाविक बाकी सर्व अप्सरा आरडाओरड करतात. त्याच वेळी आपली सूर्य उपासना पूर्ण करून राजा पुरुरवा परत येत असतात. हा सगळा गोंधळ त्यांच्या कानावर पडतो. इंद्राचे मित्र असणारे पुरूरवा केशी दैत्यावर आक्रमण करतात आणि उर्वशीला सोडवतात.

प्रवासात शुद्धीवर आलेली उर्वशी आणि राजा परस्परांचे सौंदर्य आणि पराक्रम पाहून एकमेकांवर लुब्ध होतात.
तेवढ्यात चित्ररथ गंधर्व तेथे येतो. उर्वशीला पळवल्याची वार्ता कळल्याने इंद्राने सैन्य पाठवले असते. पण मध्येच त्यांना राजाच्या विजयाची वार्ता कळते. चित्ररथ या राजाला इंद्र नगरीचे आमंत्रण देतो. पण कार्य व्यस्तता आहे असे सांगत पुरुरवा स्वतःच्या नगरीला परत येतात.

परत आल्यावर राजाला उर्वशी शिवाय काही सुचत नाही. राजाची ही बेचैनी राणीला कळते. ती आपल्या निपुणिका नावाच्या दासीला कारणाचा शोध घेण्यास सांगितले. विदूषक माणवकाच्याद्वारे तिला कारण कळते.

राजाने विदूषकाला उर्वशी प्राप्तीचा उपाय विचारला. विदूषक यावर विचार करीत असतो. राजाच्या विरहात दुःखी झालेल्या उर्वशी गुप्त वेषात तेथे येते. राजाला आपले प्रेम करावे म्हणून ती एक पत्र राजासमोर टाकते. त्या आधारे राजाचे मन कळल्यावर समोर प्रगट होते. पण त्याच वेळी तिला इंद्राचा निरोप येतो म्हणून परत जावे लागते.
राजाला शोधत येणाऱ्या राणीच्या हातात ते पत्र पडते. त्यावरून राणीचा राग. महाराजांनी तिची मनधरणी करणे इ. प्रसंग येतात.

राजाचा विचार करणाऱ्या उर्वशीच्या हातून स्वर्गात परतल्यानंतर इंद्रसभेत सुरू असलेल्या नाटकात चूक होते. त्यामुळे संतापलेले भरतमुनी तिला पृथ्वीवर जाण्याचा शाप देतात.

राणी एक व्रत करते. त्या व्रताच्या फलस्वरूपात पुढे राजा आणि उर्वशी यांची भेट होते. मात्र त्याच वेळी स्वर्गावर रक्षकांचे आक्रमण होत असल्याने राजाला सिद्ध होण्याचा आदेश येतो.

आपला पुत्र आयु याला राज्याभिषेक करून राजा इतरांच्या मदतीला जाण्यासाठी तयार होतो या प्रसंगावर नाटक समाप्त होते.

असंख्य मनोहारी प्रसंगांनी युक्त असे हे महाकवी कालिदासाचे एक विश्वविख्यात नाटक आहे.

धनश्री संजय बोहरा
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए. द्वितीय वर्ष
दि. १४. ०४. २०२२

Author