वेदना…

मी काल दिलेल्या वेदना
आज भोगतोय...
मला आज दिलेल्या वेदना
तू उद्या भोगशील...
वेदनांचा हा जमाखर्च
आता असाच सुरु राहणार...
चेहऱ्यावर हसू असणार
आणि हृदय जळत राहणार...
शरीर झिजत जाणार
मन तरुणच राहणार...
शरीर नष्ट होणार
पण वेदना तशीच राहणार...
वेदनेचे गणित पुन्हा
कोणी दुसरे मांडणार...
या जगात शेवटी
वेदना वेदनाच राहणार...

- निलेश बामणे ( बी डी एन )



मी काल दिलेल्या वेदना
आज भोगतोय…
मला आज दिलेल्या वेदना
तू उद्या भोगशील…
वेदनांचा हा जमाखर्च
आता असाच सुरु राहणार…
चेहऱ्यावर हसू असणार
आणि हृदय जळत राहणार…
शरीर झिजत जाणार
मन तरुणच राहणार…
शरीर नष्ट होणार
पण वेदना तशीच राहणार…
वेदनेचे गणित पुन्हा
कोणी दुसरे मांडणार…
या जगात शेवटी
वेदना वेदनाच राहणार…

– निलेश बामणे ( बी डी एन )

Author