वारी पंढरपुरी

वारी पंढरपुरी

विठ्ठल विठ्ठल । भक्तांची माऊली ।माय ती साऊली । पांडुरंग ।।१।। पांडुरंगा भेटी । भक्त करी वारी ।हाती झेंडा धरी । विठ्ठलाचा ।।२।।



सूधाकरी अभंग रचना
विषय:- वारी आषाढी

वारी पंढरपुरी

विठ्ठल विठ्ठल । भक्तांची माऊली ।
माय ती साऊली । पांडुरंग ।।१।।

पांडुरंगा भेटी । भक्त करी वारी ।
हाती झेंडा धरी । विठ्ठलाचा ।।२।।

पाऊले चालती । पंढरीची वाट ।
गोड गीत गात । विठोबाचे ।।४।।

झांज टाळ वाजे । नाचे भक्त गण ।
विठू नामे मग्न । वारकरी ।।४।।

रिंगणात घोडा । भव्य तो सोहळा ।
लोक होई गोळा । पाहण्यास ।।५।।

पेरणी करून । शेतकरी जाई ।
विनवणी आई । विठ्ठलाला ।।६।।

कृपा कर विठू । पाऊस येऊ दे ।
शिवार फुलू दे । पोरांसाठी ।।७।।

चंद्रभागे काठी । विठूचा गजर ।
भक्ताचा जागर । हरिनामे ।।८।।

पंढरी नगरी । भक्तिचे आगर ।
करती गजर । माऊलीचा ।।९।।

जन्माचे सार्थक । मानी वारकरी ।
एकदाच फेरी । पंढरीला ।।१०।।

© शोभा वागळे
मुंबई (जोगेश्वरी पूर्व.)

आम्ही साहित्यिक या फेसबुक ग्रुपवरील #महाचर्चा_आषाढी_पंढरी या महाचर्चेचा भाग असलेली ही रचना

Author