वाचाल तसें घडाल

वाचनाला प्रेरणा देणाऱ्यापैकी एक गोष्ट म्हणजे परीक्षा पद्धती होय. आज विद्यार्थ्यांचे वाचन परीक्षेपुरतच सिमीत झालं आहे. संकल्पना जरी स्पष्ट झाल्या नाही ‌तरी पाठांतर करून‌ व कॉपी करू मुलें पास होत आहे त.अवांतर वाचन संदर्भासाठी खूप उपयोगी पडतं, पण मुलांचं आवांतरवाचन आज जवळजवळ नाहीच.घोकाओका एवजी विचार करा आणि लिहा असेच परीक्षेचे स्वरूप आता राहणार आहे.



वाचनाला प्रेरणा देणाऱ्यापैकी एक गोष्ट म्हणजे परीक्षा पद्धती होय. आज विद्यार्थ्यांचे वाचन परीक्षेपुरतच सिमीत झालं आहे. संकल्पना जरी स्पष्ट झाल्या नाही ‌तरी पाठांतर करून‌ व कॉपी करू मुलें पास होत आहे त.अवांतर वाचन संदर्भासाठी खूप उपयोगी पडतं, पण मुलांचं आवांतरवाचन आज जवळजवळ नाहीच.घोकाओका एवजी विचार करा आणि लिहा असेच परीक्षेचे स्वरूप आता राहणार आहे.

शिक्षण हे केवळ समजण्यासाठी शिकायचे नसून त्या शिक्षणामधून आपल्याला समज आली तरच त्याला अर्थ आहे. अनेक थोरामोठ्यांचं आयुष्य केवळ समजून परीक्षेत उत्तर लिहून गुण मिळवून चांगल्या मार्काने पास होण्यासाठी नसून त्यातून विद्यार्थ्यांना समज येणं अपेक्षित आहे.

मुले वाचत नाहीत अशी ओरड आपण ऐकतो पण आता ओपन बुक परीक्षा पद्धती धोरण जर राबविले गेले तर मुलांना वाचण्याशिवाय पर्याय उरणार नाही. कारण परीक्षेत पुस्तके घेऊन जरी परीक्षा द्यायची असली तरी कोणत्या प्रश्नाचे उत्तर कोठे आहे व त्याचा संदर्भ घेऊन कशा प्रकारे उत्तरे लिहायची ते विद्यार्थ्यांना ठरवावं लागणार आहे. नुसतच वाचन नव्हे तर मनन, चिंतन, लेखन,मुकवाचन या सवयी सुद्धा त्यांच्यामध्ये रुजल्या तर एकूण वाचन म्हणजे व्यक्तिमत्व विकासाची पायवाटच असते हे त्यांना कळेल. जेवढं ते वाचतील पुस्तके, माणसें तेवढे ते अनुभव संपन्न होतील.

पुस्तका विरहित परीक्षा मुलांच्या बुद्धिमत्तेपेक्षा पाठांतर, घोकंपट्टी व आठवण्याची क्षमता याचा कस लावणारी होती. अभ्यास न करणाऱ्यांसाठी पण कॉपी करून पास होणाऱ्यांना वरदान होती.आता पुस्तकासहित परीक्षा घेण्याचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

परीक्षेत आतापर्यंत विद्यार्थी फक्त प्रश्नांची उत्तरे लिहीत होती, आता त्यांना एखाद्या प्रश्नाचे उपयोजन ,विश्लेषण व त्यावर आपलं मत मांडता येणं आवश्यक ठरणार आहे.

वकिलांचा ज्याप्रमाणे अभ्यास असेल तर कोणत्या पुस्तकात कोणत्या पानावर कोणतं कलम, कोणता नियम आहे हे त्याला माहीत असतं, तो संदर्भ घेऊन तो केस लढवतो.

आजची मुले पाठ्यपुस्तकें फार कमी वाचतात. पुस्तके वाचलेली असतील तर त्याचा संदर्भ कोठे व कसा घ्यायचा हे कळेल.

पुस्तका सहित परीक्षा साठीआमच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना यासाठी आधी तयार करावं लागेल. काठिण्य पातळी चे प्रश्न तयार करावे लागतील.शिक्षकांना अधिकची प्रश्नपेढी तयार करावी लागेल. मुलांनी नुसतं उत्तर लिहिणं अपेक्षित नाही तर पुस्तकातल्या संदर्भावरून तो कुठे आणि कसा वापरायचा हे त्यांना कळायला हवं.

मुलांना पुस्तके जवळ करावी लागतील तरच पुस्तकांच्या पलीकडचे जे जे आहे ते त्यांना कळेल.

अनेक संकल्पना पुस्तकाच्या बाहेर मुलांना कळतात पण त्यासाठी पुस्तकाचा संदर्भ असेल तर त्या संकल्पना लवकर कळतात म्हणून पुस्तके वाचून त्यातले संदर्भ जीवनात शोधता यायला हवेत.

बंद पुस्तकी परीक्षांपेक्षा खुल्या पुस्तकांच्या परीक्षा सोप्या नसतात – अनेकदा त्या कठीण असतात.ओपन-बुक परीक्षेसाठी खरोखर सामग्री समजून घेणे आणि माहिती आणि सामग्री लक्षात ठेवण्याऐवजी विश्लेषण करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. याचा अर्थ निश्चितपणे अभ्यास करणे आणि संघटित होणे आवश्यक आहे कारण फक्त माहिती लक्षात ठेवू चालणार नाही! गोष्टी शोधण्यात किंवा प्रथमच साहित्य पाहण्यात परीक्षेचा मौल्यवान वेळ वाया घालवणे योग्य नाही. सर्वसाधारणपणे परीक्षेचे स्वरूप आणि लॉजिस्टिक्स देखील समजून घेणे आवश्यक आहे- परीक्षा बहुविध निवड, समस्या सोडवणे किंवा निबंध आधारित आहे का हे जाणून घेणे आवश्यक आहे. परीक्षा पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल हे देखील माहित असणे आवश्यक आहे. प्रत्येक परीक्षा भिन्न असते, खुल्या पुस्तकाचा अर्थ असा नाही की तयारी करण्याची किंवा अभ्यास करण्याची गरज नाही.ओपन-बुक परीक्षांसाठी “उच्च पातळीची विचारसरणी” वापरण्याची आवश्यकता असल्यामुळे, फक्त तथ्ये किंवा आठवणीबद्दल विचारले जाणार नाही. त्याऐवजी माहितीची तुलना, विश्लेषण, मूल्यमापन किंवा संश्लेषण करण्यास सांगितले जाईल. ज्ञान दाखवण्याचे हे मार्ग अधिक आव्हानात्मक आहेत आणि त्यासाठी आवश्यक आहे की सामग्री सखोलपणे माहित असणे आणि त्याचा योग्य वापर सक्षम असणे आवश्यक आहे. वाचनाने माणसें घडतात,म्हणून वाचतायनां? वाचायलाच पाहिजे.

Author