“तुझ्या गळा
माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा’
“ताई, आणखि कोणाला ?’
“चल रे दादा चहाटळा ! ॥१॥
“तुज कंठी
मजअंगठी !
“आणखि गोऽफ कोणाला?”
“वेड लागले दादाला !’
“मला कुणाचे ? ताईला !’ ॥२॥
“तुज पगडी
मज चिरडी !
“आणखि शेला कोणाला ?’
“दादा, सांगूं बाबाला ?’
“सांग तिकडल्या स्वारीला !’ ॥1३॥
खुसू खुसू
गालि हंसू –
वरवर अपुले रुसू रुसू !’
“चल निघ, येथे नको बसू
“घर तर माझे तसू तसू ॥४॥
कशी कशी
आज अशी
गंमत ताईची खाशी !’
“अता गट्टी फू दादाशी’
“तर मग गट्टी कोणाशीं?’ ॥ ५॥
Post Views: 17