पाऊस

पावसाच्या धारा
येती झरझरा
झाकळले नभ, सोसाट्याचा वारा.

रस्त्याने ओहळ
जाती खळखळ
जागजागी खाचांमध्ये तुडुंबले जळ.

ढगावंर वीज
झळके सतेज
काळ्या शालूवरी जरीकाठाचा की साज.

झोंबे अंगा वारे
काया थरथरे
घरट्यात घुसूनिया बसली पाखरे.

हर्षलासे फार
नाचे वनी मोर
पानातून हळू पाहे डोकावून खार.

पावसाच्या धारा
डोईवरी मारा
झाडांचिया तळीं, गुरे शोधिती निवांरा ।

नदीलाही पूर
लोटला अपार
फोफावत धावे जणू नागीणच थोर ।

झाडांची पालवी
चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसे रंगदार छबी ।
थांबला पाऊस
उजळे आकाश
सूर्य येई ढगातून, उधळी प्रकाश ।

किरण कोवळे
भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्ये जग सारे खुले ।

पावसात न्हाली
धरणी हासली
देवाजीच्या करणीने मनी संतोषली



पावसाच्या धारा
येती झरझरा
झाकळले नभ, सोसाट्याचा वारा.

रस्त्याने ओहळ
जाती खळखळ
जागजागी खाचांमध्ये तुडुंबले जळ.

ढगावंर वीज
झळके सतेज
काळ्या शालूवरी जरीकाठाचा की साज.

झोंबे अंगा वारे
काया थरथरे
घरट्यात घुसूनिया बसली पाखरे.

हर्षलासे फार
नाचे वनी मोर
पानातून हळू पाहे डोकावून खार.

पावसाच्या धारा
डोईवरी मारा
झाडांचिया तळीं, गुरे शोधिती निवांरा ।

नदीलाही पूर
लोटला अपार
फोफावत धावे जणू नागीणच थोर ।

झाडांची पालवी
चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसे रंगदार छबी ।
थांबला पाऊस
उजळे आकाश
सूर्य येई ढगातून, उधळी प्रकाश ।

किरण कोवळे
भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्ये जग सारे खुले ।

पावसात न्हाली
धरणी हासली
देवाजीच्या करणीने मनी संतोषली

Authors