तू दूर गेल्यावरच तुझी आठवण येते
जितके अंतर वाढते तितकेच प्रेम वाढते
तू जवळ असताना मनात काहीच नसते
पण लांब असताना सारेच चलबिचल असते
तुझ्या माझ्यात काहीच कधी सारखे नसते
तरी तुझे सारे काही मला आवडते
माझे मन जपण्यासाठी तू आटापिटा करतेस
सारे समजून उमजूनही बोलणे टाळतेस
प्रेमात पडायला काय लागते हे सांगतेस
पण प्रेम व्यक्त करायला मात्र घाबरतेस
© कवी – निलेश बामणे
Author
Post Views: 8