तो’ आणि ‘ती’

ती चुल्ह्याजवळ, तर त्याच्या डोईवर सूर्य
तिच्या हाताला चटके, त्याच्या पायांना !



ती चुल्ह्याजवळ, तर त्याच्या डोईवर सूर्य
तिच्या हाताला चटके, त्याच्या पायांना !

ती श्वासांसाठी हवेची झुळूक, तो विचारांसाठी शाई
दोघे बनतात मुलांचे गुरुत्वाकर्षण, ताठ कण्याचे !

तिची पावले घट्ट मातीत, तो आकाशपावलांचा
ती असते वसुंधरा दिन, तो असतो पुस्तक दिन !

ती सतत जवळ- हात फैलावला की स्पर्शणारी
तो आभाळासारखा, सदैव दुरुन निरखणारा !

ज्याची जशी भावना तशा त्याच्यासाठी मूर्ती, मात्र
दोघेही – ” हरी अनंत- हरिकथा अनंता ” या पठडीतले !

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

Author