रंग दुनियेचे . . (गझल)

हात जेव्हां हे जळाया लागले
रंग दुनियेचे कळाया लागले .

ठाकतां संकट, पळाल्या वल्गना
पायही मागे पळाया लागले .

जग दगा देताच, देती नयनही
रोखलें, तरिही गळाया लागले .

पाप किंवा पुण्य ना गतजन्मिंचें
येथलें येथें फळाया लागलें .

शुभ्र वसनें, डाग वर इवलाहि ना
आंतुनी पण मन मळाया लागलें .

पीठ खाण्यां सज्ज कुत्रे राजसी
बावळे आंधळे, दळाया लागले .

संधिसाधू भरत भरपूरच खिसे
बघुन तृषितां मळमळाया लागलें .

मिट्ट रजनी, मोजके अंधुक दिवे
हाय ! तेही काजळाया लागले .

-- सुभाष स. नाईक
सांताक्रुझ, मुंबई.
फोन : 022-26105365.
मोबाईल : 9869002126.



हात जेव्हां हे जळाया लागले
रंग दुनियेचे कळाया लागले .

ठाकतां संकट, पळाल्या वल्गना
पायही मागे पळाया लागले .

जग दगा देताच, देती नयनही
रोखलें, तरिही गळाया लागले .

पाप किंवा पुण्य ना गतजन्मिंचें
येथलें येथें फळाया लागलें .

शुभ्र वसनें, डाग वर इवलाहि ना
आंतुनी पण मन मळाया लागलें .

पीठ खाण्यां सज्ज कुत्रे राजसी
बावळे आंधळे, दळाया लागले .

संधिसाधू भरत भरपूरच खिसे
बघुन तृषितां मळमळाया लागलें .

मिट्ट रजनी, मोजके अंधुक दिवे
हाय ! तेही काजळाया लागले .

— सुभाष स. नाईक
सांताक्रुझ, मुंबई.
फोन : 022-26105365.
मोबाईल : 9869002126.

Author