कृत्तिका नक्षत्राची गोष्ट

(ऑस्ट्रेलियन लोककथा)

एका राजाची एक सुंदर राणी होती. एका कावळ्याला ही राणी खूप आवडत होती. एके दिवशी राणी आपल्या सहा दासींसोबत रानात पांढरे सुरवंट शोधीत होत्या. कावळ्याने पाहिले आणि कावळ्याला एक युक्ती सुचली. कावळ्याने सुरवंटाचे रूप घेतले. रानातील दाट झुडपात लपून बसला. राणीच्या दासींनी सुरवंट पकडण्यासाठी साधे लाकडी गळ टाकले.



(ऑस्ट्रेलियन लोककथा)

एका राजाची एक सुंदर राणी होती. एका कावळ्याला ही राणी खूप आवडत होती. एके दिवशी राणी आपल्या सहा दासींसोबत रानात पांढरे सुरवंट शोधीत होत्या. कावळ्याने पाहिले आणि कावळ्याला एक युक्ती सुचली. कावळ्याने सुरवंटाचे रूप घेतले. रानातील दाट झुडपात लपून बसला. राणीच्या दासींनी सुरवंट पकडण्यासाठी साधे लाकडी गळ टाकले. परंतु या साध्या लाकडी गळात सुरवंट अडकलाच नाही. काही वेळाने राणीने सुंदर हाडांचा गळ बनवला. आणि काय आश्चर्य या हाडांच्या सुंदर गळात कावळा अडकला. राणीने क्षणभराचाही विलंब न करता गळ जवळ ओढला. पापणी लवते न लवते तोच सुरवंटाचे एका राक्षसात रूपांतर झाले आणि राक्षसाने राणीला पळवून नेले.
रानात राहिलेल्या सहा दासीही आकाश मार्गाने उडून गेल्या. त्याच कृत्तिका होत.

Author