व्यक्ती-परिचय

केसरी टुर्स च्या संचालिका झेलम चौबळ

Category:

 

केसरीच्या संचालिका असलेल्या झेलम यांना फायनान्स, टिकिटिंग आणि ॲडमिनिस्ट्रेशन या विभागांमध्ये विशेष रुची आहे. मात्र, पर्यटनाच्या नवनवीन योजना आखण्यात त्यांचा हातखंडा आहे. नेहमीच्या ग्राहकांबरोबरच शेतकऱ्यांना पर्यटनाबरोबरच शेती आणि शेतीपूरक व्यवसायासंबंधी नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून ॲग्रो टुरिझम, विद्यार्थ्यांसाठी ‘नासा’ टूर आणि कार्पोरेट क्षेत्रात विशेष लोकप्रिय असलेली माईस (MICE) अशा पूर्णपणे भिन्न आणि लोकप्रिय योजना आखण्याचे श्रेय ‘झेलम’ यांचेच.

  June 30, 2022


साहित्य - ललित

रम्य ते बालपण : चित्तरंजन भट

Category:

 

नागपुरात आमच्या घरीही बाबांना भेटायला खूप लोक येत असत. बहुतेक माणसे साधीसुधीच असायची. बरेचदा नावाजलेली माणसेही यायची. बाबांच्या खोलीत मग गप्पांची, हास्यविनोदाची सत्रं चालायची. चहाच्या खेपा व्हायच्या आणि आई थकून जायची. विशेषतः हिवाळी अधिवेशनाच्या काळात अनेक मंत्रीमंत्री आणि आमदारही बाबांना खास भेटायला येत असत. उल्हास पवार, सुशीलकुमार शिंदे तर नेहमीचेच.

  June 30, 2022


व्यक्ती-परिचय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया-सुळे

Category:

 

निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार बाळासाहेबांना भेटायला गेले. त्यांनी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देत असल्याचं बाळासाहेबांना सांगितलं. बाळासाहेब म्हणाले, मग शिवसेना उमेदवारी देणार नाही. मध्येच शरद पवार म्हणाले, ‘पण भाजपाचं काय?’ बाळासाहेब म्हणाले, ‘कमळाबाईची चिंता नको करू, कमळाबाईला कसं पटवायचं ते मला माहिती आहे,’ असा शब्द बाळासाहेबांनी दिला. सुप्रिया सुळे बिनविरोध निवडून आल्या.

  June 30, 2022


दिनविशेष

ब्रिटनने चीनकडुन ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हाँगकाँग बेट चीनला परत दिले

Category:

 

पहिल्या अफू युद्धानंतर (१८३९–४२) हाँगकाँग बेट नानकिंग तहान्वये ब्रिटनच्या स्वाधीन करण्यात आले. १८६० च्या दुसऱ्या अफू युद्धानंतरच्या पीकिंगच्या (बीजिंग) तहात ठरल्याप्रमाणे कौलून द्वीप-कल्पाचा प्रदेश ब्रिटनच्या स्वाधीन करण्यात आला. तसेच १८९८ च्या परिषदेत नमूद केल्याप्रमाणे त्याच वर्षापासून न्यू टेरिटरी प्रांतासह २३५बेटे ब्रिटनला ९९ वर्षांच्या करारावर चीनकडून मिळाली. अशा प्रकारे ब्रिटनने चीनकडून संपूर्ण हाँगकाँग प्रदेश हस्तगत करून येथे आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले.

  June 30, 2022


व्यक्ती-परिचय

लेखिका रोहिणी निनावे

Category:

 

दामिनी, अवंतिका, अक्कासाहेब, राधिका असो की राजश्री प्रॉडक्श्नच्या गाजलेल्या हिंदी मालिका. रोहिणी निनावेंच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली प्रत्येक व्यक्तिरेखा आणि मालिका लोकप्रिय होतेच.

  June 30, 2022


दिनविशेष

महाकवी कालिदास दिवस

Category:

 

कालिदास काय नव्हता ! त्याच्या साहित्याचं दर्शन घेतलं तर आपल्याला जाणवतं की कालिदास कवी तर होताच… पण तो चित्रकारही होता…एक वैज्ञानिकही होता, एक समाजशास्त्रज्ञही होता. एवढचं नव्हे तर एक मानसशास्त्रज्ञही होता….

  June 30, 2022


व्यक्ती-परिचय

सूत्रसंचालक, अभिनेते, दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे

Category:

 

शिक्षण घेत असताना एकपात्री, मिमिक्रीच्या माध्यमातून स्वतःतील कलाकार कायम जिवंत ठेवला. ते स्वत: चांगले गातात, दिग्दर्शन करू शकतात, चित्रकार काढतात, अभिनया व्यतिरिक्तच्या या गोष्टी फारच कमी लोकांना माहीत आहेत. “महाराष्ट्राचा सुपरस्टार’, “फू बाई फू’, “होम मिनिस्टर’, “दुभंग’ (मराठी चित्रपट) आणि चला.. हवा येऊ द्या”असा त्यांचा प्रवास आहे.

  June 30, 2022


व्यक्ती-परिचय

दिग्दर्शक दत्ता केशव कुलकर्णी उर्फ दत्ता केशव

Category:

 

दत्ता केशव यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘अति शहाणा त्याचा.’ (१९६७) त्या वेळेस हा चित्रपट मराठी आणि भोजपुरी भाषेत करण्यात आला होता. पुढे ‘बायांनो नवरे सांभाळा’ हा चित्रपट १९७४-७५ साली प्रदर्शित झाला. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दत्ता केशव यांचे होते. ‘पिंजरा’नंतरचा हा मराठी रंगीत चित्रपट होता.

  June 30, 2022