लेखसंग्रह

सहयोग

Category:

 

आपण सहयोग देण्या व घेण्याची अपेक्षा शक्यतो आपल्या माणसाकडून करतो. जिथे संबंधामध्ये जवळीक आहे अश्या व्यक्तीला मनापासून सहयोग देतो. मग तो वस्तु, पदार्थ असो किंवा भावनिक आधार असो देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. कोणी दुःखी असेल व आपण त्याच्या भावना ऐकून घेतल्या तरी त्या व्यक्ति साठी हा ही खूप मोठा सहयोग असतो. एखाद्याला वेळ, आपलेपणा जरी दिला तरी त्याला त्याचे समाधान मिळते. त्यांना समाधान मिळणे हा सुद्धा सहयोग नाही का?

  September 23, 2022


साहित्य - ललित

शब्द, शब्द, शब्द, शब्द!

Category:

 

गुलज़ारचा ऐकीव दिनक्रम (म्हणजे माझ्या कानी आलेला)- रोज सकाळी सारं आवरून तो त्याच्या लेखन टेबलावर नियमित बसतो आणि नेटाने लेखन करीत असतो. मीही ती दैनंदिन शिस्त स्वतःला बऱ्यापैकी लावत आणलीय. विशेषतः फेब्रुवारी २०२० पासून सुरु झालेल्या स्तंभलेखनाने (हा आयुष्यातील पहिलाच लेखनप्रकार) मला सातत्याची शिस्त लावलीय. घड्याळ असते सोलापूरला पण दर शुक्रवारी नवा लेख लिहायला सुरुवात करून तो सोमवार रात्रीपर्यंत पाठविला तरच तो पुढच्या रविवारी येतो हे नवं आक्रीत आता अंगवळणी पडलंय आणि जमतंय.

  September 23, 2022


साहित्य - ललित

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ४ – सावरकरांची गुण ग्राहकता

Category:

 

सावरकरांनी १९२९ साली सन्यस्तखड्ग नाटकावर पुण्याच्या श्री. वि.ना. कोठीवाले यांनी टीकात्मक लेख लिहिला तो वाचून सावरकरांनी त्यांना भेटीसाठी बोलावले. व म्हणाले “ तुम्ही माझ्या भाषेतल्या दोषावर टीका केलीत ती बरोबर आहे.पण मराठी नाटके बहरत असताना मी अंदमान येथे तुरुंगात होतो,त्यामुळे मला सद्यस्थितीतिल नाटकाची  भाषा अवगत नाही, मी मराठी नाटकेही मी पहिली नाहीत,पण नाटकाच्या नावाचे जे विवेचन केले आहे ते अगदी योग्य आहे. व लोकापुढे मांडून माझं ध्येय साध्य केले आहे.”

  September 23, 2022


साहित्य - ललित

एका कुटुंबाची गोष्ट – भाग ३ (आठवणींची मिसळ २८ ब)

Category:

 

मला मात्र वंश वगैरेची चिंता आता एकविसाव्या शतकांत योग्य वाटत नाही. “मुलगी शिकली, प्रगती झाली.” हे वचन सर्व बहिणींनी सिध्द केले. तिसऱ्या पिढीतल्या सगळ्या मुली पदवीधर झाल्या. त्यांनी नोकऱ्या केल्या. सगळे मुलगे नाही शिकले. मुलींनी दुसऱ्या घरांत जाऊन त्या कुटुंबांच्या आधार बनल्या. आणखी काय हवं ? दुसऱ्या भागापर्यंत करूण वाटणारी गोष्ट, ह्या मुलींच्या मुलांची व मुलींच्या उत्कर्षाची माहिती मिळाल्याने ती गोष्ट आता सुखान्त झालेली पाहून मला खूप आनंद झाला. आणि तो तुमच्याशी वाटून घ्यावा म्हणजे दुणावेल असेही वाटले.

  September 22, 2022