‘द’त्तू ‘फ’डकर : ‘द’मदार ‘फ’र्जंद
Category:
लेखसंग्रह व्यक्ती-परिचयकपिलदेव हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला सर्वोत्कृष्ट महान अष्टपैलू खेळाडू मानला जातो, आणि त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली कामगिरी ही मान्यता सिद्धही करते. परंतु कपिलच्या ३० वर्षं आधी भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर असा एक तारा चमकून गेला, ज्याने काही काळ आपल्या जबरदस्त अष्टपैलू कामगिरीने क्रिकेटजगताला आपली नोंद घ्यायला लावली. हा मराठमोळा तारा म्हणजे १२ डिसेंबर १९२५ ला जन्मलेला कोल्हापूरचा रांगडा गडी ‘दत्तात्रय गजानन ‘उर्फ’ दत्तू फडकर’.
December 11, 2025