हितसंबंध आणि कर्तव्य
Category:
साहित्य - ललित
April 20, 2006
Category:
साहित्य - ललित
April 20, 2006
Category:
साहित्य - ललितगेल्या आठवड्यातली गोष्ट. मी एका नातलगाकडे गेलो होतो. खूप दिवसांनी ही भेट होत होती. त्यामुळे गप्पांचे-चर्चेचे विषयही खूप होते. स्वाभाविकपणे वेळही खूप गेला. आता समारोपाचे, निरोपाचे बोलणे करावे म्हणून मी `निघतो आता’ अशी प्रस्तावना केली अन् तिथेच नव्या विषयाला प्रारंभ झाला. त्या घरात दोघे नवरा-बायको अन् त्यांचा 20 वर्षांचा मुलगा- नुकताच नोकरी करू लागलेला. आत्मविश्वास आणि अपेक्षाही वाढलेल्या. त्याला मोटरबाईक घ्यायची होती अन् त्यावर मी मुलाला समजावून सांगावे किंवा समजून घ्यावे, अशी त्या दोघांची इच्छा होती. त्या दोघांची परिस्थिती बेताचीच; पण एकुलत्या एका मुलाचा हट्ट कसा नाकारायचा, हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. हट्ट स्वीकारायचा, तर मोठे आर्थिक ओझे घ्यावे का, हा प्रश्न होता. मोटरबाईक घ्यायला त्यांचा विरोध नव्हता; पण मुलाला नव्या युगाशी सुसंगत सीबीझेड किंवा करिष्मा हवी होती. खरेतर कोणत्याही कनिष्ठ मध्यवर्गीय घरामध्ये येणारा हा प्रश्न होता.
April 18, 2006
Category:
साहित्य - ललित
April 16, 2006
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका‘माशाचे अश्रू कुणाला दिसत नाहीत,’ बाळासाहेब ठाकरे एकदा उद्वेगाने असे म्हणाले होते. खरेच आहे ते! ज्यांनी देशाला, जगाला आपल्या विचारांनी, आपल्या कर्तृत्वाने भारावून टाकले अशा थोरामोठ्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील यशापयश कधीच समोर येत नाही.
April 16, 2006
Category:
साहित्य - ललित
April 13, 2006
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनशिलकीचा अर्थसंकल्प मांडून राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आपल्या पाठीवर आपण शाबासकीची थाप मारून घेतली असली तरी त्यांनी उभा केलेला आर्थिक स्थैर्याचा देखावा किती पोकळ आहे, हे सांगायला कुण्या अर्थतज्ज्ञाची गरज नाही.एखाद्या देशाची, प्रदेशाची आर्थिक स्थिती कशी आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर त्या देशातील शेवटच्या माणसाची आर्थिक स्थिती कशी आहे, ते आधी पाहायला हवे. या कसोटीचा वापर केल्यास राज्याची आर्थिक स्थिती अतिशय दयनीय असल्याचे दिसून येते.
April 9, 2006
Category:
साहित्य - ललित
April 8, 2006
Category:
साहित्य - ललितत्या वेळी एसएससीला होतो मी. 1966-67 चा तो कालावधी. अलीकडच्या काळात 10वी 12वी नंतर काय, याची माहिती देणाऱया अनेक संस्था, व्यक्ती आहेत. त्या वेळी ते प्रमाण फारसं नव्हतं. माझ्या घरात तर एसएससी होणारा मीच पहिला ठरणार होतो. पुढे काय, हा प्रश्न इतरांना सतावत असला तरी मला त्याचा त्रास नव्हता. कारण नववी इयत्तेत असल्यापासून काही तरी उद्योग मी करीत आलेलो होतो. त्यामुळं आता काही नवं, भव्य-दिव्य करण्याचं मनात होतं. त्या वेळी मी कोपरगावला राहत होतो. त्याच वर्षी पालिकेनं भाजी मंडईच्या बाजूनं काही गाळे काढले होते. इथं काही तरी करायला हवं.
April 7, 2006
Category:
साहित्य - ललितसुमती मावशी अन् माझा संपर्क सहवास अवघ्या दहा वर्षांचा; पण त्या दहा वर्षांत मला त्यांनी खूप काही दिलं. खरं म्हणजे माझ्या मनात येईल ते अन् येईल तसं मांडण्याची जागा म्हणजे सुमती मावशी. त्यांना मी मावशी म्हणत असलो, तरी त्या माझ्या मावशी नव्हत्या. व्यवहारिक अर्थानं सांगायचं, तर त्यांचं नि माझं नातं असं काहीच नव्हतं. माझ्या पत्नीच्या मैत्रिणीच्या मीनाच्या लग्नात आमची ओळख झाली. त्या मीनाच्या मावशी. त्यावेळी माझं वय असेल तिशीच्या आत आणि त्या होत्या पन्नाशीच्या आसपास. खडकीच्या एका शाळेत हिंदी शिकवायच्या. घरात ती दोघंच. पती आणि त्या. त्यांना मूलबाळ झालंच नाही असं नव्हे; पण टिकलं नाही. व्यक्तिमत्त्व थेट पुणेरी वळणाचं. लग्नसमारंभ आटोपल्यावर `या हं, एकदा आमच्याकडे,’ असं आमंत्रण त्यांनी दिलं.
April 5, 2006
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनपुराणात प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या त्रिशंकू राजाची कथा आहे. साक्षात सृष्टी नियंत्या ब्रह्याला आव्हान देणाऱ्या या त्रिशंकूची अवस्था अखेर काय झाली हे सगळ््यांनाच माहीत आहे. त्या त्रिशंकूचेच आधुनिक अवतार आता विज्ञानाच्या शिडीचा वापर करून प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
April 2, 2006
Copyright © 2025 | Marathisrushti