मै कवी अंजान….. गीतोंका
Category:
लेखसंग्रहआज तुम्हाला मी अशा एका कवीबद्धल सांगणार आहे की ज्याचं टोपण नावच दुर्दैवाने त्याचं विधिलिखित बनून गेलं !
२८ आॅक्टोबर १९३० रोजी वाराणसी येथील ओदार या छोट्याशा खेड्यात पं.शिवनाथ पांडे यांना एक मुलगा झाला — लालजी पांडे.स्वत: बँकेत असल्याने बी.काॅम होऊन मुलानेहि बँकेत नोकरी करावी हा वडिलांचा आग्रह व मुळातंच कवीचा पिंड त्यामुळे कवी व्हावं हि लालजीची इच्छा ! अखेर वडिलांशी भांडून लिख लिख के मर जाएँगे! ( पण अपयशी होऊन पुन्हा बनारसमधे पाऊल ठेवणार नाहि! ) असं निक्षून सांगत लालजी १०० ₹ ची नोट घेऊन मुंबईला आले.