लेखसंग्रह

ड्रॅगनचे विषारी फुत्कार

Category:

 

दक्षिण आशियामध्ये चीनला प्रभाव वाढवायचा आहे. त्यात त्यांना भारताचा अडथळा जाणवत आहे. दुसरीकडे जागतिक महासत्ता बनण्यासाठी त्यांची अमेरिकेशी स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही आघाड्यांवर लढताना त्यांनी पाकिस्तानला हाताशी धरून भारताच्या सीमांवर अशांतता निर्माण करण्याचे धोरण ठेवले आहे. यात भारताचे बरेच नुकसान होत असून अमेरिका आणि चीन यांच्या वर्चस्वाच्या युद्धात भारत होरपळून निघत आहे.

  September 14, 2010


लेखसंग्रह

ऑस्ट्रो-आफ्रिकी केप्लर आणि कॅरिबिअन-भारतीय रॉबिन (१४ सप्टेंबर)

Category:

 

कसोटी इतिहासात आजवर फक्त एका खेळाडूने दोन वेगवेगळ्या देशांकडून शतके काढण्याचा आणि १,००० धावा जमविण्याचा पराक्रम केला आहे. १४ सप्टेंबर १९५७ रोजी ब्लोमफौंटनमध्ये केप्लर वेसल्सचा जन्म झाला. वेस्ट इंडिजमध्ये जन्मून भारतातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या रामनारायण सिंग-पुत्राचा जन्म १४ सप्टेंबर १९६३ रोजी त्रिनिदाद बेटांवर झाला. रबींद्र हे त्याचे अधिकृत वापरासाठीचे नाव पण ‘रॉबिन सिंग’ या नावानेच तो सुपरिचित आहे.

  September 14, 2010


लेखसंग्रह

तरुण येतील पण घराणेशाहीचे काय ?

Category:

 

काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच महाराष्ट्रातील काही शहरांना भेटी देऊन तरुणांशी संवाद साधला. यावेळी तरुणांनी अधिक संख्येने राजकारणात यावे असे सांगण्यास ते विसरले नाहीत. वास्तविक अलीकडे प्रत्येक राजकीय पक्षात तरुणांची अधिक भरती होत आहे. पण घराणेशाहीमुळे या तरुणांना मोठी संधी प्राप्त होत नाही. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी स्वत:च्या वक्तव्यावर आत्मपरिक्षण करायला हवे आहे.

  September 14, 2010


लेखसंग्रह

बिहारमध्ये राजकारण्यांची सत्त्वपरीक्षा

Category:

 

बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली असून रणमैदान गाजायला लागले आहे. लालू यादव-रामविलास पासवान यांची आघाडी, नितीशकुमार-भाजपची युती आणि काँग्रेस या तीन मुख्य स्पर्धकांमुळे बिहारचे निवडणूक समर गाजणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार रूप पालटत आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची आणि दीर्घकालीन परिणाम करणारी ठरणार आहे.

  September 14, 2010


लेखसंग्रह

जजी स्मिथ आणि चिपमंक वॉर्न

Category:

 

उत्तर माहीत असूनही काही प्रश्न मुद्दाम विचारले जातात आणि अशा पृच्छांना शैली वगैरेंसारखी गोंडस नावे दिली जातात. कव्हर्समधून रॉबिन स्मिथपेक्षा जास्त जोरात कुणी चेंडू झोडला आहे का, हा असाच एक प्रश्न. १३ सप्टेंबर १९६३ रोजी दक्षिण आफ्रिकेत रॉबिन अर्‌नॉल्ड स्मिथचा जन्म झाला. रॉबिन स्मिथच्या जन्मानंतर बरोब्बर ६ वर्षांनी व्हिक्टोरियातील अप्पर फर्नट्री गलीत कीथ वॉर्न यांना पुत्रप्राप्ती झाली. हा पुत्र एक नामी फिरकगुंडा बनला. वॉर्नी, हॉलिवूड आणि चिपमंक ही त्याची काही लाडनावे.

  September 12, 2010


लेखसंग्रह

सलग-सहा-शतके आणि वेस हॉल

Category:

 

लॉर्ड्सवर यॉर्कशायरविरुद्ध शेष इंग्लंड संघाकडून खेळताना चार्ल्स फ्राय यांनी या दिवशी १०५ धावांची ‘सुंदर खेळी’ (विज्डेन आल्मनॅक) केली. ओळीने सहा प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये शतके काढण्याचा त्यांचा हा विक्रम अद्याप मोडला गेलेला नाही. १२ सप्टेंबर १९३७ रोजी भयावह कॅरिबियन द्रुतगती गोलंदाजांच्या तांड्यातील आणखी एका सरदाराचा जन्म झाला. वेस्ली विन्फील्ड हॉल त्याचं नाव. त्याच्या काळपट गळ्यातील सोन्याची साखळी तो धावू लागताच अस्ताव्यस्तपणे हले.

  September 11, 2010


लेखसंग्रह

परप्रकाशी ‘स्वयं’सेवी संस्था !

Category:

 

देशात ३३ लाख स्वयंसेवी संस्था कार्यरत असल्या तरी या संस्थांनी नफा कमावू नये या मूळ उद्देशालाच हरताळ फासलेला दिसून येतो. काही संस्था निःस्पृहपणे काम करत असल्या तरी अनेक संस्था कर वाचवणे, प्रवर्तकांसाठी सुविधा निर्माण करणे,शासनाचा निधी उकळणे अशा कामांसाठीच स्थापन केल्या जातात. या संस्थांनी खरोखरच काम केले तर देशापुढील अनेक समस्या चुटकीसरशी सुटतील.

  September 11, 2010


लेखसंग्रह

परप्रकाशी ‘स्वयं’सेवी संस्था !

Category:

 

देशात ३३ लाख स्वयंसेवी संस्था कार्यरत असल्या तरी या संस्थांनी नफा कमावू नये या मूळ उद्देशालाच हरताळ फासलेला दिसून येतो. काही संस्था निःस्पृहपणे काम करत असल्या तरी अनेक संस्था कर वाचवणे, प्रवर्तकांसाठी सुविधा निर्माण करणे,शासनाचा निधी उकळणे अशा कामांसाठीच स्थापन केल्या जातात. या संस्थांनी खरोखरच काम केले तर देशापुढील अनेक समस्या चुटकीसरशी सुटतील.

  September 11, 2010