लेखसंग्रह

क्रुझचा अनोखा अनुभव

Category:

 

हल्ली सर्वजण खूप प्रवास करतात. फक्त देशातच नव्हे तर परदेशातही. पुर्वीसारखे परदेशवारीचे अप्रूप आता राहिले नाही. मोठ्या संख्येने मुले-मुली शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी परदेशी जायला लागले. मग त्यांचे आई-वडील मुलीच्या -सुनेच्या बाळंतपणासाठी अमेरिका युरोपला जायला लागले.

  April 20, 2023


लेखसंग्रह

चलो, बुलावा आया है…

Category:

 

माणसाच्या जीवनात चढ-उतार हे असतातच. कोण एका वर्षांत करोडपती होतो, तर कधी कुणाच्या धंद्याचं दिवाळं निघतं. शोमन राज कपूरचं तसंच घडलं होतं. ‘मेरा नाम जोकर’च्या अपयशाने तो खचून गेला होता.

  April 20, 2023


लेखसंग्रह

स्तनपान – भाग ३

Category:

 

अंगावरच्या दुधातील सुरुवातीचे दूध बाळाची तहान भागवते तर नंतर येणारे दूध भूक भागवते. सुरुवातीच्या ८ ते १० मिनिटांत येणाऱ्या दुधांत मेद कमी असते व पाणी जास्त असते. त्यात दुग्धशर्करा, प्रथिने जीवनसत्त्वे व खनिजे जास्त प्रमाणात असतात. नंतरच्या दुधात चरबीचे प्रमाण वाढते बाळाची भूक भागते. बाळाला ऊर्जा मिळते. यामुळे सर्व घटक मिळण्यासाठी एका बाजूचे स्तन पूर्णपणे रिक्त होईपर्यंत पाजून मगच दुसऱ्या स्तनाला घ्यावे.

  April 20, 2023


लेखसंग्रह

रंजोगम’ – खय्याम साहेब !

Category:

 

खय्याम साहेब तसे एस-जे, एस.डी, एल-पी किंवा आर.डी. यांच्यासारखे खूप फॕन फाॕलोईंग असणारे संगीतकार नव्हते. तसे त्यांचे नावही फक्त दर्दी कान-सेनांनाच ठाउक आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने चटका लागलाच पण त्याचवेळी त्यांच्याविषयी त्यांच्या संगीताविषयी एवढं भरभरुन दाखवले गेले व लिहीले गेले हे पाहून मनाला खरंच समाधान वाटलं त्यांच्या निधनानंतर मी जे काही थोडे कार्यक्रम पाहिले व लेख वाचले त्यात खय्याम साहेबांची बरीच गाणी उल्लेखली गेली.

  April 19, 2023


लेखसंग्रह

आणि मी ज्येष्ठ झाले

Category:

 

म्हातारा नुसता वयानं वाढतो. स्वकेंद्री असतो. वृद्ध हा वय, अनुभव आणि ज्ञानानं वाढतो, पण ज्येष्ठ नकाराला सकारात बदलतो. ती ताकद ठेवतो. अशा लोकांची समाजाला गरज आहे.कारण ज्ञान आणि अनुभव त्यांच्याजवळ आहेच. शिवाय निराशा या लोकांना शिवू शकत नाही. म्हणून तर माझी पणजी ठणठणीत आहे. स्मरणशक्ती दांडगी आहे.’

  April 19, 2023


लेखसंग्रह

स्तनपान – भाग २

Category:

 

नवजात बालकाला पहिल्या १/२ ते १ तासांत स्तनपान करावे. पहिल्या ७२ तासांत येणारे दूध-चीक (कोलोस्ट्रम) हे घट्ट, चिकट व पिवळसर असते. सुरुवातीचे ३० ते ९० मि.मि. दूध नवजात बाळाला पुरेसे असते. यामध्ये प्रथिने आणि ‘अ’ व ‘के’ जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असतात. जन्मतःच कमी प्रतिकारशक्ती असलेल्या बालकाला यातून प्रतिकारशक्ती मिळते. त्यातील ‘इम्युन्योग्लोबिन्स’ बाळाच्या आतड्याच्या अंतःत्वचेवर पसरतात. त्यामुळे स्वतःची प्रतिकारशक्ती निर्माण होईपर्यंत बाळाचे रोगांपासून संरक्षण होते.

  April 19, 2023


लेखसंग्रह

कोकण समुद्र : त्यातील जीव आणि वनस्पती वैभव

Category:

 

समुद्राचं जग समजून घेण्यासाठीच आपल्याला त्याच्या अधिवासांची ओळख करून घ्यायला हवी. समुद्राचं जग सुरू होतं वाळूच्या किनाऱ्यापासून!  वालुकामय, चिखलयुक्त  किंवा खडकाळ किनारे, किनाऱ्यांवरील खारफुटीची जंगले, खाड्या आणि प्रवाळांचे क्षेत्र हे या सागरी जगाचे महत्त्वाचे भाग. त्या-त्या प्रदेशानुसार इथली जैवविविधता बदलते आणि त्यामुळेच कोकण किनारपट्टी ही समृद्ध बनते.

  April 18, 2023


लेखसंग्रह

स्तनपान भाग १

Category:

 

उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे सस्तन प्राणी. सस्तन प्राण्यातील स्तनपान ही निसर्गाची किमया आहे. लालभडक रक्तापासून पांढरेशुभ्र दूध तयार करणे आणि तेही थोडक्या वेळात, गरजेनुसार बदलणाऱ्या घटकांच्या प्रमाणात हे एक अनाकलनीय सत्य आहे. उच्चभ्रू समाजातील भ्रामक कल्पनांपैकी एक म्हणजे बाळंतपणानंतर मुलाला पाजणे ही जुन्या जमान्यातील गावठी पद्धत! बाळाच्या आरोग्यापेक्षा | स्वतःच्या शरीरसौष्ठवाला महत्त्व जास्त. स्तन ही स्त्रियांना निसर्गाकडून लाभलेली बहुमोल देणगी आहे.

  April 18, 2023