साहित्य - ललित

कुकरू

Category:

 

सेफ्टी व्हॉल्वमधून थोडीशी हवा सोडत कुकरने विचार केला. आतल्या आत गास्केट घट्ट करुन पाहिलं आणि म्हणाला,“तुम्हा उघड्या तोंडाच्या लोकांना नाही समजणार ते. म्हणजे “वाफ सोडूंना” आमच्या म्हणजे ‘वाफ पकडूंच्या’ अडचणी समजणं जरा कठीण.”
परात म्हणाली.“एऽऽ कुकरू जरा सोपं करुन सांग रे.” वाफ सोडत कुकर हसला आणि म्हणाला,“अगं आमच्या डोक्यावर मध्यभागी शिटीचं सतत टांगतं वजन असतं! तर दुसऱ्या बाजूला तो सेफ्टी व्हॉल्व डोक्यातच घुसलेला असतो.

आणि गळ्याभोवती त्या रबरी गास्केटचा फास असतो. माझ्या पोटातलं पाणी उकळू लागलं की वाफेचं “धूम मचा दे..” सुरू होतं. अशावेळी तोंड बंद करुन अन् गळा आवळून मला गरम वाफेचा धूम धमाका सहन करावा लागतो!”

  November 15, 2015


लेखसंग्रह

धूर आणि कानठळ्या बसवणारा आवाज म्हणजे दिवाळी का?

Category:

 

भारतात सण आणि उत्सवांचा एक वेगळा इतिहास आहे आणि त्यात दिवाळीचा सण वेगळा नाही. दिवाळी साजरी करण्याची परंपरा प्राचीन काळा पासून चालत आली आहे. जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी आणि काळोखाला दूर सारण्यासाठी पणत्या आणि समया देवघरात लावल्या जायच्या.

  November 11, 2015