oldsite
चातुर्मास समाप्ती
Category:
लेखसंग्रहकार्तिक शुक्ल द्वादशीला चातुर्मासाची समाप्ती होते. चातुर्मासांत केलेल्या व्रतांची सांगता करावयाची असते.
महाशिवरात्री
Category:
लेखसंग्रहमाघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र असे म्हणतात. हे एक व्रत आहे. हे व्रत नित्य आणि काम्य दोन्ही आहे. नित्य म्हणजे प्रतिवर्षी करणे आणि काम्य म्हणजे इच्छित मनोरथ पूर्तीसाठी करणे. महाशिवरात्रीला चार याम पूजा मुख्य आहेत. याम म्हणजे प्रहर, एक प्रहर म्हणजे अंदाजे तीन तास.
वनवासींचे राम
Category:
लेखसंग्रहआपला 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येला परत आले, तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. वनवासाला गेलेला राजा राम परत आला तो प्रभू रामचंद्र म्हणून. यामागे तपश्चर्या होती. त्याग होता. समर्पण होते. सर्वांना हृदयात सामावून घेण्याचे लोकोत्तर गुण होते.
शिवाष्टकम् स्तोत्र
Category:
लेखसंग्रहभगवान शंकराच्या स्तुतीसाठी अनेक अष्टकांची रचना झाली आहे. शिवाष्टक, लिंगाष्टक, रुद्राष्टक, बिल्वाष्टक अशा नावांनी ती प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये शिवाष्टकाला विशेष महत्त्व आहे. शिवाष्टकांची संख्याही कमी नाही. श्रीमद् शंकराचार्यांनी शंकराच्या स्तुतीपर हे भावपूर्ण रसाळ स्तोत्र भुजंगप्रयात (गण- यययय) वृत्तात रचले आहे. शिवाच्या प्रिय शिवाष्टकम् स्तोत्राचे पठण आणि श्रवण केल्याने माणसाची प्रत्येक वाईट परिस्थितीतून लवकर सुटका होते. शिवाची ही स्तुती श्रावण महिन्यात केल्याने दुर्भागी व्यक्तीलाही भाग्यवान बनवते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
तुलसी विवाह
Category:
लेखसंग्रहकार्तिक शुक्ल एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह केला जातो. प्रबोधिनी एकादशीला भगवंतांना जागे केले जाते आणि बाळकृष्णाचा तुळशीजवळ विवाह लावला जातो. या दिवशी तुळशी वृंदावन सुशोभित केले जाते. वृंदावनात उस, फुलांसहित झाडे उभी करतात.
हुताशनी पौर्णिमा (होळी) ॥ फाल्गुन शुक्ल
Category:
लेखसंग्रहफाल्गुन पौर्णिमेचे हुताशनी पौर्णिमा हे नाव आहे. या दिवशी प्रदोष काळी होळी पेटविली जाते. याची पौराणिक कथा – हिरण्यकश्यपूच्या बहिणीला होलीकेला अग्नि जाळू शकणार नाही असा वर होता. म्हणून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मांडीवर घेऊन होळीवर बस असे सांगितले.
श्रीराम कथा सदा विजयते
Category:
लेखसंग्रहअशी ख्याती प्राप्त झालेली राम कथा म्हणजे वाल्मिकींच्या अलौकिक प्रतिभेचा अनुपम आविष्कार! वाल्मीकिंनी रचलेले रामायण हे महाकाव्य म्हणजे संपूर्ण विश्वाच्या साहित्यातील पहिले महाकाव्य होय. म्हणून त्यांना आदिकाव्य आणि महर्षी वाल्मिकींना आदि कवी संबोधिले जाते. या ग्रंथात कवीने 24000 संस्कृत श्लोक 7 कांडामध्ये विभागून संपूर्ण श्री रामचरित्र अत्यंत कौशल्याने गुंफले आहे.
श्रीगणेश चतुर्थी
Category:
लेखसंग्रहभाद्रपद शुद्ध चतुर्थी रोजी गणेश चतुर्थी व्रत केले जाते. हे व्रत, उत्सव जवळपास संपूर्ण भारतात करतात. याला वरद चतुर्थी असेही नांव आहे.
श्रीकृष्ण-जयंती
Category:
लेखसंग्रहकृष्ण जन्माष्टमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यातही गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. कृष्णाच्या जन्माचा हा दिवस एखाद्या सोहळ्याप्रमाणे साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवशी उपवास करुन कृष्णाची मनोभावे पूजा केली जाते.