अष्टविनायका तुझा महिमा कसा
लेखसंग्रह

अष्टविनायका तुझा महिमा कसा

Category:

 

गणपती संदर्भात वेगवेगळे चित्रपट आले असतील परंतु अष्टविनायक गणपतींचा संदर्भ असलेला तोपर्यंत एकही चित्रपट नव्हता आणि आता असे म्हणावे लागेल आणि अजूनतरी या विषयासंदर्भात कोणी चित्रपट निर्माण केलेला नाही. हे ‘अष्टविनायक’ चित्रपटाचे वेगळेपण म्हणता येईल.

  August 27, 2023


लेखसंग्रह

शिव्या

Category:

 

माणसाच्या तोंडात सदैव असलेली गोष्ट म्हणजे शिवी. क्रोध,तिरस्कार व्यक्त करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. त्या सर्वच भाषेत उपलब्ध आहेत. कधी राग आला म्हणून तर कधी राग यावा म्हणून शिव्यांचा उपयोग होतो.अगदी जन्मापासूनच त्याचे बाळकडू मिळते.

  August 27, 2023


लेखसंग्रह

संगणकाचे ‘शरीरशास्त्र’

Category:

 

संगणकाचे हार्डवेअर म्हणजे संगणकाचे विविध भाग. हे विविध भाग संगणकाचे अवयवच असतात. मानवी शरीराच्या अवयवांप्रमाणेच संगणकाचे हे अवयव विशिष्ट कामे पार, पाडत असतात. कालानुरूप या हार्डवेअरच्या स्वरूपात बदल होत गेले असले, तरी त्यांचे कार्य तेच राहिले आहे. संगणकाची ओळख करून घ्यायची तर संगणकाच्या या हार्डवेअरची माहिती हवीच…

  August 27, 2023


लेखसंग्रह

हजार तोंडांचा रावण – एक झलक !

Category:

 

डायनासोरहून कितीतरी पटीने मोठा भीमकाय भ्रष्टाचार धावताधावता थांबला. तरी तो बराच पुढे आलेला होता. त्याच्या पायांना लाखो अश्वांचा वेग मिळालेला होता, तर अनेक हत्ती सामावतील एवढे मोठे पोट झालेले होते. स्वतःला आवरायला, सावरायला त्याने बराच वेळ घेतला. नंतर जागच्या जागी उभे राहून मोठ्या कष्टाने त्याने मान वळवली.

  August 27, 2023


साहित्य - ललित

मराठी भाषेची सद्यस्थिती

Category:

 

मराठी भाषेला देववाणी बरोबर प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमत् भगवद् गीतेवर टीका ग्रंथ लिहिताना काढलेले हे गौरवपूर्ण उद्गार आहेत. मराठी भाषा मी इतकी संपन्न करीन अशा प्रतिज्ञेने सामान्य जन-भाषेत त्यांनी हा ग्रंथ लिहिला आणि सामान्य जनतेला समजणाऱ्या भाषेत संस्कृतात दडलेला ज्ञाननिधि मुक्त केला.

  August 27, 2023


साहित्य - ललित

फ्युचरिस्टिक स्पेस टुरिझम

Category:

 

सूर्यमाला सोडून आता आम्हाला पृथ्वीवरची बाराशे वर्षे होऊन गेली होती. सध्या अंतराळाच्या ज्या क्षेत्रातून आम्ही जात होतो तिकडे फक्त धुळीचे प्रचंड ढग होते, प्रकाश दर्शन होऊन जवळपास दिडशे वर्षे लोटली होती.

  August 26, 2023


लेखसंग्रह

सट्खूळ

Category:

 

माझ्या लहानपणी सट्खूळ हा शब्द मी आईकडून, आज्जिकडून अनेक वेळा ऐकलाय. सट्खूळ म्हणजे शब्दशः सांगायचं तर, मुल सहा सात वर्षांचं झाल्यावर त्याला लागणारं खुळ. आता खुळ म्हणजे वेड लागणं किंवा खरोखर वेडं होणं असा अर्थ करून घेऊ नका अगदी. तर असं हे सट्खूळ, ठराविक वयात लागतं आणि निघूनही जातं. मुलं मोठी झाल्यावर त्यांना हे सांगितलं की, आपले प्रताप ऐकून ती खूप हसतात…..पण खुळावल्यासारखी नाही बरं…..

  August 26, 2023


लेखसंग्रह

ज्येष्ठ हो तुमच्यासाठी

Category:

 

विज्ञानाची प्रगती, वैद्यकीय उपचार, लोकात आरोग्याविषयी निर्माण झालेली सजकता यामुळे आयुर्मान वाढले आहे. तथापि, वृद्धापकाळात अनेक समस्या निर्माण होत आहेत. सर्व समस्यांना तोंड देण्याची अनेकांच्या मनाची तयारी झालेली नसते. त्यांचे एक कारण म्हणजे मागच्या पिढीतील त्यांचे आईवडील एवढे जगलेले नसतात. दुसरे आपली मुले चांगली आहेत आणि ती वृद्धापकाळात आपली व्यवस्थित काळजी घेतील. या भाबड्या समजुतीत अनेक असतात.

  August 26, 2023


साहित्य - ललित

कारण ती घरीच असते

Category:

 

व्यापता न येणारं अस्तित्व आणि मोजता न येणारं प्रेम म्हणजे आई. तिच्या निर्व्याज प्रेमाची परतफेड करणे अशक्यच आहे. आपल्या आधी तिचा दिवस चालू होतो. सर्वांच्या आवडी निवडी, कामाच्या वेळा, लहान-मोठ्यांची काळजी आणि घर सांभाळताना स्वत:ला ती पूर्णपणे विसरते.

  August 26, 2023


लेखसंग्रह

मनभावन नूतन

Category:

 

नूतन भारतीय हिंदी सिनेमातील एक आघाडीची नायिका, जन्म ४ जून १९३६. वडील कुमारसेन समर्थ आणि आई शोभना समर्थ, चित्रपट कलेशी जोडलेले. वयाच्या १३ व्या वर्षी तिने ‘हमारी बेटी’ या सिनेमामधून नायिका म्हणून पदार्पण केले. विशेष म्हणजे ह्या सिनेमाची निर्मिती तिच्या आई, शोभना समर्थ यांनी खास तिच्या साठीच केली होती. तिने अभिनय केलेला ‘हम लोग’ हा सिनेमा तिला तिच्या आई वडिलांनी बघू दिला नाही.

  August 26, 2023