साहित्य - ललित

साहित्यिक ठाणे – जुने आणि नवे

Category:

 

साहित्यिक – ठाणे आणि नवे या संबंधात मी जेव्हा विचार करू लागलो तेव्हा आदराने ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे असे श्रेष्ट साहित्यिक महाराष्ट्र सार-स्वतकार वि. ल. भावे (१८७१-१९२६) यांचेच नांव मला सर्वप्रथम आठवले. संत वाङ्मयासंबंधी त्यांनी केलेले संशोधन व त्या आधारे लिहिलेला ‘महाराष्ट्र सारस्वत’ हा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्यातील एक मौलीक ठेवा आहे.

  August 30, 2023


लेखसंग्रह

स्टेथोस्कोप

Category:

 

पूर्वीच्या काळात नाडीपरीक्षेवरून रागनिदान केले जात असे. हृदयाचे ठोके ऐकून वैद्यकीय तपासणी करण्याची पद्धत नंतर रूढ झाली. इ.स. १८०० सुरुवातीच्या काळात फ्रान्समध्ये रेने लॅनेक नावाचा एक डॉक्टर होता. तो हृदयाचे स्पंदन ऐकून रोगनिदान करीत असे. त्यासाठी तो रुग्णाच्या छातीला कान लावून हृदयाचा लब-डब हा आवाज ऐकत असे. एकदा त्याच्याकडे एक तरुण स्त्री आली. आता त्याची चांगलीच पंचाईत झाली.

  August 29, 2023


साहित्य - ललित

तिसरा अंक

Category:

 

सर्वप्रथम वसन्तरावांचे त्यांच्या अध्यक्षपदाबद्दल नाट्य-वेड्या त्यांच्या चाहत्यांच्यावतीने व निर्मात्यांच्यावतीने अभिनंदन करणं महत्वाचं आहे. त्यांचं अभिनंदन करून मगच मला वाटलेले म्हणा किंवा पटलेले म्हणा वसन्तराव कानेटकर ह्यांच्याबद्दल माझ्या लेखणीला पेलवेल असे चार म्हणा किंवा चारशे म्हणा शब्द लिहायचं मी ठरवलं.

  August 28, 2023


लेखसंग्रह

टोनी मारिसन – कादंबरी नव्हेच कविता

Category:

 

काव्यमय भाषेमुळे तिचे गद्य लेखनही पद्यमय झाले. तिची कादंबरी हीच एक कविता बनली. त्यामुळे साहजिकच तिला १९९३ मध्ये साहित्यविषयक नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. टोनी मारिसन हे तिचे नाव.

  August 27, 2023


सुखस्वप्न
कथा

सुखस्वप्न

Category:

 

शांतनू सगळी तयारी दिलेल्या यादीप्रमाणे घेऊन आला. पुन्हा पुन्हा काही राहिलं नाही ना ते बघून तो बाईकवर बसला. तिथूनच त्याने शाल्मलीला फोन लावला. शाल्मलीने हसतच फोन उचलला. आणि त्याने काहीही बोलायच्या आत तीच बोलली, “ शालू, तू सांगितल्याप्रमाणे सगळं घेतलं आहे.

  August 27, 2023


एटीएम मशीन
लेखसंग्रह

एटीएम मशीन

Category:

 

अलीकडच्या काळात आपल्याला फार वेळा बँकेत जायची वेळ येत नाही कारण पैसे काढण्याचे मुख्य काम हे तर एटीएम मशीनच्या मदतीने होत आहे. आपल्याकडे बऱ्याच उशिरा हे तंत्रज्ञान आले असले तरी प्रगत देशात त्याचा वापर अगोदरच सुरू झाला होता. एटीएम याचा अर्थ ॲटोमेटेड टेलर मशीन असा आहे.

  August 27, 2023


लेखसंग्रह

लोकशाहीचे पसायदान

Category:

 

भारत सरकारने आयपीसी सीआरपीसी आणि एव्हिडन्स ऍक्ट मध्ये बदल करून स्वातंत्र्याचे स्वराज्यात रूपांतर करण्याची पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. आता आपण ज्ञानेश्वर माऊलींना त्यांनी मागितलेले पसायदान देण्याची मानसिक आणि कायदेशीर तयारी सुरू केलेली आहे असे मला वाटते. ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हे नागरीकांनी भारत सरकार कडून पूर्ण करून घेण्याच्या नागरी आधिकारांची आणि सुविधांची शॉर्टलिस्टच आहे.

  August 27, 2023