कॅाफी पुराण
Category:
साहित्य - ललितघरी कॅाफी व्हायची ती फक्त भजनी ग्रूप घरी येणार असेल तेव्हा!किंवा अजिबात कधीही चहा न प्यायलेले, “फक्त कॅाफीच” पिणारे पाहुणे घरी येणार असतील, तेव्हा!तेव्हाही शेजारच्या वाण्याकडून कॅाफी पावडर आणायची आणि साधी कॅाफि बनवायची!
भजनी मंडळाच्या वेळी मात्र छान दाट, ताजी वेलची , जायफळ पावडर घालून, खास कॅाफी बनवली जायची! मला ती गोड कॅाफी आवडायची, आणि जास्ती ती उकळत असतांनाचा वास आवडायचा!.. इतकंच माझं कॅाफी बद्दल प्रेम आणि ज्ञान !
जेव्हा कॅाफी बाटल्यातून, छोट्या साशा तून मिळायला लागली तेव्हा ब्रू,टाटा,नेस कॅफी अशी त्यांची नांवे कळायला लागली.
October 22, 2023