साहित्य - ललित

मी एक भाग्यवान

Category:

 

आमची मैत्री उणीपूरी सत्तर वर्षांची. वयात फक्त काही महिन्यांचाच फरक. मी जेमतेम वर्षाचा असताना आमचे बिऱ्हाड श्रीवर्धनहून अलिबागला स्थायिक होण्यासाठी आले . त्यावेळच्या अलिबागचे स्वरूप म्हणजे नारळा पोफळीच्या बागांमधे बांधलेल्या टुमदार कौलारू घरांचे गाव असे होते .

  November 11, 2023


लेखसंग्रह

शिजवलेल्या पालेभाजीचा रंग

Category:

 

पानांना हिरवा रंग येतो ते हरितद्रव्यामुळं रितद्रव्य वनस्पतीच्या पेशीमध्ये असतं.वनस्पतींत पेशीआवरणाच्या भोवती सेल्युलोजची पेशीभित्तिका असते. शीभित्तिकेमुळेच पेशीला आधार आणि आकार या मिळत असतो. पेशीभोवती हवेचा थरही असतो. रितद्रव्याच्या मध्यभागी मॅग्नेशिअमचा अणू असतो. त्याच्यामुळे हरितद्रव्य तेथे तोलून धरलं जातं. मॅग्नेशिअमचा अणू तेथून गेला, तर हरितद्रव्य कोलमडून पडतं.

  November 10, 2023


लेखसंग्रह

कापसापासून सुतापर्यंत

Category:

 

अन्न वस्त्र आणि निवारा, या मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अन्न सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी लागते आणि इतर सजीव प्राणी आपल्या अन्नाची सोय करतातच, शिवाय स्वतःला निवाराही शोधतात. पण वस्त्र अथवा कपडा हे मानवीपणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

  November 10, 2023


लेखसंग्रह

कोलेस्ट्रेरॉल

Category:

 

कोलेस्ट्रेरॉल एक भयावह प्रकार. पण भिण्याचे काहीच कारण नाही. कारण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोलेस्ट्रेरोल वयाच्या २० वर्षापर्यंत लहान मूल अथवा मुलीला कसलीच भीती नाही. मात्र पुरुषांच्या वयाच्या ३५ वर्षानंतर पुरुष अथवा स्त्री करीता वयाच्या ४५ वर्षानंतर जर छातीकरीता अपाय होत असेल, जसे छातीतील जळजळ होणे अथवा छातीत दुखणे वगैरे तक्रार असल्यास डॉक्टरला दाखवून लिपीड प्रोफाईल नावाची एक रोग्याची तपासणी अवश्य करून घ्यावी. यामध्ये कोलेस्ट्रेरॉलमध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे लोडेंसीटी कोलेस्ट्रेरॉल याला एल.डी.एल. असे म्हणतात.

  November 10, 2023


व्यक्ती-परिचय

भारताचे दहावे राष्ट्रपती के. आर. नारायणन

Category:

 

के. आर. नारायणन यांना केवळ देशातच नव्हे तर विदेशातही अनेक मानसन्मान मिळाले. साहित्यातही त्यांची विशेष रुची होती. शालेय स्तरापासूनच त्यांनी विशेष श्रेणी मिळवली होती. परिवारातील बंधूत त्यांचा चौथा क्रमांक होता.

  November 9, 2023


लेखसंग्रह

पान खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो का?

Category:

 

पानाचा विडा तयार करण्यासाठी नागवेलीचं पान वापरलं जातं. या पानावर चुना आणि काथ लावला जातो. त्यावर सुपारी ठेवून पानाची पुडी केली जाते. यात आवडीनुसार लवंग, वेलची, गुंजेची पानं, गुलकंद, तंबाखू इत्यादी पदार्थ टाकतात. पण विड्यात नागवेलीच्या पानाबरोबर काथ, चुना आणि सुपारी हे पदार्थ मात्र हवेतच. पानात जे इतर पदार्थ टाकले जातात, तसंच पान कोणत्या प्रदेशातलं आहे, त्यावरून त्या विड्याला नाव दिलं जातं. उदा. मघई, बनारसी, कलकत्ता, पूना इत्यादी.

  November 9, 2023


लेखसंग्रह

विधायकतेच्या वाटेवर

Category:

 

एकुणच भारतात मुद्रणाची कला सार्वजनिक होत गेली आणि त्या सोबत प्रसार माध्यमांचा ‘प्रसार’ होण्यास सुरवात झाली. पहिली १५० वर्षे प्रसार माध्यमे म्हणजे वर्तमानपत्रे, नियतकालिके असंच स्वरूप होतं. १९८० नंतर आपल्याकडे दूरदर्शनचे जाळे पसरू लागले. २० व्या शतकाच्या अगदी शेवटी शेवटी खासगी दूरदर्शन वाहिन्यांची सुरुवात झाली. २१ व्या शतकात पहिल्या दशकानंतर सामाजिक माध्यमं (सोशल मिडीया) सुरू झाली.

  November 9, 2023


लेखसंग्रह

ई-कोलाय

Category:

 

माणसाच्या शरीरात अनेक जिवाणू म्हणजे बॅक्टेरिया असतात. सगळेच जिवाणू हे घातक नसतात, तर काही मानवाचे मित्रही असतात. ई-कोलाय या जिवाणूचे मात्र तसे नाही. तो आरोग्यास घातक असतो, पण त्याच्या सगळ्या जाती या हानिकारक नाहीत. त्याचा शोध जर्मनीतील बालरोगतज्ज्ञ थिओडोर इशरिच यांनी १८८५ मध्ये लावला.

  November 8, 2023


लेखसंग्रह

पाणी ‘वैश्विक द्रावक’ का आहे?

Category:

 

नाना तऱ्हेचे पदार्थ पाण्यात सहजतेने विरघळतात, कारण पाणी एक उत्तम द्रावक आहे. शास्त्रीय भाषेत ज्या द्रावणात आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी असे दोन्ही पदार्थ विरघळतात त्याला (सार्वत्रिक) वैश्विक द्रावक म्हणतात. पाणी हे वैश्विक द्रावक आहे. याचे कारण पाण्याच्या रेणूत दडलेले आहे.

  November 8, 2023


लेखसंग्रह

भारतीय लोकजीवन आणि कृषी परंपरा

Category:

 

मराठवाड्याच्या सीमेवरील उन्हाळ्यामध्ये तापणारा जिल्हा म्हणजे अहमदनगर येथे मला २०१६ साली भर उन्हाळ्यात जाण्याचा योग आला. ठिकाण होते, ‘कोंबळणे’ गाव, तालुका अकोला आणि शेत होते राहीबाई सोमा पोपेरे यांचे. नगरच्या दुष्काळी भागातील तो हिरवाकंच पट्टा म्हणजे भारतीय कृषी संस्कृतीचे एक विसाव्या शतकामधील खरेखुरे दर्शनच.

  November 8, 2023