परिचय – परिक्षण

माईंचा स्वयंपाक

Category:

 

महाराष्ट्राची मायबोली मराठी असली, तरी प्रत्येक जिल्ह्यागणिक ती बदलत जाते. जसे भाषेचे आहे, तसेच खाण्याचे. काही मैलांनी खाद्यसंस्कृतीतही थोडा बदल जालेला दिसतो. माई देशपांडे यांनी या पुस्तकात मराठवाड्याचा खाद्यखजिना मोकळा केला आहे.

  November 14, 2023


साहित्य - ललित

मोरे चं मोर

Category:

 

गावाच्या खालतुन गायरानातल्या जंगलात दोन-चार पारद्यायचे पालं पडले व्हते.पालं ठोकले की शिरस्त्यापरमाणं त्या पारद्यायनं पाटलाच्या घरी जाऊन आपली नावं नोंदवली.त्या काळात बाहेरचं कोणी गावात राह्यालं आलं की त्याची नोंद पाटलाकडं करायचे..

  November 14, 2023


लेखसंग्रह

तूप आणि त्यातील घटक

Category:

 

शुद्ध तूप हा प्राणीजन्य पदार्थ आहे. यात वनस्पती तूपचा समावेश होत नाही. दूध हा नाशवंत पदार्थ आहे, पण त्यापासून बनवलेला शुद्ध तूप हा टिकाऊ पदार्थ आहे. बाजारातून आणलेल्या शुद्ध तुपाला घरच्या तुपासारखा वास नसतो. सायीसकट कोमट दुधास विरजण लावून त्याचे दही झाल्यावर ते घुसळून वर तरंगत असलेले लोणी बाजूला काढून ते कढवितात म्हणजे उष्णता देतात. योग्य उष्णता मिळाल्यानंतर लोण्यातील पाण्याचा अंश बाष्परूपात निघून जातो, वर बुडबुड्याच्या स्वरूपात दुधातील काही पदार्थ वर येतात.

  November 13, 2023


लेखसंग्रह

गुहा ते घर

Category:

 

या गाण्याच्या ओळी अनेकांच्या मनाला भावणाऱ्या आहेत. घर कसेही का असेना, ती झोपडी असो वा बंगला, की अजून काही…; त्या घरात वास्तव्यास असणाऱ्या माणसासाठी ते घर विशेषच असते. कोणतेही घर असो, ते अनेक गोष्टींचा निश्चितच एक संचय असते. त्यात भाव-भावना, इच्छा-आकांक्षा, महत्त्वाकांक्षा या सारख्या संमिश्र भावना आणि क्रिया प्रतिक्रियांचा समावेश होतो.

  November 13, 2023


लेखसंग्रह

नैसर्गिक पूरक उपचार

Category:

 

आपल्याकडे एक अत्यंत वाईट गोष्ट असते. ती म्हणजे प्रत्येक जण ज्येष्ठ नागरिक उठसूठ डॉक्टरकडे धावत असतो. डॉक्टर औषध देतो. परंतु आपणास काय होते, हे पाहण्याकरिता थोडा वेळ थांबावे. घरातील वडील माणसे अथवा इतर लोक काही तरी तक्रारी सांगतात. हेच उदाहरण म्हणजे रात्री झोपतेवेळी पाणी अजिबात पीत नाही आणि हेच पायात गोळे अथवा वळ येण्याचे कारण होते.

  November 13, 2023


व्यक्ती-परिचय

भारताचे अकरावे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम

Category:

 

ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पहिली ओळख नामवंत शास्त्रज्ञ अशी असताना त्यांना राष्ट्रपती पदाची संधी मिळाली. केवळ देशातच नव्हे तर विदेशातही त्यांनी आपल्या अलौकिक कामगिरीने देशाची नवी ओळख निर्णाण करून दिली.

  November 12, 2023


लेखसंग्रह

मिलार्ड अभिक्रिया

Category:

 

मांस-मटण भाजताना त्याचा रंग का बदलतो? बरं त्याचा जो रंग बदललेला असेल, तोच रंग कायम राहत नाही. जसजसं ते भाजत जावं, त्याप्रमाणे त्याच्या छटाही बदलत जातात. असं का बरं व्हावं?

  November 12, 2023


लेखसंग्रह

प्रसार माध्यमे आणि सामाजिक भान

Category:

 

जनमत घडविण्यात आणि ‘बि’घडविण्यातही सर्वात मोठं योगदान असतं ते प्रसारमाध्यमांचं. या माध्यमात असलेल्या या ताकदीमुळेच त्याला लोकशाहीच्या चौथ्या खांबाचा दर्जा मिळाला. जगभरातल्या सर्वच देशांमध्ये कमी अधिक प्रमाणात प्रसारमाध्यमांची हीच भूमिका राहिली आहे. इंटरनेटचा वाढता वापर, सहज उपलब्ध होणारे स्मार्टफोन आणि सोशल मीडियामुळे प्रसार माध्यमांचं सर्व गणितच बदलून गेलंय.

  November 12, 2023


लेखसंग्रह

विड्याचा लाल रंग

Category:

 

विडे अनेक प्रकारे आवडीनुसार बनवले जातात, खाल्ले जातात आणि खिलवलेही जातात. पण लक्षात राहातं, ते विड्यामुळं लाल झालेलं तोंड.

  November 11, 2023