लेखसंग्रह

ऊर्जा येते तरी कुठून?

Category:

 

अर्थात त्यांच्याबरोबर ही कामे करताना माझी खूपच धावपळ व्हायची. कधी कंटाळाही यायचा. मात्र अंक प्रसिद्ध व्हायच्यावेळेस इतका उत्साह असायचा की जणू नवं अपत्यच बघायला मिळणार आहे. त्याची नाकीडोळी म्हणजेच अंतरंग बघून समाधान व्हायचं.

  December 18, 2022


लेखसंग्रह

पासपोर्ट-व्हीसा-दूतावास

Category:

 

आजकालचा महत्त्वाचा दस्तावेज आणि परवलीचा शब्द म्हणजे पासपोर्ट. याच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडला आहे. पासपोर्ट म्हणजे पारपत्र. आपला देश पार करून दुसऱ्या देशात जर आपणाला जायचे असेल तर आपल्या सरकारकडून मिळालेली रितसर लेखी परवानगी म्हणजेच पासपोर्ट. कोणत्याही भारतीय नागरिकास हा पासपोर्ट मिळू शकतो.

  December 17, 2022


लेखसंग्रह

कोंकणातील मंदिरे काल, आज आणि उद्या

Category:

 

कोकणात आढळणाऱ्या मंदिरांमध्ये मुख्यतः ग्रामदेवतेचे मंदिर महत्वाचे असते. त्याव्यतिरिक्त काही खाजगी मंदिरे सुद्धा आहेत. आज नोकरी व्यवसायाची साधने बदलल्यामुळे कोंकणातील बहुसंख्य लोक शहराकडे स्थायिक झाले आहेत. पण आपल्या गावाकडील ग्रामदेवतेचे मंदिर हा त्यांच्या जिव्हाळयाचा विषय आहे. कोकणातील मंदिरांमध्ये साजरे होणारे सण उत्सव, जत्रा यांच्या प्रथा-रूढी आणि परंपरांमुळे समाजातील एकोपा आणि बांधिलकी टिकून राहण्यास मदत होते.

  December 16, 2022


लेखसंग्रह

शेअर मार्केटशी मैत्री

Category:

 

अनेकदा कंपन्या भांडवल वाढीसाठी पब्लिक ऑफर न आणता कंपनीच्या भागधारकानाच नवीन समभाग अग्रहक्काने विकतात. बहुतेकदा अशा वेळी ऑफर करण्यात आलेले शेअर प्रचलित बाजारभावापेक्षा कमी असतात. त्यामुळे भागधारक ही ऑफर स्वीकारतात व कंपनीची भांडवल उभारणी होते.

  December 15, 2022


लेखसंग्रह

भोजनशास्त्र

Category:

 

प्राचीन काळात भारतवर्षात पाकशास्त्रसुद्धा अत्यंत समृद्ध होते. अनेकविध शेकडोंच्या संख्येने असलेले पदार्थ, खाण्याच्या पद्धती व भोजनविधी यांनी प्राचीन पाकशास्त्र संपन्न आहे.  भोजन शुद्ध, स्वादिष्ट व हितकर होण्यासाठी ज्याप्रमाणे पदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष द्यावे लागते, तेवढेच महत्त्व भोजनासाठी उपयोगात आणल्या जाणार्या पात्रांबाबत (भांड्यांबाबत) सुद्धा लक्ष द्यावे लागते.

  December 14, 2022


लेखसंग्रह

कोकणातील मंदिर वारसा

Category:

 

कोकण हा जसा निसर्गाने नटलेला प्रदेश आहे, तसाच तो असंख्य चालीरीती, रूढी-परंपरा आणि विविध मूर्ती आणि मंदिरांनी सजलेला प्रदेशही आहे. कोकणातली बरीच मंदिरे अगदी साधीसुधी कौलारू असली तरी त्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या कथा खूपच रोमांचक असतात.

  December 13, 2022


लेखसंग्रह

डिजिटल रुपया आणि डिजिटल बँकिंग

Category:

 

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी संयुक्तपणे ‘लेस कॅश व्हीजन 2018’ असे पत्रक तयार केले. ज्यात ग्राहकांसाठी मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. डिजिटल बँकिंग आणि डिजिटल रुपी लोकप्रिय करण्यासाठी केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक सातत्याने प्रयत्न करताना दिसतात. त्यामध्ये व्यापारी बँकांचाही फार मोठा सहभाग व सहकार्य आहेच.

  December 12, 2022


लेखसंग्रह

ज्येष्ठांसाठी व्यायाम

Category:

 

माणसाचा पाठीचा कणा जितका लवचिक व बळकट तितके एकूण आरोग्य व जीवनाची दोरी मजबूत, असे वैद्यकशास्त्र मानते. कारण शरीरातील एकूण 639 स्नायूंपैकी 66 टक्के स्नायू पाठकण्याभोवती कार्यरत असतात. खूप दगदग झाली, प्रवास झाला, की कधी एकदा अंथरुणावर पाठ टेकतो असे आपल्याला होते.

  December 11, 2022


लेखसंग्रह

भारतीय अर्थव्यवस्था, बँकिंग क्षेत्र, सहकारी बँकिंग क्षेत्र, उद्योग व्यवसाय याबाबत…

Category:

 

भारत हा प्रामुख्याने गरिबांचा देश. युरोपीय किंवा अमेरिकन देशातील लोकांकडे ज्याप्रमाणे आर्थिक सुबत्ता असते, तशी आर्थिक सुबत्ता आपल्या देशातील नागरिकांकडे नसते. त्यामुळे, भारतातील सामान्य जनतेकडे उद्योग उभारणीसाठी पुरेसे भांडवल उपलब्ध नसते. म्हणूनच आर्थिक संस्थांकडून उद्योग व्यवसायाला कर्ज पुरवठा केला गेला. त्यामुळे उत्पन्नाचा स्तर वाढला. जनजीवन सुसह्य झाले. यामध्ये बँकांचा वाटा मोठा आहे. बँकिंगमुळेच उद्योग व्यवसायाला गती प्राप्त झाली. 1969 मध्ये झालेल्या बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतर, बँकांनी भरीव कामगिरी केली. खेडोपाडी, अनेक शहरांमध्ये बँकांच्या शाखांचे जाळे वाढले.

  December 11, 2022


लेखसंग्रह

कोकणातील लोक संस्कृती आणि परंपरा

Category:

 

चित्रकथी कलाकार मूळचे महाराष्ट्रातील नसून ते भटकत भटकत महाराष्ट्रात आले. राजाश्रय मिळविण्यासाठी चित्रकथांची निर्मिती झाली. सावंतवाडीचे संस्थानिक खेम सावंत, शिवराम राजे यांच्या अश्रयाने ते तिथे कायम स्वरूपी वस्ती करून राहिले आणि हळूहळू ती कला बहरत गेली. बहरलेली ही कला पाहून खूष होऊन राजांनी या कलाकार मंडळींना ठराविक देवळे वतन म्हणून दिली.

  December 9, 2022