लेखसंग्रह

तुझं-माझं नाही; तर आपलं महत्वाचं

Category:

 

“मी आणि माझं” ह्या भावविश्वात अडकलेल्या व्यक्ती सहजीवानांत सकारात्मकता आणू शकतातच असं नाही. केवळ स्वतःपेक्षा दुसऱ्याचा, इतरांचा विचार करणारी व्यक्ती नकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरत नाही. “अनेकदा मला खूप काही करायचं असतं, पण सहकार्यच मिळत नाही”, असे सूर अनेकांच्या तोंडून निघत असतात.

  March 3, 2022


लेखसंग्रह

प्रत्येकाची आनंदाची व्याख्या निराळी

Category:

 

दैनंदिन जीवनांत आपण काहीतरी शोधत असतो. हा शोध नेमका कशाचा असतो ह्याचा अंदाज काहीवेळा येत नाही. खरं तर हा शोध आनंद प्राप्तीचा असतो. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या जशी निराळी असते, तशीच अनुभूती देखील वेगवेगळी असते. आपापल्या अनुभूती आणि प्रचीतीनुसार आपली आनंदाची व्याख्या तयार होत असते. आनंद आपल्या अंतरंगात निर्माण होत असतो.

  March 2, 2022


लेखसंग्रह

सकारात्मक सहजीवन

Category:

 

सकारात्मक सहजीवन जगता येणं ही केवळ कला नसून ते एक शास्त्र आहे, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. ह्या शास्त्रात संवाद, सहवास, सहभाग, सहकार आणि सम-भोग या बाबींचा कृतीशील विचार करावा लागतो, त्यांचा अंगीकार करणं आवश्यक ठरतं. सहजीवन सकारात्मक आणि आनंदी करण्यासाठी साथ-सोबत करणाऱ्या प्रत्येकानं कर्तव्यापोटी स्वीकारलेली जबाबदारी समसमान घेतलेली असणं अभिप्रेत आणि अपेक्षित असतं. तशी जाणीव होणं महत्वाचं ठरतं.

  March 1, 2022


लेखसंग्रह

सौंदर्याचा साक्षात्कार

Category:

 

आपल्या राहणीमानात एकप्रकारे आपलं व्यक्तिमत्व ऐट आणू शकतं. कल्पक आणि सौंदर्यपूर्ण सकारात्मक विचार, आचार आणि व्यवहार करणारं मन निश्चितच आपल्या जीवनात सौदर्याचा साक्षात्कार घडवून आणू शकतं.

  February 28, 2022


लेखसंग्रह

अंतर्मन अधिक महत्वाचं

Category:

 

अंतर्मनावर प्रतिबिंबित झालेले प्रत्येक विचार आपल्या वर्तन आणि व्यवहारांमध्ये परिवर्तन करत राहतात. अनेकदा मनांत येणारे विचार आपल्या गत अनुभवांशी निगडीत असतात तर ते काहीवेळा नजीकच्या भविष्यात काय, कसं आणि कधी घडावं ? याबद्दलचे असतात

  February 27, 2022


लेखसंग्रह

व्यक्ती तितक्या प्रकृती

Category:

 

व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे एकाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी, सवयी, मानसिकता हे देखील सर्व भिन्न असतं. या भिन्न विभिन्न मानसिकतेचा विचार करून सकारात्मकता आणि एकता निर्माण करावी लागत असते. यामध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा कस लागत असतो. अंतर्मनाच्या आणि मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून रंग शास्त्राचा खूप मोलाचा वाटा असतो. रंगांचा संबंध थेट अंतर्मनाशी असतो. विविध रंग अंतर्मनाला जाऊन भिडणारे असतात.

  February 26, 2022


लेखसंग्रह

शास्त्रीय संगीत मानसिक स्वास्थ्यासाठी सर्वोत्तम

Category:

 

आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या संगीत महत्वाचं असल्याचं आपण समजून घेतलं पाहिजे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी १५ मिनिटं संगीत ऐकल्याने आपण व्याधीमुक्त होऊ शकतो. शांत झोप लागू शकते, झोपेमध्ये शारीरिकच आणि मानसिक शांततेची तसेच विश्रांतीची देखील जरुरी असते.

  February 21, 2022


लेखसंग्रह

मनावर ताण नाही; ताबा असणं महत्वाचं…

Category:

 

कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी समजून घेऊन आपापसातील संवादात सकारात्मक शब्दप्रयोग केले पाहिजेत. मनाला मन:पूर्वक मानलं, समजून घेतलं, मोकळं केलं, आनंदी ठेवलं, तंदुरुस्त ठेवलं, सकारात्मक विचारांमध्ये गुंतवलं आणि नकारात्मक विचारांपारून दूर ठेवलं कि फक्त आणि फक्त भरघोस घवघवीत यश, आनंदच प्राप्त होत राहतो. अशा परीस्थित मनावर ताण नाही तर ताबा असणं महत्वाचं असतं, हे समजून घेतलं पाहिजे.

  February 20, 2022


लेखसंग्रह

उपयुक्तता आणि सौदर्य ह्यांचा मिलाफ

Category:

 

गृह सजावटीसाठी उपयुक्तता आणि सौंदर्य यांची सांगड घालून संरचना करणं आवश्यक असतं. आपल्या घराचं अंतरंग सजवण्यासाठी सर्व प्रथम आपल्या अंतर्मनातील सौदर्याचा अभ्यासपूर्वक विचार केलेला असणं जरुरीचं असतं. गृहसजावटीच्या कामात निवडल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूंचा उपयुक्तता आणि सौंदर्य या दोन्हीही दृष्टिकोनातून विचार केला जाण्याची आवश्यकता असते.

  February 19, 2022


लेखसंग्रह

मनाचं घराशी नातं

Category:

 

आपल्या घराचं अंतरंग सजवण्यात आणि खुलवण्यात आपल्या मानसिकतेचा संबंध असल्यामुळे अंतर्मनाचा त्यांत मोठा वाटा असतो. आपल्या अंतर्मनाच्या सहभागाशिवाय केलेलं अंतर्गत सजावटीचं काम आपल्याच घरात आपल्याला परकेपणा निर्माण करायला कारणीभूत ठरू शकतं. अर्थात, अशी एखादीच सजावट अपवादात्मक असू शकते, की जी आपल्या अंतरंगात न डोकावता केली गेली आहे.

  February 18, 2022