काय कुत्रा पाळताय ?
Category:
साहित्य - ललित“साहेब तो जवळ येत नाही आणि येऊ पण देत नाही ,आता तुम्हीच प्रयत्न करा .” असे म्हणत त्यांनी ती ‘खाऊ ‘ची पुडी मला दिली . त्यात काय आहे हे सांगायला ज्योतिष्याची गरज नव्हती . मी पुडी उघडली ,
May 31, 2018
Category:
साहित्य - ललित“साहेब तो जवळ येत नाही आणि येऊ पण देत नाही ,आता तुम्हीच प्रयत्न करा .” असे म्हणत त्यांनी ती ‘खाऊ ‘ची पुडी मला दिली . त्यात काय आहे हे सांगायला ज्योतिष्याची गरज नव्हती . मी पुडी उघडली ,
May 31, 2018
Category:
अवर्गिकृत
May 30, 2018
Category:
साहित्य - ललितमला मुलगी असती तर तिने असेच केले असते ! माझ्या मनात विचार चमकून गेला. या चार दिवसातल्या दवाखान्याच्या वास्तवातला हा सर्वात सुंदर क्षण ! कारण माझ्या नजरेतला ‘बाप ‘ खोटा नव्हता ,आणि तिचे ते स्माईल ’कॉर्पोरेट‘ नव्हते .
May 25, 2018
Category:
साहित्य - ललितआमचं गाव या आडबाजूच्या रेल्वे स्टेशन पासून चांगलं सात आठ कोस लांब आहे . पक्कीच काय कच्चा रास्ता पण नाही . कुठं पाय वाट तर कुठं गाडी वाट इतकंच . सगळा मामला डोंगर -दऱ्याचा अन माळ रानाचा . वाटेत दिवसा अंधार वाटावा अशे निबिड जंगल ! या स्टेशन वर रात्री अकराला आणि पहाट तीन ला एक एक गाडी शिट्टी मारून जाते . बाकी शुकशुकाटच असतो .
May 22, 2018
Category:
साहित्य - ललिततुम्ही कधी ‘ दयाघन ‘ नामक संस्थेचं नाव ऐकलंय का ? मी हि काल पर्यंत ऐकलं नव्हतं . पत्रकारितेत अशा गोष्टी लवकर कानावर येतात . सध्या ती एक गुप्त संस्था आहे आणि काही निवृत्त मेडिकल संशोधक चालवतात इतकेच हाती आलंय . या ‘दयाघनावर ‘ माहिती काढून एखाद्या रविवारच्या पुरवणी साठी ढासू कव्हर स्टोरी करण्याच्या उद्देशाने मी जरा मागावर होतो .
May 21, 2018
Category:
साहित्य - ललितत्या दिवशी राधा सैरावैरा झाली होती . कोठे भटकतोय कोणास ठावूक ? असाच भटकत असतो डोंगर दऱ्यात ! काय तर म्हणे ट्रेकिंग ! पण इतके दिवस नाही रहात माझ्या पासून दूर !
May 21, 2018
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललितसाहित्यात बराचसा मान मचकुरापेक्षा माथ्ल्यामुळे मिळतो हे ध्यानात येई पर्यंत पन्नाशी आली .’ या सुरवातीच्या वाक्याने जी मनाची पकड घेतली ते ‘इत्यलम’ या शेवटच्या शब्दा पर्यंत. मुकुंदराजाच्या विवेकसिंधू पासून ते शाहिरांच्या लावण्यापर्यंतचा इतिहासाचे हे अजोड विडंबन! एक छोटेखाननी पुस्तक .फक्त शहात्तर पानांचं !विडंबन हे विनोदाच व्रात्य तरी लाडक आपत्य,याची प्रचीती देणार.
May 4, 2018
Category:
साहित्य - ललितमाझ्या लहानपणी घरापेक्षा अंगण मोठे असायचे . शिवाय घरा मागे पण मोकळी जागा असायची . तेथे गुरांचा गोठा आणि त्यात एखादी दुभती म्हैस किंवा गाय असायची . बैल बारदाना शेतात . अंगणात तुळशी वृंदावन त्याचा समोर एकाच दगडात कोरलेले नंदी आणि शिवलिंग असे . अंगणात सकाळी सडा हे नित्यकर्माचा भाग असे . संध्याकाळी कधीतरी नुसते पाणी शिंपडले जाई .तुळशी वृन्दावना समोर रोज तिन्हीसांजेला सांज वात , त्याचा समोर हात जोडून नऊवार साडीतली माझी आई , निरांजनाच्या तांबूस प्रकाशात तिचा उजळलेला चेहरा हे चित्र माझ्या मनावर कायमचे कोरलेले आहे . आम्हा लहानग्यांचा वावर घरा पेक्षा अंगणातच ज्यास्त . घर कश्याला ? तर जेवायला आणि झोपायला !
May 1, 2018
Category:
साहित्य - ललितजगाच्या पाठीवर मंचकरावांसाठी सर्वात कठीण काम म्हणजे ‘विचार करणे ‘ हेच होते , आणि वारंवार ते त्यांना करावे लागत असे . आत्ता हि ते आपल्या झुपकेदार मिशीचे डावे टोक चिमटीत धरून विचारमग्न झाले होते . चिंतेचे कारण होते कि ‘ भीमा काकीस अर्जेंट कसे बोलावून घावे ?’ असे काय कारण होते कि भीमा काकीस पाचारण करण्याची वेळ अली होती ?
May 1, 2018
Category:
साहित्य - ललितसाली एक साधी पोस्ट सुचू नये ? गणूला आजवर असा कधी प्रश्न पडला नव्हता . आता तुम्हाला ‘हा कोण बुवा , गणू ?’ असा प्रश्न पडला असेल . जर तुमचे फेसबुक असेल तर प्रश्नच नाही . तुम्ही त्याला ओळखत असणारच .! कारण त्याचा फे बु मित्रांची संख्या पावसाळ्यात तुंबलेल्या गटारा प्रमाणे ओसंडून वाहत आहे .! म्हणून ‘गणूच्या गप्पा ‘ नावाचे पेज सुरु केले . तेही लोकल लोकनेत्याच्या ढेरी प्रमाणे दिवसेंदिवस फुगतच आहे . शिवाय तो दहा बारा ग्रुपचा तो ऍडमिन आहे ! यात तुम्ही कोठे तरी असणारच कि !
April 10, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti