No Picture
साहित्य - ललित

पिंपळ्या’ ! एक लघुकथा

Category:

 

जिंदगीमे क्या खाना तो -दम -खाना , और क्या करना तो -आराम -करना ‘ हे नागूचे लाडके तत्व . कामाचा प्रचंड कंटाळा . खाऊन झोपणे . झोपेतून उठून पुन्हा खाणे . याच साठी तो जन्माला होता ! तो म्हणजे साक्षात आळस ! पण यालाही एक कारण होते .

No Picture
साहित्य - ललित

ती’ तिच्या सोबतच !

Category:

 

मला खूप लहानपणा पासून चष्मा लागलाय ,म्हणजे लावायला लागला . याला माझे क्रिकेटचे वेड कारणीभूत होते . असेन दहा बारावर्षाचा ,फॉरवर्ड शॉर्ट लेग माझी फिल्डिंग पोझिशन , नेहमीचीच . तेव्हा आजच्या सारखी हेल्मेट्स नव्हती .

No Picture
साहित्य - ललित

डिनर – एक लघुकथा

Category:

 

गाडी चालवता चालवता त्याने डॅश बॉर्डरवरल्या घड्याळावर नजर टाकली . रात्रीचे अकरा वाजून काही मिनिटे झाली होती . डोक्यात नुकत्याच झालेल्या पार्टीची धुंदी होती . पण तो परफेक्ट कंट्रोल मध्ये होता . रस्ता तसा निर्मनुष्यच होता . रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दिव्यांची निमुळती होतजाणारी रांग आणि त्यातला तो रस्ता एखाद्या स्वप्नातल्या दृष्या सारखा मोहक दिसत होता .

No Picture
साहित्य - ललित

मंचकमहात्म्य – बारक्या

Category:

 

सकाळच्या रामप्रहरी अंड्याच्या दोन पोळ्या , दोन शिळ्या भाकरी ,बचकभर जवसाची चटणी, त्यावर कच्चं तेल आणि चार पातीचे कांदे, असा ‘अल्प ‘ नाश्त्याचा मुडदा पाडून ,मंचकराव पोकळ मुठीने आपल्या भरघोस मिश्या गोंजारत चौपस बंगईवर मंद झोके घेत बसले होते . अंगणात कोवळ्या उन्हाचे कवडसे बिचकत बिचकत डोकावत होते . मधेच पायाचा हलक्यासा रेटा देऊन मंचकराव झोपाळ्याची गती कायम ठेवीत . अश्या रम्य वातावरणात आणि भरल्या पोटी डोळे जडावणे साहजिकच होते.

श्री व्यंकटेश स्तोत्र , कृपा प्रसाद आणि मी
लेखसंग्रह

श्री व्यंकटेश स्तोत्र , कृपा प्रसाद आणि मी

Category:

 

तुम्ही भलेही कट्टर ‘नास्तिक ‘ असाल , तरी तुम्हास एक विनंती आहे ,हे स्तोत्र (केवळ १०८ ओव्यांचे आहे . तुमचा फारसा वेळ घेणारे नाही ) किमान एकदा तरी वाचा , एक साहित्यिक प्रकार म्हणून किंवा एक चारोळ्याचा संग्रह म्हणून . तुम्ही एका वाचनात ‘आस्तिक ‘ होणार नाहीत ,पण वाचनातून मिळालेला आनंद अप्रतिम असेल याची खात्री मी देतो .

No Picture
लेखसंग्रह

श्री व्यंकटेश स्तोत्र , कृपा प्रसाद आणि मी

Category:

 

तुम्ही भलेही कट्टर ‘नास्तिक ‘ असाल , तरी तुम्हास एक विनंती आहे ,हे स्तोत्र (केवळ १०८ ओव्यांचे आहे . तुमचा फारसा वेळ घेणारे नाही ) किमान एकदा तरी वाचा , एक साहित्यिक प्रकार म्हणून किंवा एक चारोळ्याचा संग्रह म्हणून . तुम्ही एका वाचनात ‘आस्तिक ‘ होणार नाहीत ,पण वाचनातून मिळालेला आनंद अप्रतिम असेल याची खात्री मी देतो .

No Picture
साहित्य - ललित

टॅक्सी !

Category:

 

शंकर मुडकेचा बेचव चहा आणि तिखटजाळ सामोसा खाल्ल्याशिवाय आमच्या ऑफिसात कोणीच कामाला सुरवात करत नाही . तसा तो खाऊन आम्ही रोजच्या प्रमाणे आजही सुरवात केली . पण आज काहीसा वेगळाच दिवस होता .

No Picture
कथा

गोष्ट वाईट मुलाची आणि गोष्टीतला वाईट मुलगा

Category:

 

तो एक वाईट मुलगा होता . ‘आदर्श कथा ‘ मधल्या वाईट मुलाच्या गोष्टीतल्या सारखाच . गोष्टीतल्या मुलाचे नाव राम असते ,पण याचे नाव शाम होते . गोष्टीतल्या गोष्टी सारखी याची परिस्थिती कधीच नव्हती . म्हणजे गोष्टीतल्या रामाची आई , म्हातारी , थकलेली , अंथरुणाला खिळलेली . ‘ आता माझ मरण जवळ आलंय ! माझ्या माघारी तुझं कस होणार ?तुला कोण पहाणार ? तुझे लाड कोण करणार ? तू शाळेतून आल्यावर तुला -गाजर का हलवा -कोण करून देणार ? तुला झोपताना अंगाई कोण म्हणणार ? ‘असं म्हणून घळाघळा रडणारी असते . ( तशी ती लवकर मरत नाही म्हणा ! )

No Picture
साहित्य - ललित

शॉक

Category:

 

साला वैताग आहे ! आज पुन्हा निर्मलेने कडकड केली ! आमच्या लग्नाला आता या चोवीस मेला पाच वर्ष होतील .अजून तिच्या स्वभावात काही फरक पडत नाही . तशी ती भांडकुदळ नाही , पण भडक माथ्याची मात्र आहे . कधी कधी फारच लावून धरते , लहान मुलांसारखं . हल्ली तिला भडकायला कसलंही कारण चालत , इतकंच काय ती विनाकारण पण भडकते !पण मला त्याचे खरे कारण माहित आहे ! माझी आई ! आई माझ्या सोबत रहाते , ते तिला नको आहे ! आता मला सांगा , या उतार वयात तिने कोठे जावे आणि का ? डोळे ,कान आदू झालेत , चकरा येतात , बी. पी. ,डायबिटीज सारखे जन्माचे सोबती आहेत ! येथे शहरात डॉक्टर दवाखाना हाकेच्या अंतरावर आहेत . मी निर्मलला परोपरीने सांगून पहिले . पण समजून घेत नाही .

No Picture
साहित्य - ललित

सावज

Category:

 

सन सेट ‘पाहण्यासाठी साक्षी रिसोर्ट मधून निघाली तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते . रिसॉर्ट पासून समुद्र किनारा फक्त दोन किलोमीटर होता . संध्याकाळच्या थंड वातावरणात बहुतेक पर्यटक पायीच समुद्रा पर्यंत जात . रिसॉर्ट समोरचा छोटासा रस्ता थेट समुद्राला जाऊन भिडत होता . मध्ये खूप झाडी होती पण रात्री सात -आठ पर्यंत माणसांची वर्दळ चालू असे . पाचव्या मजल्यावरून साक्षी ग्राउंड फ्लोअरला अली तेव्हा तिच्या लक्षात आले कि मोबाईल रूम मधेच विसरलाय . ती परत लिफ्ट कडे गेली तर लिफ्ट बंद होती . लाईट गुल झाले होते ! . आता पुन्हा पाच मजले चढायचे आणि उतरायचे तिच्या जीवावर आले .’ तासा दीड तासांचा तर प्रश्न होता . साडे सहाला जरी परत निघालोतरी सात सव्वासात पर्यंत रिसॉर्टला परतु . मग निवांत ग्यालरीत बसून कोल्डकॉफी एन्जॉय करू . इथली कॉफी मात्र भन्नाट असते !’ असा काहीसा विचार करत साक्षी झाडीच्या रस्त्याला लागली .