लेखसंग्रह

बॉलीवूडची मैत्री

Category:

 

मैत्री ही फक्त गंमत मजा यासाठी न मर्यादीत रहाता, एकमेकांचा आधारवड बनू शकते, पडत्याला उभारी देउ शकते व एका ध्येयासाठी सर्वांना एकत्र आणू शकते याचे खूप सुंदर दर्शन या चित्रपटातून आपल्याला घडते. हा सिनेमा व्यवसायीक पातळीवर फार यशस्वी नसला तरी याने समिक्षक व चोखंदळ प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकली होती. फरहान (अभिनयात पदार्पण), अर्जून रामपाल, ल्यूक केनी आणि पूरब कोहली यांनी चारही मित्रांची केमिस्ट्री इतकी सुंदर दाखवलीय की हे चारजण खरेच कॉलेजपासून मित्र होते असे वाटत राहते. मैत्रीत आवडत्या गोष्टी एकत्र येउन करायला स्टेटस, वेळ व वयाचे बंधन नसते हे सिद्ध करणारा चित्रपट होता.

  August 17, 2022


लेखसंग्रह

उरी-दी सर्जीकल स्ट्राइक’

Category:

 

मला वाटते ‘उरी’ या सिनेमाने नव्या भारताने सर्जीकल स्ट्राइक्स करुन शत्रु राष्ट्रांच्या व त्यांनी पोसलेल्या दहशतावाद्यांच्या मनात धडकी भरवण्याचे व भिती बसवण्याचे जे काम केलय ते हुबेहुब या सिनेमात प्रतिबिंबीत केलय. ‘ये नया भारत है..ये घुसेगा भी और मारेगा भी..’ हे वाक्य भारतीय लष्कराने दोन सर्जिकल स्ट्राईक करुन अधोरेखित केलय. त्यामुळेच प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी हा लेख लिहीताना मला हा पूर्णतया नव्या भारताचे प्रतिनिधित्व करणारा सिनेमा वाटतो.

  August 14, 2022


लेखसंग्रह

टर्मिनेटर २ – जजमेंटल डे

Category:

 

साराह कॉनर आणि भविष्यकाळात परग्रहावरुन येणाऱ्या आक्रमणाविरुद्ध मानवी वंशाच्या लढ्याचा नेता म्हणून उदयाला येणार असणारा तिचा जॉन कॉनर हा टिनेजर मुलगा यांची ही कथा.

  August 10, 2022


लेखसंग्रह

सामना’ चित्रपटातील मास्तर

Category:

 

चित्रपटाच्या सुरवातीचा दारुड्या, मध्यंतरी सुधारलेला व हिंदुरावांच्या फॅक्टरीत काम करणारा विश्वासू पण शेवटी सत्याचा छडा लागावा यासाठी उपोषण करणारा एक चळवळ्या माणूस ही जी रेंज डॉ. लागूंनी दाखवलीय, तिला तोडच नाही.

  July 23, 2022


लेखसंग्रह

राशोमान – सत्य असत्याचा विलक्षण खेळ

Category:

 

राशोमान हा केवळ चित्रपट नाही. तो एक आरसा आहे. माणसाच्या स्वार्थी विचारांचा, आचरणाचा व दुट्टपीपणाचा.

  July 19, 2022


लेखसंग्रह

श्वास-एक ‘दृष्टी’-कोन’

Category:

 

श्वासने काय साध्य केले…तर खूप काही, असंच म्हणाव लागेल.. पन्नासएक लाखाच्या बजेटमधे बनून अडीच कोटीचा व्यवसाय २००४ मधे करणारा… शामची आई नंतर पुन्हा मराठीला सर्वोत्तम चित्रपटाचं राष्ट्रीय पारितोषिक व सुवर्णकमळ मिळवून देणारा.. अश्विनलाही उत्कृष्ठ बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार देणारा.. आणि मराठी चित्रपट क्लासेस व मासेस दोन्हीला आवडू शकतो हे दाखवून देत मराठी चित्रपटांसाठी व्यवसायीक यशाची मुहुर्तमेढ रोवणारा.. कारण हा होता..मराठी चित्रपटसृष्टीने परशाबरोबर एक मस्त शिळ घालत घेतलेला ‘एक मोकळा श्वास’..

  July 16, 2022


लेखसंग्रह

लता’

Category:

 

खचाखच भरलेल्या लोकल मधे.. घुसमटलेल्या श्वासात व घामेजल्या अंगानी उभे, प्रवास नामक नरकवास सहन करत असतो आम्ही तेंव्हा अनाहुतपणे वाजतो कोणा अगांतुकाचा फोन अन त्या गर्दीला चिरत आमच्यापर्यंत येतो तुझा स्वर “ओ पालनहारे, निर्गुण और न्यारे.. तुमरे बिन हमरा कौनो नाही..” चेह-यावर त्या स्थितीतही एक अस्फुट स्मित येते..
शेजारचा दाढीवालाही ओळख नसताना हसतो..
पुढचा प्रवास सुखकर होतो..

  July 13, 2022


साहित्य - ललित

कटींग चाय

Category:

 

काय माझे आणि या तंबीचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहेत कोण जाणे? महिन्याला सहा आकडी पगार कमविणा-या आयटी वाल्या माणसाला हा रोजंदारीवर काम करणारा पोरगा रोज स्वतःच्या हाताने बनवून कटींग चहा पाजतो…तेही फुकट.. मला तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस वाटतो..

  May 21, 2021