लेखक मुल्कराज आनंद
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteत्यांची सुप्रसिद्ध ‘ अनटचेबल ‘ ही कांदबरी १९३५ साली निर्माण झाली.. एका दलित तरुणावर ही कांदबरी आधारलेली आहे. शौचालय साफ करणाऱ्या एका तरुणाची ही गोष्ट आहे. दलितच दलितांच्या व्यथा मांडू शकतात असे तोपर्यंत मानत कारण कोणत्याही उच्च जातीच्या लेखकाने इतकी जळजळीत कांदबरी लिहिली नव्हती. ही कांदबरी भारतात आणि भारताबाहेर इतकी गाजली की मुल्क राज आनंद यांना भारताचा ‘ चार्ल्स डिकन्स ‘ म्हणून म्हणू लागले. विशेष म्हणजे ह्या पुस्तकाची प्रस्तावना त्यांचे मित्र , जगप्रसिद्ध लेखक ई . एम . फ्रॉस्टर यांनी लिहिली होती. त्यावेळी मुल्क राज आनंद यांची ओळख फ्रॉस्टर यांच्याशी टी . एस. ईलियट यांच्या पत्रिकेत ‘ क्रायटेरियोन ‘ येथे काम करताना झाली.