दिनविशेष

जागतिक किडनी दिवस

Category:

 

किडनीचं महत्त्वाचं काम आहे, शरीरातील टॉक्सिन्स पदार्थ बाहेर टाकणं. जेव्हा किडनीच्या या कामामध्ये अडथळे निर्माण होतात त्यावेळी किडमध्ये टॉक्सिन्स मोठ्या प्रमाणावर जमा होतात. त्यामुळे हातापायांवर आणि चेहऱ्यावर सूज येते.

  March 10, 2022


व्यक्ती-परिचय

अमेरिकन मार्शल आर्ट अभिनेता चक नॉरीस

Category:

 

वे ऑफ द ड्रैगन’ मध्ये चक नॉरीस यांनी ब्रूस ली यांच्या बरोबर काम केले होते. ‘कोड ऑफ साइलेंस’, ‘द डेल्टा फोर्स’ व ‘फायरवॉकर’ हे त्यांचे इतर गाजलेले चित्रपट.

  March 10, 2022


व्यक्ती-परिचय

मराठी अर्वाचीन कादंबरीचे जनक हरी नारायण उर्फ ह.ना.आपटे

Category:

 

ह. ना. आपटेंनी अनेक पुस्तकांना प्रस्तावनाही लिहिल्या. ह. ना. आपटेंनी साहित्याच्या अनेक प्रांतांत मुशाफिरी केली असली, तरी ते गाजले त्यांच्या कादंबरी लेखनामुळेच. बारा सामाजिक व अकरा ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्या सर्वच लोकप्रियही झाल्या. पण त्यांचे नाव आजतागायत गाजत राहिले, ते त्यांच्या ‘पण लक्षात कोण घेते?’ या कादंबरीमुळे. ही कादंबरी मराठी साहित्याच्या वाटचालीतील मैलाचा दगड बनून राहिली.

  March 10, 2022


व्यक्ती-परिचय

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधराराजे शिंदे

Category:

 

राजस्थान भाजपमध्ये एक नाव असं आहे, ज्याचा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनाही मानावाच लागतो. हे नाव आहे महाराणी वसुंधरा राजे. मराठ्यांच्या ग्वालियर घराण्याची कन्या असलेल्या वसुंधरा यांचा विवाह राजस्थानमधील ढोलपूरचे महाराजा राणा हेमंत सिंग यांच्यासोबत झाला. पण लग्नानंतर काही दिवसातच ते वेगळे राहू लागले. वसुंधरा राजेंचा मुलगा दुष्यत सिंग खासदार आहे. तर त्यांची बहिण यशोमती राजे शिंदे मध्य प्रदेशमध्ये मंत्री होत्या. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या त्या आत्या आहेत.

  March 9, 2022


व्यक्ती-परिचय

शिक्षणतज्ज्ञ स्नेहलता दसनूरकर

Category:

 

स्नेहलता दसनूरकर या कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होत्या. अवंतिका, आशास्थान, जिव्हाळा, प्रपंच, अजून यौवनात मी, अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या आणि इंद्रधनुष्य, लाखो बायकांत अशी, ओलावा, रुपेरी पश्चिमा, स्वामिनी, स्वामीनी, ममता, शुभमंगल, किनारा यांसारखे त्यांचे अनेक कथासंग्रह वाचकप्रिय ठरले होते. अवंतिका’ मालिका आणि ‘शापित’ चित्रपटाची कथा-पटकथा स्नेहलता दसनूरकर यांनी लिहिली होती.

  March 9, 2022


व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ क्रिकेटपटू सर व्हिवियन रिचर्ड्‌स

Category:

 

च्युइंगगम चघळत चघळत रिचर्ड्‌स नुसता मैदानात येताना दिसला की गोलंदाजांना धडकी भरायची. त्या च्युइंगगम चघळणार्या चेहेऱ्यावर एक कमालीचा थंडपणा असायचा. जंगलात सिंह जसा आजुबाजुला कोण आहे याची पर्वा न करता येतो तसा तो यायचा. तो त्या मैदानावरचा राजा असायचा. उगाचच नाही त्याला किंग म्हणायचे. त्याच्या चेहेऱ्यावर येताना कमालीचे तुच्छ भाव असायचे. तोंडातुन तो एक चकार शब्द नाही काढायचा

  March 9, 2022


व्यक्ती-परिचय

जगातील पहिला अंतराळवीर युरी गागारीन

Category:

 

१२ एप्रिल १९६१ रोजी गागारिन अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस ठरला. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने ८९ तास ३४ मिनिटे भ्रमण केले. पुन्हा प्रुथ्वी वर उतरताना सात हजार फुट उंची वरुन ते कँप्सुल च्या बाहेर येऊन पँराशुटच्या साह्याने पृथ्वी वर उतरले. या पराक्रमाबद्दल त्याला अनेक देशांचे पुरस्कार मिळाले.

  March 9, 2022


व्यक्ती-परिचय

अमेरिकन ग्रॅंडमास्टर रॉबर्ट जेम्स बॉबी फिशर

Category:

 

फिशरचे खेळणे नेहमी आक्रमक असे. त्याने कधीही प्रतिर्स्पध्याने ऑफर केलेला ‘ड्रॉ’ स्वीकारला नाही. तो शेवटपर्यंत झुंजत राही. त्याने भाग घेतलेल्या सगळ्या टुर्नामेंटस मोठ्या फरकाने जिंकल्या. त्याच्याबद्दल कॅस्पोरोव्हने म्हटलं आहे की, ‘फिशर आणि त्याचे समकालीन यांच्यातील फरक वेगवेगळ्या बुद्धिबळ जगज्जेत्यांमधील फरकांपेक्षा मोठा होता.’

  March 9, 2022


दिनविशेष

मनसेचा वर्धापनदिन

Category:

 

२००८ साली मराठीच्या मुद्द्यावर रान पेटवलं. ते नाणं खणखणीत निघालं. आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसे हरुनही जिंकणारी बाजीगर ठरली. लाखालाखाची मतं घेत मनसेनं शिवसेनेचे उमेदवार पाडले. मनसेचे तब्बल १३ आमदार निवडून आले. मुंबईत तर सहा जागा जिंकल्या. २०१० च्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले.

  March 9, 2022