चक्र चित्रपटाच्या प्रदर्शनाची ४१ वर्षे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर नाझ हे होते. या चित्रपटाची निर्मिती एनएफडीसीच्या वतीने करण्यात आली आहे. मुंबईतील झोपडपट्टीतील जीवन संघर्ष या चित्रपटात अतिशय प्रभावीपणे साकारला आहे. या चित्रपटात स्मिता पाटील (अम्माच्या भूमिकेत), नसिरुद्दीन शहा (लूका), कुलभूषण खरबंदा (अण्णा), अंजली पैंजणकर (चैन्ना) तसेच रोहिणी हट्टंगडी, रणजित चौधरी, सलिम घोष इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे अलका कुबलचीही या चित्रपटात भूमिका आहे. तेव्हा ती शाळकरी वयात होती.
April 17, 2022