व्यक्ती-परिचय

दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते जयंत देसाई

Category:

 

1930 मध्ये आलेला चित्रपट नूर-ए-वतन हा त्यांचे पहिले स्वतंत्र दिग्दर्शन असलेला चित्रपट होत. रणजीत फिल्म कंपनीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत असताना त्यांनी दोन बदमाश (१९३२), चार चक्रम (१९३२) आणि भूतियो महल (१९३२) या काही चित्रपटांचे दिग्दर्शन सहाय्य केले. पुढे त्यांनी तुफानी टोली (१९३७), तानसेन (१९४३), हर हर महादेव (१९५०) आणि अंबर (१९५२) यासह अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तानसेन चित्रपट हा १९४३ चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता.

  April 19, 2022


व्यक्ती-परिचय

जिगरबाज मल्ल गणपतराव आंदळकर

Category:

 

गादीवरील खेळाचा पुरता अनुभव नसतानाही १९६४ साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी देशाचे नेतृत्व केले. पाकिस्तानच्या मल्लाशी कुस्ती म्हटली की कुस्तीशौकिनांना चेव चढतो. एक दोन नव्हे तर तब्बल ४० पाकिस्तानी मल्लांना अस्मान दाखवून त्यांनी कोल्हापूरच्या मातीची ताकद दाखवून दिली.

  April 18, 2022


व्यक्ती-परिचय

श्रेष्ठ मराठी कोशकार यशवंत रामकृष्ण दाते

Category:

 

कर्वे यांच्या साहाय्याने तयार केलेला सुलभ विश्वकोश (१९४९–५१) सहा भागांत प्रसिद्ध झाला. महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश (२ खंड, १९४२, १९४७) आणि शास्त्रीय परिभाषा कोश (१९४८) ही याच द्वयीने निर्माण केलेली कोशसंपदा होय. दाते यांनी रा. त्र्यं. देशमुख ह्यांच्या सहकार्याने, १८१० ते १९१७ ह्या कालखंडात प्रकाशित झालेल्या मराठी मासिकांची, त्यांतील लेखांची, तसेच मराठी ग्रंथांची आणि ग्रंथकारनामांची सूची महाराष्ट्रीय वाङ्‌मयसूची (१९१९) ह्या नावाने तयार केली. शंकर गणेश दाते ह्यांनी तयार केलेल्या प्रसिद्ध ग्रंथसूचीच्या पूर्वी तशा दिशेने झालेला एक उल्लेखनीय प्रयत्न म्हणून ही सूची महत्वाची.

  April 18, 2022


व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर

Category:

 

१९९७ ला स्वतंत्रपणे दिग्दर्शन केलेल्या ‘पैज लग्नाची’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे विक्रमी १४ राज्य पुरस्कार मिळाले होते. ‘घे भरारी’ या दुसऱ्या आशयघन चित्रपटाला चित्रपती व्ही. शांताराम पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तर, ‘राजा पंढरीचा’ या भक्तीपटाला ३ राज्य पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या ‘राजमाता जिजाऊ’ हा ऐतिहासीक कशानकावर आधारित चित्रपटाला लंडनमध्येही प्रदर्शित करण्यात आलं होतं.

  April 18, 2022


व्यक्ती-परिचय

केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव अच्युत गोखले

Category:

 

नागालँडमध्ये त्यांनी पर्यावरण संरक्षण आणि लोक आर्थिक विकासाचा पाया रचला. वन आणि पर्यावरण मंत्रालयात केंद्रीय सचिव म्हणून काम करताना त्यांनी बीटी कॉटनला मान्यता दिली. ते भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्षही होते. ऊर्जा विभागात असताना त्यांनी ‘द एनर्जी रिसोर्स इन्स्टिट्यूट’ची (टेरी) स्थापना केली. निवृत्तीनंतर चेन्नईच्या एम. एस. स्वामिनाथन संशोधन केंद्रात कार्यकारी संचालक म्हणून काम करून, गुणात्मक बदल घडविला. वनस्पतींची छायाचित्रे काढणे, संगीत ऐकणे हे त्यांचे छंद होते.

  April 18, 2022


दिनविशेष

जागतिक हॅम रेडिओ दिवस

Category:

 

भारतातील एखाद्या व्यक्तीने देशातच आणीबाणीच्या प्रसंगी पाठवलेला संदेश वातावरणातील त्या वेळच्या स्थितीमुळे कदाचित मिळणार नाही; पण अनुकूल वातावरण असलेल्या कोणत्याही ठिकाणच्या “हॅम’वर तो जाऊन पोचतोच. अतिशय तातडीचा किंवा आणीबाणीचा प्रसंग असेल, तर ज्याला संदेश मिळाला तो अन्य मार्गाने मदत पोचवण्याचा प्रयत्न करतो. दुर्घटना किंवा आपत्कालीन परिस्थितीत संदेशवहनासाठी हॅम रेडिओ हे एक प्रभावी माध्यम आहे.

  April 18, 2022


व्यक्ती-परिचय

पेशव्यांचे सेनापती तात्या टोपे

Category:

 

काही काळ नानासाहेबांच्या दरबारात कारकुनी काम केल्यानंतर १८५७ साली त्यांची पेशव्यांचे सेनापती म्हणून निवड करण्यात आली आणि इथून सुरु झाला १८५७ साली नानासाहेब पेशवे, लक्ष्मीबाई यांच्या सोबत इतर सैन्याला सोबती घेऊन त्यांनी इंग्रजांविरुद्ध आघाडी उभारली. त्यांची ही आघाडी इंग्रजांवर जबरदस्तीने बरसली की त्यांनी अल्पावधीतच महत्त्वाची ठाणी इंग्रजांकडून काबीज केली. या कामगिरीमध्ये तात्या टोपेंची लढाऊ वृत्ती निर्णायक ठरली. १८५७ च्या या उठावाचा इतका जबरदस्त परिणाम शेष भारतावर झाला की अनेक ठिकाणी बंडाचे लोण वाऱ्यासारखे पसरले.

  April 18, 2022


दिनविशेष

सामना मराठी चित्रपट प्रदर्शित झाला

Category:

 

एका ध्येयनिष्ठ मास्तरने (डॉ. श्रीराम लागू) एका सहकार सम्राटाच्या (निळू फुले) अस्तित्वास दिलेले आव्हान या कथासूत्राभोवती हा चित्रपट होता. हा चित्रपट झळकला आणि नंतर २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाल्याने, या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालून तो चित्रपटगृहातून उतरवण्यात आला. विजय तेंडुलकरांची कथा-पटकथा-सवांद असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांचे होते. तर निर्मिते रामदास फुटाणे व माधव गालबोटे हे होते. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित पहिला चित्रपट. “सामना” चित्रपटाने बर्लिन महोत्सवात भारताची ‘प्रवेशिका’ म्हणून गेलेला पहिला मराठी चित्रपट मान मिळवला.

  April 18, 2022


व्यक्ती-परिचय

सवाई माधवराव पेशवे

Category:

 

सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात बारभाईच राज्यकारभार पहात होते. श्रीमंत सवाई माधवराव नाममात्र पेशवे होते. बाळाजी विश्वनाथ, बाजीराव बल्लाळ, चिमाजीअप्पा, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब, सदाशिवराव भाऊसाहेब, विश्वासराव, माधवराव यांच्यामुळेच पेशवे या तीन अक्षरांचाच भारतात दरारा निर्माण झाला होता. दिल्लीच्या लाल किल्यावर भगवे निशाण डौलदारपणे, दिमाखात फडकायला लागले. सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत महादजी शिंदे यांनी दिल्लीची पातशाही कबजात घेतली. दरमहा ६५००० रूपये तनखा ठरवून दिल्लीच्या बादशहाकडून वकील ई मुतालिक आणि मिरबक्षी अशा स्वतंत्र दोन सनदा सन १७८४ साली मिळवल्या. दिल्लीचे संस्थान झाले.

  April 18, 2022


व्यक्ती-परिचय

‘लोकसत्ता’ सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम

Category:

 

मुकुंद संगोराम हे गेली चार दशके पत्रकारितेत सक्रीय आहेत. सध्या मुकुंद संगोराम हे लोकसत्ता दैनिकाचे सहाय्यक संपादक आहेत. ते आधी तरुण भारत आणि पुणे वर्तमान या दैनिकांचे सहसंपादक होते. मुकुंद संगोराम हे समाजकारण, नागरी प्रश्न, संगीत, कला, संस्कृती या विषयावर सातत्याने लेखन करत असतात.त्यांची ‘आजकाल’, ‘समेपासून समेपर्यंत‘, ‘ख्यालिया’ ही पुस्तके प्रसिद्ध झाली असून सध्या ते‘स्वरावकाश’ या सदराचे लेखन ते करत आहेत.

  April 18, 2022