दिनविशेष

सनदी सेवा दिवस

Category:

 

भारतीय प्रशासनाचा पोलादी कणा म्हणून सनदी अधिकारी सुप्रसिद्ध आहेत. अठरापगड भाषासमूहांच्या ह्या देशाला एकत्र बांधून ठेवणारी ही पोलादी चौकट देशाच्या स्वातंत्र्यापासूनच तिच्या कामगिरीमुळे महत्त्वाची ठरली होती. देशात घटनादत्त संरक्षण असणारी सेवा म्हणजे सनदी सेवा. तिचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, व योग्य निर्णय घेताना कोणत्याही दबावाला बळी न पडता अधिकाऱ्यांनी आपले काम निष्पक्षपातीपणाने करावे, ह्यासाठी हे संरक्षण दिलेले होते.

  April 21, 2022


दिनविशेष

युध्दपट ‘हकीकत’ चित्रपटाला ५८ वर्षे पूर्ण झाली

Category:

 

हा एक उत्तम आदर्श युध्दपट म्हणून गणला जातो. या चित्रपटात बलराज साहनी ( मेजर रणजित सिंग), धर्मेंद्र ( कॅप्टन बहादूर सिंग), विजय आनंद ( मेजर प्रताप सिंग), तसेच प्रिया राजवंश, संजय खान, सुधीर, शेख मुख्तार इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत.

  April 20, 2022


व्यक्ती-परिचय

जर्मनीचा हुकूमशहा ॲ‍डॉल्फ हिटलर

Category:

 

चित्रे काढून अगर प्रारूपकाराचे (ड्राफ्ट्समन) काम करून तो जगत होता. ह्याच काळात हिटलरचा श्रमजीवी वर्गाशी संपर्क आला. ह्या वर्गाविषयी त्याला सहानुभूती वाटण्याऐवजी घृणा उत्पन्न झाली. साम्यवादविरोध तो येथेच शिकला. त्याचप्रमाणे त्यांचा ज्यूद्वेषही याच वेळी जागृत झाला. ज्यू लोकांच्या पापाचा इतिहास वाचून त्यांनी आपल्या ज्यूद्वेषाचा पाया बळकट केला. लोकशाही मार्गाचा अवलंब करणे हेही मूर्खपणाचे आहे, असे त्याचे मत बनले. हुकूमशाही सर्वश्रेष्ठ आहे हे पायाभूत सत्य हिटलर व्हिएन्ना येथेच शिकला.

  April 20, 2022


दिनविशेष

गोलमाल ‘चित्रपटाला ४३ वर्षे पूर्ण झाली

Category:

 

मुंबईत ड्रीमलॅन्ड थिएटरमध्ये या चित्रपटाने खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. या चित्रपटातील अमोल पालेकर यांची रामप्रसाद आणि लक्ष्मीप्रसाद दशरथप्रसाद शर्मा अशी दोन रुपे घेतलेली भूमिका आणि त्यांचा आपले कार्यालयीन बॉस भवानी शंकर ( उत्पल दत्त) यांच्याशी झालेला गंमतीदार संघर्ष या सूत्राभोवती हा खुसखुशीत मार्मिक मिस्कील मनोरंजक चित्रपट रंगला.

  April 20, 2022


व्यक्ती-परिचय

भारतीय साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक भारताचार्य चिंतामणराव विनायक वैद्य

Category:

 

चिंतामण विनायक वैद्य हे इतिहासाचे व्यासंगी व साक्षेपी संशोधक म्हणून ओळखले जात. ते ज्ञानमार्गी प्रज्ञावंत, ललित लेखकही होते. त्यांनी केलेले महाभारताचे भाषांतर हे त्यांचे प्रचंड वाङ्मयीन कर्तृत्व म्हणून ओळखले जाते. म्हणूनच त्यांना भारताचार्य अशी पदवी मिळाली. लोकमान्य टिळक यांनी त्यांना भारताचार्य या मानाच्या पदवीने गौरवले. वैद्य हे ‘दुर्दैवी रंगू’ ह्या त्यांच्या ऐतिहासिक कादंबरीमुळे गाजले.

  April 20, 2022


व्यक्ती-परिचय

ह. भ. प. सोनोपंत दांडेकर

Category:

 

मामासाहेबांच्या ठायी पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा गाढा व तुलनात्मक अभ्यास आणि अनुभव यांचा अपूर्व संगम झाला होता. त्यांनी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षांपर्यंत कॉलेजात विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले. दिवसा ते काम; व ते संपल्यावर श्रीज्ञानेश्वरी संबंधीच्या कीर्तनाद्वारे समाजात नैतिक व धार्मिक शिक्षण देण्याचे त्यांचे कार्य सुरू होई. ते आयुष्यभर अखंड चालू होते. शाळा-कॉलेजातील विद्यार्थी असोत, अशिक्षित वारकरी असोत किंवा व्यसनी, वाममार्गाला लागलेला मनुष्य असो, त्यांनी समाजाची पातळी उंचावण्याचे महान कार्य सातत्याने केले.

  April 20, 2022


दिनविशेष

जागतीक केळे दिवस

Category:

 

केळे बाराही महिने बाजारात मिळणारे फळ आहे. फळांमधील केळं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. केळ्यात पोटॅशियम आणि विटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. त्याशिवाय केळ्यात इतरही अनेक पोषक तत्व असतात, जी शरीरासाठी अतिशय गुणकारी असतात. त्यामुळेच कोणत्याही प्रकारचं केळं आपल्या खाण्यात सामिल केल्याने फायदे होतात. दररोज केळं खाल्याने हार्ट ॲ‍टॅकची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. त्याशिवाय केळ्याचे इतरही अनेक फायदे आहेत. अति पिकलेल्या केळ्याचे अनेक फायदे आहेत.

  April 20, 2022


व्यक्ती-परिचय

पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील आमदार माधुरी मिसाळ

Category:

 

आमदारकीच्या आधी पुणे महापालिकेत २००७ मध्ये महात्मा फुले मंडई या वॉर्डातून नगरसेविका म्हणून त्या प्रथम निवडून आल्या होत्या. त्यानंतर २००९ मध्ये त्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या. २०१४ मध्ये त्या दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झाल्या. तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुणे पर्वती मतदारसंघात माधुरी मिसाळ यांनी विजयी मिळवला.

  April 19, 2022


व्यक्ती-परिचय

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी

Category:

 

मुकेश अंबानी हे गेल्या नऊ वर्षांपासून भारतातील नंबर वनचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असून सध्या त्यांची एकूण संपत्ती २२.७ अब्ज डॉलर इतकी झालेली आहे. मुकेश अंबानींचे वडील धीरूभाई अंबानी यांनी भुलेश्वर चाळमधील छोट्याशा खोलीत आपला बिझनेस सुरु केला होता. मुकेश व अनिल यांचे बालपण देखील याच खोलीत गेले. आज मुकेश अंबानी ‘एंटीलिया’मध्ये राहात असले तरी त्यांना भुलेश्वर चाळीतील घराचा विसर पडलेला नाही. एका इंटरव्ह्यूमध्ये मुकेश अंबानी यांनी भुलेश्वर चाळ व कुलाब्यातील फ्लॅटचा खास उल्लेखही केला होता.मुकेश अंबानींकडे तीन खासगी विमाने आहेत. त्यात ३३० कोटींचे एअरबस ३१९ कॉपरेरेट जेट, ४०१ कोटी रुपयांचे बोइंग बिजनेस जेट-२ आणि ९९ कोटी रुपयांचे मिनी जेट फॉल्कन ९०० ईएक्सचा समावेश आहे.

  April 19, 2022


आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच डिकी बर्ड
व्यक्ती-परिचय

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच डिकी बर्ड

Category:

 

डिकी बर्ड उजव्या हाताने गोलंदाजी करत असत. ते राईट आर्म ऑफ ब्रेक गोलंदाज होते. १९५६-५९ यॉर्कशायर कडून ते पहिला प्रथम श्रेणीचा सामना खेळले. १२ ऑगस्ट १९६४ रोजी अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळले. १९७० मध्ये अंपायर म्हणून त्यांनी आपले करिअर सुरु केले. डिकी बर्ड हे क्रिकेटचा एवढ्या वर्षांचा काळ बघितलेला एकमेव जिवंत माणूस असावेत.

  April 19, 2022