व्यक्ती-परिचय

आयझॅक मेरिट सिंगर

Category:

 

१८३९ मध्ये सिंगर यांनी पहिल्यांदा खडकात छिद्र पाडण्यासाठी मशीन बनवली.नंतर लाकूड आणि धातू कापण्यासाठी मशीन बनवली.दरम्यान १८५१ मध्ये त्यांना शिलाई मशीन बनवायची संधी मिळाली. त्यांनी ते मशीन फक्त दुरुस्तच केले नाही, तर आणखी चांगले मशीन बनवण्याचा संकल्प केला आणि केवळ ११ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ते बनवले आणि जगासमोर सादर केले.हे यंत्र सिंगर म्हणून ओळखले जाऊ लागले.

  August 18, 2024


व्यक्ती-परिचय

ट्रेंट बोल्ट

Category:

 

टेंट्र बोल्ट वयाच्या १७ व्या वर्षीच न्यूझीलंडचा सर्वात फास्ट शाळकरी बॉलर बनला होता. ट्रेंटचा मोठा भाऊ जोनो देखील फास्ट बॉलर. ट्रेंट डाव्या हाताने फास्ट बॉलिंग आणि उजव्या हाताने बॅटींग करतो. तर जोनो त्याच्या नेमकं उलटं. उजव्या हाताने बॉलिंग आणि डावखुरा बॅट्समन. बोल्टची प्रथम २००७ साली आधी भारताच्या दौऱ्यावर जाणाऱ्या न्यूझीलंड A टीममध्ये निवड झाली होती. त्यानंतर पुढच्या वर्षी तो अंडर १९ वर्ल्ड कप टीमचा सदस्य बनला.

  August 18, 2024


व्यक्ती-परिचय

गणितयोगी डॉ. श्रीराम अभ्यंकर

Category:

 

डॉ. श्रीराम अभ्यंकर यांना गणिताचे बाळकडू त्यांचे वडील शंकर अभ्यंकर यांच्याकडून मिळालेले होते. त्यांचे वडील हे मध्य प्रदेशातील उज्जन व ग्वाल्हेर येथे गणिताचे प्राध्यापक होते. डॉ. श्रीराम अभ्यंकर यांचा पुण्याशी अतूट संबंध होता. अनेकदा ते येथे त्यांच्या बंगल्यात वास्तव्यास असत व येथे आले की, मुलांना गोळा करून गणित शिकवण्याचा मोह त्यांना कधीच आवरत नसे. इतके त्यांचे गणितावर व अध्यापनावर प्रेम होते.

  August 18, 2024


लेखसंग्रह

मुंबई मराठी साहित्य संघ

Category:

 

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यालय मुंबईतून पुण्यात हलवण्यात आल्यावर मुंबईतही तशी एक मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणारी संस्था असावी, असा ठराव १९३४ सालच्या साहित्य संमेलनात करण्यात आला. त्याच्या फलस्वरूप २१ जुलै, १९३५ रोजी मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना करण्यात आली. संस्थेचे पहिले कार्यालय संस्थापक डॉ अ.ना.भालेराव यांच्या गिरगावातील नारायण – सदन या निवासस्थानी सुरु झाले.

  August 18, 2024


व्यक्ती-परिचय

भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Category:

 

महाराष्ट्र विधिमंडळ भारतीय जनता पक्षाने त्यांची नेतेपदी निवड केल्याने ते महाराष्ट्र राज्याचे २०१४ पासून २०१९ पर्यंत ते मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात भाजपचा पहिला मुख्यमंत्री बनण्याची किमयाही त्यांनी साधली होती. फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्यातील मालगुजार कुटुंब. त्यांची भरपूर शेती आजही आहे.

  August 17, 2024


व्यक्ती-परिचय

सूत्रसंचालक व लेखक डॉ. सुनील देवधर

Category:

 

डॉ. सुनील देवधर यांनी आकाशवाणीत ३८ वर्षे काम केले. ते आकाशवाणी पुणे केंद्रातून सहायक संचालक पदावरून निवृत्त झाले. त्यांचा निवेदक ते सहायक संचालक या पदापर्यंतचा प्रवास एका हळव्या मनाचा कवी, कलाकार म्हणून जितका परिचित आहे, तितकेच त्यांची कणखर व्यक्ती म्हणूनही वेगळी ओळख आहे.

  July 27, 2024


व्यक्ती-परिचय

लक्ष्मीनारायण सुब्रह्मण्यम उर्फ एल सुब्रह्मण्यम

Category:

 

लक्ष्मीनारायण सुब्रह्मण्यम हे कुशल व्हायोलिन वादक म्हणून जगद्विख्यात आहेत. कर्नाटक शैली आणि पाश्चिमात्य शैली दोन्हींवर त्यांचं प्रभुत्व आहे. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी लोकांसमोर आपली कला सादर करून आपल्या कुशलतेची चुणूक दाखवून दिली होती. एम.बी.बी.एस डॉक्टर असलेल्या एल. सुब्रह्मण्यम यांच्या दोनशेहून अधिक रेकॉर्डस् प्रसिद्ध झाल्या आहेत.

  July 27, 2024


व्यक्ती-परिचय

नामवंत प्रसूतीतज्ज्ञ डॉ. अरविंद संगमनेरकर

Category:

 

महाराष्ट्रातील नामवंत प्रसूतीतज्ज्ञ, शतायुषी या मराठीतील सर्वाधिक खपाच्या दिवाळी अंकाचे संपादक आणि उत्तम लेखक डॉ. अरविंद संगमनेरकर यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रसूतीतज्ज्ञ म्हणून काम केले. त्यांनी महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील आरोग्य शिबिरांमध्ये सहभागी होऊन दोन लाखांहून अधिक महिलांची आरोग्य तपासणी केली.

  July 27, 2024


व्यक्ती-परिचय

रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे

Category:

 

ग्रामीण भागातील ‘रोजगार निर्मिती’ या क्षेत्रात देशातील इतर राज्यांना आदर्शकृत ठरलेल्या महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेचे जनक आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतिपद अठरा वर्षे सांभाळणारे ज्येष्ठ गांधीवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वचिंतक विठ्ठल सखाराम तथा वि. स. पागे यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते.

  July 27, 2024


दिनविशेष

न्यू इंडिया ॲ‍ॅश्युरन्स कंपनीचा स्थापना दिवस

Category:

 

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी ही भारतातील सर्वांत जुनी व मोठी विमा कंपनी आहे. सर दोराबजी टाटा यांनी २३ जुलै १९१९ रोजी या कंपनीची स्थापना केली.z

  July 23, 2024