दिनविशेष

पुण्यातील ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’चा स्थापना दिवस

Category:

 

अर्थशास्त्राच्या क्षेत्रामध्ये विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था – संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवाचाही ही संस्था उत्तम उपयोग करून घेते. या विद्यार्थ्यांच्या अनुभवाच्या आधारावर अभ्यासक्रम निर्मितीमध्ये सातत्याने नव्या मुद्दय़ांची भर घातली जाते. अशा प्रकारचे नानाविध अभ्यासक्रम आणि विषय नव्या-जुन्या विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिक पातळीवरच नव्हे, तर व्यवहाराच्या पातळीवरही तितकेच उपयुक्त ठरत आहेत. शेतीविषयक उद्योगधंद्यांमधील तसेच उद्योगांच्या अर्थकारणाचे बारकावेही या संस्थेच्या अभ्यासक्रमामधून जाणून घेता येतात. संस्थेमध्ये सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर ॲ‍्प्लिकेशन्स इन इकॉनॉमिक ॲ‍तनालिसिस हा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही उपलब्ध करून देण्यात आला आहे. संस्थेमध्ये एम. एस्सी. अभ्यासक्रमाला नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीदरम्यान इंटर्नशिपचा काळ पूर्ण करावा लागतो.

  June 6, 2022


व्यक्ती-परिचय

कसोटी क्रिकेट संघाचा उपयुक्त खेळाडू अजिंक्य रहाणे

Category:

 

२०१५ मध्ये श्री लंकेत पहिली टेस्ट खेळताना आठ कॅच पकडून त्याने विश्व विक्रम प्रस्थापित केला होता. रहाणेने या सामन्यातच्या पहिल्याि डावात करुणारत्ने, थिरिमाने, चांडीमल यांना झेलबाद केले. व दुस-या डावात प्रसाद, संगकारा, थिरिमाने, मुबारक आणि हेराथ यांनाही त्यााने झेलबाद करून तंबूत धाडले होते. नोव्हेंबर २०१९ रोजी बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रहाणेने ८६ चेंडूंत १७२ धावा फटकावत ९ वेळा चौकार मारला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे २१ वे कसोटी अर्धशतक ठरले.

  June 6, 2022


व्यक्ती-परिचय

पुण्यातील संग्राहक विक्रम पेंडसे

Category:

 

सायकली जमवता जमवता विक्रम यांच्या संग्रहात लहान मुलांच्या तीन चाकी सायकल, सायकलींचे विविध सुट्टे भाग, पेडल कार्स, कुलूपे,घड्याळे,रेडिओ, ग्रामोफोन,रेकॉर्ड प्लेअर, टाईप रायटर,टेलिफोन, विविध आकारांच्या आणि रंगाच्या काचेच्या बाटल्या, अडकित्ते आणि पानाचे डबे जुनी वजने व मापे आणि अनेक घरगुती वस्तू यांचादेखील समावेश झाला आहे.

  June 6, 2022


दिनविशेष

शिवराज्याभिषेक दिन

Category:

 

५ जून १६७४ व ६ जून १६७४: या दोनही दिवशी राज्याभिषेकाचे मुख्य विधी संपन्न करण्यात आले. अनेक नद्यांचे व समुद्राचे जल रायगडावर मागविले गेले होते. या दिवशी अनेक होमहवन करण्यात आले, यजमानांची औदुंबर शाखांचे असं करवून घेतले होते आणि मग होमहवन संपन्न झाल्यावर शिवरायांनी स्नान केले आणि अभिषेक शाळेत दाखल झाले आणि तेथील सिंहासनावर आरूढ झाले. मग ब्राह्मणांनी मंत्रांच्या घोषात शिवरायांवर अभिषेक केले. या अभिषेकावेळी शिवरायांचा हात धरून ब्राह्मणांनी ‘महते क्षत्राय महते अधित्यात महते जानराज्यायेष व भरता राजा सोमोअस्माकं ब्राह्मणानांच राजा’ अशी घोषणा केल्याचा उल्लेख देखील सापडतो. (मराठ्यांचा इतिहास, रा.वि. ओतूरकर)

  June 6, 2022


दिनविशेष

जागतिक पर्यावरण दिन

Category:

 

सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय.

  June 5, 2022


व्यक्ती-परिचय

विमामहर्षी अण्णासाहेब चिरमुले

Category:

 

अण्णासाहेब हि कंपनी सुरु करण्यासाठी तयार झाले मात्र त्यापूर्वी त्यांनी १९१० ते १९१२ पर्यंत या इन्शुरन्स व्यवसायांवरील पुस्तके अमेरिकेतून मागवून त्यांचा सांगोपांग अभ्यास केला. त्यांचे मित्र वामनराव गोवईकर यांनी त्या काळी पंचवीस हजार रुपयांचे रोखे कंपनीस दिले. त्या बळावर कंपनी मुंबईस रजिस्टर झाली आणि मगच १९१३ सातारा शहरात ‘वेस्टर्न इंडिया लाइफ इन्श्युरन्स कंपनी’ची (विलिको) अस्तित्वात आली.

  June 4, 2022


व्यक्ती-परिचय

प्रवीण मसाले ब्रॅन्डचे संस्थापक हुकमीचंद चोरडिया

Category:

 

९६० मध्ये त्यांनी ‘प्रवीण मसाले’ या नावाने त्यांनी व्यवसाय सुरु केला. पहिली दहा वर्षे अत्यंत कष्ट करुन पुढे हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट येथेच त्यांनी मोठी जागा घेऊन १९७२ मध्ये या व्यवसायाचा विस्तार केला.१९७६ मध्ये सुमारे ५०० किलो लोणचे तयार करुन त्यांनी बाजारात ‘प्रवीण’ ची उत्पादने विक्रीसाठी आणली.

  June 4, 2022


व्यक्ती-परिचय

नाटककार, दिग्दर्शक व रंगकर्मी योगेश सोमण

Category:

 

आज त्यांची प्रथितयश रंगकर्मी म्हणून ओळख असली तरी, नाटक हा त्यांचा लहानपणापासूनच पिंड नव्हता. लहानपणी त्यांना हॉकी आणि बॅडमिंटनची आवड होती. त्यात त्यांनी नैपुण्यही मिळवले होते आणि याच जोरावर त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही बॅडमिंटन मध्ये आपल्या खेळाचा ठसा उमटवला.

  June 4, 2022


व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते विजय कदम

Category:

 

विजय कदम यांचे ‘अपराध कुणाचा’ हे पहिलं व्यावसायिक कुमार नाटक होते.पुढे ‘स्वप्न गाणे संपले’ या नाटकात सतीश दुभाषी, जयराम हर्डीकर, शिवाजी साटम अशा प्रतिथयश कलावंतांसोबत काम करावयास मिळालं. ‘खंडोबाचं लगीन’ या जागरण विधी नाटकाने विजय कदम यांना नाट्य दर्पणचा ‘सर्वोत्कृष्ट लोकनाटय अभिनेता’ हा पुरस्कार मिळवून दिला. रथचक्र, घरटे आमुचे छान, वासुदेव सांगती, अशी व्यावसायिक नाटके करता करता टूरटूर या नाटकाने मात्र जबरदस्त लोकमान्यता मिळाली. तर विच्छा माझी पुरी करा या लोकनाटयाने राजमान्यता दिली.

  June 4, 2022