“आमची माती आमची माणसं” कृषीविषयक कार्यक्रम घराघरात पोहचवणाऱ्या शिवाजी फुलसुंदर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteशिवाजी फुलसुंदर हे शेतकरी कुटुंबातून आलेले असल्याने शेतकरी बांधवांना नेमके काय हवे याची त्यांना जाणीव होती. गावाशी घट्ट नाळ जोडलेली असल्याने शेतक-यांच्या प्रश्नांची दाहकता त्यांनी अनुभवली होती. सर्व प्रथम त्यांनी ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रमाचे शीर्षक गीत ज्येष्ठ कवी गीतकार शांतारामजी नांदगांवकर यांच्या सहकार्याने साकारलेले हे शीर्षक गीत “ही काळी आई,धन धान्य देई, जोडते मनाची नाती,आमची माती आमची माणसं,” घराघरात पोहचलेल आहे. या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी विविध कृषीविषयक कार्यक्रमांची निर्मिती अनेक वर्षं केली आहे. शिवाजी फुलसुंदर यांनी १९८५ साली ‘गप्पागोष्टी’ हे नवीन सदर सुरू केले.