c-profiles-site
दादोबा पांडुरंग तर्खडकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteगुजराती व फार्सी भाषा त्यांना अवगत होत्या. सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध हुद्यांवर त्यांनी काम केले,
दिगंबर बाळकृष्ण मोकाशी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteलामणदिवा हा १९४७ साली प्रसिध्द झालेला मोकाशी यांचा हा पहिलाच कथासंग्रह. रोजच्या जीवनातल्या साध्यासुध्या प्रसंगांतून आकारणारी लेखकाची कथा सौम्य आणि संयत प्रकृतीची आहे. ह्या पुस्तकात प्रारंभी ‘ पहिली पावले’ ह्या शीर्षकाखाली त्यांनी आपल्या लेखनाच्या सुरुवातीच्या कालखंडाविषयी लिहिले आहे. तेही कथेइतकेच रंजक आहे.
दा. कृ. सोमण
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteठाणे शहर हे ज्याप्रमाणे संस्कृती कला, परंपरा यांचा आदर करतं त्याचप्रमाणे विज्ञान, तंत्रज्ञान यांचीही कास ठाण्यानी धरली आहे. याचीच साक्ष देतात ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ म्हणून बिरुद मिळालेले श्री. दा.कृ. सोमण.
दत्तात्रेय श्रीधर खटावकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteड्रॉइंग आणि पेंटिंग, उपयोजित कला, आर्ट टीचर्स डिप्लोमा, विविध छंद वर्ग अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करताना खटावकर हे स्वत:ही समृद्ध होत गेले आणि त्यांच्या ज्ञानाने सलग २५ वर्षे सध्या कला क्षेत्रात नावाजलेले कलाकार विद्यार्थीही घडले.
दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteदत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी हे मराठी कवी व साहित्य समीक्षक आहेत. दभि कुलकर्णी या संक्षिप्त नावाने ते प्रसिद्ध आहेत. पुणे येथे २०१० साली झालेल्या ८३व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते.
दत्ताराम मारुती मिरासदार
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला.
दादासाहेब लिमये
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteबडबड नको कृती हवी’ ही म्हण तर आपल्या सर्वांना परिचीत आहेच. परंतु ही म्हण दुरदूरच्या आदिवासी पाड्यांच्या नसानसांत भिनवून, व शिक्षणाचे सार्मथ्यशाली वारे खेड्यापाड्यांमधील आदिवासी लोकांपर्यंत पोहचवून त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे असामान्य कार्य तपस्वी केशव गोविंद तथा दादासाहेब लिमये यांनी पाली येथे केले.
दादाजी खोब्रागडे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteघरी अठराविश्वे दारिद्य असलेल्या दादाजी खोब्रागडे या कृषी संशोधकाने अवघ्या दीड एकर शेतीत तांदळाची तब्बल नऊ वाणे विकसित केली आहेत. त्यांच्या या संशोधनाकडे राज्य सरकारने पाठ फिरवली असली तरी जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने या कृषी संशोधकाची दखल घेतली आहे. फोर्ब्सने जगभरातील ग्रामीण उद्योजकांची एक यादी प्रसिद्ध केली आहे, त्यात चंदपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या आडवळणाच्या गावात राहणार्या दादाजी खोब्रागडे यांचादेखील समावेश करण्यात आला आहे.