भारतमातेच्या वीरांगना – २९ – दुर्गावती वोहरा (दुर्गा भाभी)
Category:
अवर्गिकृतनौजवान भारत सभा च्या त्या सक्रिय सदस्या होत्या . त्यांच्या कार्याची सुरवात अगदी लवकरच झाली होती तरी त्यांच्या कामाचा परिचय तेव्हा झाला ज्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली करतार सिंग सारबा (ज्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले) ह्यांची ११ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
श्री विमल प्रसाद जैन ह्यांचा बॉम्ब बनविण्याचा कारखाना होता, ‘ हिमालयन टॉयलेट्स’ ह्या नावाखाली. दिखाव्या साठी काही और बनायचे आणि प्रत्यक्षात तिथे बॉम्ब बनविले जायचे. दुर्गा भाभी आणि त्यांचे पती श्री बोहरा दोघे जातीने तिथे मदत करायचे.