लेखसंग्रह

वरजिनिया हॉल- दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

Category:

 

दुसऱ्या महायुद्धात ज्या काही वीरांगना होऊन गेल्या त्यामध्ये एक महत्वाची होती ती म्हणजे वर्जिनिया हॉल.तिचा जन्म बाल्टिमोर येथे  ६ एप्रिल १९०६ रोजी झाला.कोलंबिया विद्यापीठात तिचे शिक्षण झाले. तीचे फ्रेंच,इटालीयन,जर्मन भाषेवर प्रभुत्व होते.फेब्रुवारी १९४०च्या सुरवातीला तिने फ्रांस सैन्यामध्ये रुग्णवाहिका ड्रायव्हर म्हणून काम केले.फ्रान्सचा पाडाव झाल्यावर ती स्पेनला गेली.तिथे तिची ओळख ब्रिटीश गुप्तहेर,जॉर्ज बेलोस याच्याशी झाली. तो तिच्या व्यक्तिमत्वाने अतिशय प्रभावित झाला. वर्जिनिया हॉल-(SOE) मध्ये एप्रिल १९४१मध्ये दाखल झाली.

अवर्गिकृत

संकल्प

Category:

 

का करतो आपण संकल्प ?केवळ नवीन वर्षात आपण काही करणार आहोत हे इतरांना सांगण्यासाठी ,दाखवण्यासाठी -की खरोखरच आपण त्यावर गंभीर विचार करून आपल्या आयुष्याला एक निश्चित दिशा देण्याचा प्रयत्न करतो-एक सुनिश्चित मार्ग आखून त्याप्रमाणे जीवन जगण्याचा विचार करत असतो..

लेखसंग्रह

लिस बेसाक – दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

Category:

 

लिस बेसाक चा  जन्म मॉरिशस मध्ये ११ मे १९०५ साली  झाला. तिचे कुटुंब लॅंडलॉर्ड होते.  ते १९१९ मध्ये पॅरिसला स्थलांतरित झाले.तिचे गुस्ताव वेलीमर याच्याशी प्रेम जुळले. यावर तिची आई नाराज होऊन तिने तिला इटलीला पाठवले. पुढे लिस पॅरिसला परतली.ती व तिचा भाऊ क्लाउड लपतछपत १९४१ मध्ये स्कॉटलंडला पोहोचले.तिला डेली स्केच दैनिकात नोकरी मिळाली व भाऊ  एसओई(गुप्तहेर संस्था) मध्ये भारती झाला.

लेखसंग्रह

योलन्ड बिकमन –दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

Category:

 

बिकमनचा जन्म पॅरिस येथे ७ जानेवारी १९११ रोजी झाला.लहानपणी त्यांचे कुटुंब लंडन येथे स्थायिक झाले. शाळेत शिकत असताना तिचे इंग्रजी फ्रेंच व जर्मन वर प्रभुत्व होते. इंग्लंड मध्ये शिक्षण झाल्यावर तिला स्विस स्कूल मध्ये धाडण्यात आले. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर तिला वुमन एअर फोर्स मध्ये पाठवण्यात आले.तिला तेथे रेडियो ऑपरेटरचे प्रशिक्षण देण्यात आले.कारण तिचे तिन्ही भाषेवर प्रभुत्व होते. बिकमन १५ फेब्रुवारी १९४३ रोजी एसओई मध्ये भारती झाली.तिने सार्जंट जाप बिकमनशी १९४३ मध्ये लग्न केले. त्याच्याशी तिची प्रशिक्षणाच्या वेळी ओळख झाली.

लेखसंग्रह

मडेलिना सेरसूओलो दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

Category:

 

मडेलीना चा जन्म 2 फेब्रुवारी 1920 रोजी नेपल्स इटली येथे एका मध्यमवर्गीय कामगारांच्या पोटी झाला.तिचे वडील कारलो कूक होते. ते एका कंपनीत काम करत होते ती कंपनी बंड पडली. त्यानंतर त्यानी स्वताचे पिझ्झाचे दुकान काढले. जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा मडेलिना एका बुटांच्या कंपनीत काम करत होती.

कथा

भिंतीवरचा तिचा फोटो 

Category:

 

कालची रात्र प्रचंड अस्वस्थतेत गेलेली .
मन सुन्न आणि मेंदू बधीर अवस्थेत गेलेला .
डिलीट केल्यानंतरसुद्धा अजूनही
व्हिडिओतले ते दृश्य डोळ्यांसमोर सारखं उभं राहतंय .
भयभीत करणारं .
हृदयाचे ठोके थांबवणारं .
नजरेत अंगार निर्माण करणारं.