c-oldsite
गृहनिर्माण संस्थाना लागू नसलेले कलम
Category:
अवर्गिकृतमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० हा महाराष्ट्रातील सर्व सहकारी संस्थाना लागू होतो. परंतु सहकार कायद्यातील काही कलम, गृहनिर्माण संस्थेला लागू होत नसल्याने, २०१९ च्या नवीन सुधारणेनुसार काही कलम हे पूर्णपणे गृहनिर्माण संस्थाना लागू होत नाहीत. तर कोणते आहेत ते कलम? सदस्यांच्या विनंतीवरून आजच्या लेखात, गृहनिर्माण संस्थेला लागू नसलेले अधिनियमातील कलम याबाबतची माहिती सदर लेखामधून देत आहे.
पेबेलॉकॉन आयलंड
Category:
अवर्गिकृतमागील तीन महिन्यात जहाजावरुन दिसणाऱ्या बेटाचे ज्याचे नाव पेबेलॉकॉन आयलंड आहे त्याच्याबद्दल सगळ्यांकडून खूप ऐकले होते. जहाजावरुन आयलंड दिसायचं पण थोडंसंच. पाण्याच्या वर तरंगणारी थोडीशी हिरवीगार झाडी आणि एका चिमणीतून जळणाऱ्या गॅसची एक तांबडी फडफडणारी ज्वाला. रात्रीच्या निरव शांततेत आणि अंधारात तर ही ज्वाला आणखीनच प्रखर दिसायची.
सहयोगी सभासद
Category:
अवर्गिकृतगुगल आपल्याला असंख्य माहिती पुरवतो. परंतु अचूक माहिती हवी असल्यास वाचनाची सवय असायलाच हवी आणि कायद्यात एकदा वाचले म्हणजे सर्व समजले असे नाही. तर अपडेट राहणे हे आवश्यक असते. काल एका संस्थेत मला संस्थेच्या पदाधिकार्यांनी, त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे माहित करण्यासाठी बोलावले होते. त्यांचे असे म्हणणे होते की, दोन व्यक्तीनी मिळून जर सदनिका विकत घेतली असेल तरी दुसरे नाव करारात असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवण्यासाठी सहयोगी सदस्यचा फॉर्म संस्थेत सादर करावाच लागेल. तुम्हीसुद्धा वरील समितीच्या पदाधीकार्याबरोबर सहमत आहात का? तुम्हाला कधी काय बदल झाले याची माहिती सदर लेखात खास आपल्यासाठी दिली आहे.
सेकंड इंजिनियर
Category:
अवर्गिकृतदुपारी एक वाजता जाणाऱ्या सेकंड इंजिनियर कडून हॅन्ड ओव्हर आणि माझ्याकडून टेक ओव्हर सुरु झाले. खाली इंजिन रूम मध्ये वेगळी लिफ्ट मेन डेकवरून खाली इंजिन रूम चे पाच मजले. दुसऱ्या मजल्यावर कंट्रोल रूम च्या खाली आणखी तीन मजले.
शतायुषी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
Category:
अवर्गिकृतशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांच्यावर मराठीसृष्टीच्या लेखकांनी लिहिलेल्या काही लेखांचे हे संकलन….
गृहनिर्माण संस्थेतील सदस्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेचे हस्तांतरण अधिनियमाबाबत
Category:
लेखसंग्रहसोशल मिडिया वर सारखे फॉरवर्ड केले जाणाऱ्या मेसेज मध्ये वरचा क्रमांक लागतो तो “गृहनिर्माण संस्थेत सदस्याच्या मृत्युनंतर हितसंबधाचे हस्तांतरण कसे करावे ” यात अनेक व्यक्ती चुकीचा सल्ला देतात. त्यांना कायद्याचे पुरेसे ज्ञान नसते आणि माहीत नाही हे सांगायला कमीपणा वाटतो. नेहमी कायदेतज्ञ यांचा सल्ला देऊन कागदपत्र केलेले कधीही चांगले. फास्ट फूडची चटक असल्याने सर्व फास्ट करण्यासाठी कायदेतज्ञ यांच्याकडे न जाता गुगलवर शोधून निर्णय घेणारे महाभाग आजही कमी नाहीत असो. आज वरील विषयावर आपणास खालील लेखात माहिती दिली आहे.
संस्थेच्या २५० पेक्षा कमी सभासदांसाठीची निवडणूक नियमावली मंजूर
Category:
अवर्गिकृतनियमावली नसल्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. राज्यातील २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांची निवडणूक घेण्याबाबत नियमावली मंजुर करण्यात आली. परंतु, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३ क मधील तरतुदीनुसार, राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीत जनहिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या ३१ ऑगष्ट पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका या ३१ ऑगष्ट नंतरच घ्यावी लागणार आहे. राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पडण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक)नियम, २०१४ मधील नियम ४ मध्ये सहकारी संस्थांचे ‘अ’, ‘ब’, ‘क’, व ‘ड’ असे प्रकार करण्यात आले होते.
जॉइनिंग ऑनबोर्ड
Category:
अवर्गिकृतजकार्ता सोडल्यावर बोट निघाल्यापासून तासाभरात निळ्याशार समुद्रात गेल्यावर वारा आणि लाटांमुळे बोट रोलिंग करायला म्हणजेच घड्याळाच्या दोलका प्रमाणे इकडून तिकडे हलायला लागली होती. सकाळचे सव्वा आठ की साडेआठ वाजता बोटीत येऊन सीटवर बसल्या बसल्या थंडगार एसी मुळे जी झोप लागली ती दोन तासांनी अनाउन्समेंट झाली नसती तर कदाचित उडाली नसती.
तेरीमा कसीह
Category:
अवर्गिकृतडिपार्चर नंतर अरायव्हलला पब्लिक ऍड्रेस सिस्टिम वर इंडोनेशियन भाषेत अनाउन्समेंट झाल्यावर तेरीमा कसिह हा शब्द ऐकला. तोच शब्द विमानातून बाहेर पडताना एअरहोस्टेस सगळ्यांना बोलत होती. तेरीमा कसिह या इंडोनेशियन शब्दाचा अर्थ म्हणजे धन्यवाद.