लेखसंग्रह

सरकारी कार्यालयातला ‘गटारी’ भ्रष्टाचार !

Category:

 

…सरकारी कार्यालयाचे वाॅचमन, कार्यालयातील शिपाई, लिफ्टमन आदींचं समाधान दोन-पाचशे रुपयांच्या वर्गणीवर होतं. कारण त्यांची मजल तेवढीच असते. तेवढ्यावर मिळणारं एखादं गटार त्यांना पुरेसं असतं. खरी गटारी तर त्यांच्या पुढच्या डेसिग्नेशन्सवर असलेल्यांची आणि त्यांची तिथे नेमणूक करणार्‍या राजकारण्यांची असते. हे गटारी निमित्त वर्गणी वैगेरे काढत नाहात. ते एका दिवसाच्या गटारीवर समाधानीही नसतात. त्यांची गटारी वर्षभर सुरुच असते आणि लोळण्यासाठी गटारं असतात, ती ‘लाचे’ची, कॅश आॅर काईंड आॅर बोथ..! ही गटारं साधी, झोपडपट्टीतल्यासारखी गरजेपोटी निर्माण झालेली नसतात, तर मुद्दामहून तयार केलेले परंतू वरून गुळगुळीत गिलावा केलेले मोठे, गलित्छ नाले असतात…

  July 26, 2017


लेखसंग्रह

मन कि बात – तज्ज्ञ

Category:

 

तज्ज्ञ’ या कुळाबद्दल मला नितांत आदर वाटतो. मलाही त्यांच्याप्रमाणे तज्ज्ञ होता यावं यासाठी मी नेहेमी प्रयत्नशील असतो. तज्ज्ञ कसं होता येतं, हे मला फारसं कळत नसलं तरी त्यासाठी खुप म्हणजे खुपच अभ्यास करावा लागतो हे ऐकीव माहित होत. अभ्यास, तो ही साधासुधा नव्हे, तर जाड जाड ग्रंथातून, हे ही ऐकुनच माहित होतं. असं काहीबाही ऐकून माझी छाती (फक्त ३५ इंचं असलेली) दडपून जाते.

  July 26, 2017


लेखसंग्रह

मन कि बात – नागडे

Category:

 

मित्रांनो, हा व्हिडीयो एका दिड-दोन वर्षाच्या लहान मुलाचा होता. नागड्या बाळकृष्णासारखा असलेला हा गोंद्या, स्वत:च चड्डी घालायची खटपट करत असतो. कशासाठी याची जाणीव त्याला नसली, तरी चड्डी घालायला हवी याची त्या छोट्या गोंद्याला जाणीव आहे. चड्डी घालण्याचा ते बाळ जो प्रयत्न करतं ना, ते पाहून मख्ख विद्वान चेहेऱ्यावरपण आपसूक हसू येईल.

  July 26, 2017


लेखसंग्रह

फेसबुक, अश्लीलता आणि माझं ब्लाॅक केलं गेलेलं फेसबुक खातं !

Category:

 

घट्ट स्लॅक आणि टाईट कुर्ता घातलेली, चालती-फिरती आधुनिक जिवंत ‘शिल्पं’, त्या प्राचिन दगडी शिल्पांचीच आठवण करून देतात. अश्या समाजमान्य कपड्यांत, हाफ आणि क्वार्टर पॅन्टीत किंवा बिकीनीत काढलेले फोटो बिनधास्त फेसबुकवर शेअर केले जातात, त्यात कुणाला वावगं, अशिष्ट, अश्लील असं काहीच वाटत नाही. फेसबुकलाही वाटत नाही.

  July 21, 2017


साहित्य - ललित

कुत्रा – एक वेगळा विषय

Category:

 

मला कुत्रा या प्राण्याची फार ओढ. मलाच कशाला, आमच्या घरातील सर्वांनाच कुत्रा प्रिय. तसे सर्वच प्राणी आम्हाला आवडतात, परंतू मुंबईसारख्या शहरात त्यातल्या त्यात कुत्रा पाळणं सोयीचं, म्हणून कुत्रा एवढंच. मांजरही तशी छान वाटते, पण तिचा आपल्या विषयी पुरेसा विश्वास पटेपर्यंत ती काही आपल्या वाऱ्याला उभी राहात नाही.

  July 12, 2017


लेखसंग्रह

पेपरलेस कारभार – एक भ्रम

Category:

 

गेली काही वर्ष आपण पेपरलेसच्या गोष्टी ऐकतोय व त्याच्या गप्पाही मारतोय. संगणकीकरण, डिजीटलझेशन वैगेरेमुळे पेपर्स वापरण्याचं प्रमाण कमी होईल असं खरंच वाटत होतं. मलाही बरं वाटलं होतं. पर्यावरण, झाडं वैगेरे वाचतील हा विचार नंतरचा, पण ती कायतरी टायपलेल्या कागदांचं ओझं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं वाचेल म्हणून मला जास्त आनंद होत होता.

  July 11, 2017


लेखसंग्रह

अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ला; तेजोभंगाचा एक मार्ग

Category:

 

अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्यावरून मला, का कोण जाणे, पण यामिन उद्दौला अब्दुल कासिम महमूद इब्न सबुक्तगीन उर्फ गझनीच्या महमूदाने सोमनाथावर केलेल्या हल्ल्याची आठवण होते.

  July 11, 2017


लेखसंग्रह

मन कि बात – ओळख

Category:

 

नुकतेच दहावी-बारावीचे रिझल्ट लागले. दरवर्षी याच महिन्यात थोडेसे पुढं-मागे होऊन लागतात. निकाल पास अथवा नापास असाच लागणार असला, तरी उत्सुकता, हुरहूर, टेन्शन असं सारं काही होतंच. अर्थात मी सांगतोय ते पूर्वीचं, तेंव्हा पास-नापास येवढ्या दोनच कॅटेगरी असायच्या.

  July 11, 2017


लेखसंग्रह

मुंबईच्या एका ऐतिहासिक वारश्याचा निर्घृण खून

Category:

 

शनिवार दिनांक २४ जुन २०१७. मी एकूण ३० मुंबईप्रेमींना घेऊन माझी पहिलीच ‘मुंबई हेरीटेज टूर’ केली. सायनच्या प्राचिन शिवमंदीरापासून सुरु केलेली ही फेरी सायनचा किल्या, रस्त्यातले तिनशे वर्ष जुने माईलस्टोन, हाफकिन अर्थात जुनं राजभवन, भायखळ्याच भाऊ दाजी लाड म्युझियम व त्यातील पुतळ्यांचा इतिहास, फोर्ट सेंट जाॅर्ज व शेवटी मुंबईचा ऐतिहासिक फोर्ट विभाग पाहून समाप्त झाली.

  July 9, 2017


लेखसंग्रह

ती बाई

Category:

 

येता जाता रस्त्यावरच्या कुठल्याही कुत्र्या-मांजराच्या डोक्यावर हात फिरवून, त्याला एखादं बिस्कीट भरवणारा मी, एका जीवंत माणसाशी बोलायला का बिचकतो, हे माझं मलाच कळत नाही. कदाचित महसत्ता होऊ घातलेल्या देशाचा, पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याच्या विवंचनेत असलेला प्रतिष्ठीत नागरीक असणं, हे मला तसं करू देत नसावं, कुणास ठावूक?

  July 9, 2017