मादागास्कर
Category:
शहरे आणि गावेमादागास्कर हा पूर्व आफ्रिकेतील एक द्वीप-देश आहे. अंतानानारिव्हो ही मादागास्करची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हे जगातील सर्वात मोठ्या बेटांपैकी एक आहे. याच्या चारही बाजुंना हिंदी महासागर आहे.
March 13, 2019
Category:
शहरे आणि गावेमादागास्कर हा पूर्व आफ्रिकेतील एक द्वीप-देश आहे. अंतानानारिव्हो ही मादागास्करची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हे जगातील सर्वात मोठ्या बेटांपैकी एक आहे. याच्या चारही बाजुंना हिंदी महासागर आहे.
March 13, 2019
Category:
शहरे आणि गावेमोल्दोव्हा हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. मोल्दोव्हाच्या पश्चिमेला रोमेनिया तर पूर्व, उत्तर व दक्षिणेला युक्रेन हे देश आहेत. चिशिनाउ ही मोल्दोव्हाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. लेउ हे मोल्दोवाचे अधिकृत चलन आहे.
मध्य युगादरम्यान ओस्मानी साम्राज्याचा व १९व्या शतकापासून रशियन साम्राज्याचा भाग राहिलेला मोल्दोव्हा पहिल्या महायुद्धानंतर सोव्हियेत संघाचे एक प्रजासत्ताक होते. १९९१ सालच्या सोव्हियेत संघाच्या विघटनानंतर मोल्दोव्हाने स्वातंत्र्याची घोषणा केली. सध्या मोल्दोव्हा संयुक्त राष्ट्रे, युरोपाची परिषद, डब्ल्यू.टी.ओ., स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ इत्यादी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. मोल्दोव्हाला अद्याप युरोपियन संघामध्ये प्रवेश मिळालेला नाही.
March 13, 2019
Category:
शहरे आणि गावेमोनॅको हा युरोपातील एक नगर-देश आहे. मोनॅको आकाराने जगातील दुसरा सर्वात लहान सार्वभौम देश आहे (सर्वात लहान देश: व्हॅटिकन सिटी). मोनॅकोच्या पूर्वेला भूमध्य समुद्र तर इतर तीन दिशांना फ्रान्स हा देश आहे तर मोनॅकोपासून इटली देशाची सीमा केवळ १६ किमी अंतरावर आहे. मोनॅकोमध्ये राजेशाही सरकार आहे. आल्बर्ट दुसरा हा मोनॅकोचा राजकुमार व सत्ताप्रमुख आहे.
March 13, 2019
Category:
शहरे आणि गावेमोझांबिक हा आग्नेय आफ्रिकेतील एक देश आहे. मोझांबिकचा शोध वास्को दा गामाने १४९८ साली लावला व १५०५ मध्ये पोर्तुगीजांनी तेथे आपली वसाहत स्थापन केली.
March 12, 2019
Category:
शहरे आणि गावेम्यानमार हा आग्नेय आशियातील एक देश आहे. ६,७६,५७८ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने आग्नेय आशियातील सर्वांत मोठा देश आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास ६ कोटी असून लोकसंख्येच्या बाबतीत याचा जगात २४ वा क्रमांक आहे. या देशाच्या ईशान्येस चीन, पूर्वेस लाओस, आग्नेयेस थायलंड, पश्चिमेस बांग्लादेश, वायव्येस भारत हे देश असून नैऋत्येस बंगालचा उपसागर आहे. येथील बहुसंख्य जनता बौद्ध धर्मीय आहे. म्यानमारला एकूण परीघाच्या एक तृतीयांश – म्हणजे १,९३० कि.मी. – लांबीची मोठी किनारपट्टी लाभली आहे. पेट्रोलियम, शिसे, जस्त, तांबे, टंगस्टन ही येथील प्रमुख खनिजे आहेत.
March 12, 2019
Category:
शहरे आणि गावेमालीचे प्रजासत्ताक हा आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागातील एक देश आहे. मालीच्या उत्तरेला अल्जीरिया, पूर्वेला सुदान, दक्षिणेला बर्किना फासो व कोत द’ईवोआर, आग्नेयेला गिनी तर पश्चिमेला सेनेगाल व मॉरिटानिया हे देश आहेत. १२,४०,१९२ चौरस किमी क्षेत्रफळ असणाऱ्या मालीची लोकसंख्या सुमारे १.४५ कोटी आहे. बामाको ही मालीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मालीमधील बहुतांशी लोकवस्ती दक्षिण भागात नायजर व सेनेगाल नद्यांच्या काठावर वसलेली आहे. मालीचा उत्तर भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे
March 12, 2019
Category:
शहरे आणि गावेमाल्टाचे प्रजासत्ताक हा दक्षिण युरोपातील एक छोटा द्वीप-देश आहे. माल्टा भूमध्य समुद्रामधील एका द्वीपसमूहावर वसला असून तो इटलीच्या सिसिलीच्या ८० किमी (५० मैल) दक्षिणेस, ट्युनिसियाच्या २८४ किमी (१७६ मैल) पूर्वेस, व लिबियाच्या ३३३ किमी (२०७ मैल) उत्तरेस स्थित आहे. माल्टाचे क्षेत्रफळ केवळ ३१६ चौ. किमी (१२२ चौ. मैल), तर लोकसंख्या सुमारे ४.५ लाख असून माल्टा जगातील सर्वात लहान व सर्वात घनदाट लोकवस्तीच्या देशांपैकी एक आहे. व्हॅलेटा ही माल्टाची राजधानी असून ती युरोपियन संघामधील सर्वात लहान राष्ट्रीय राजधानी आहे. माल्टी व इंग्लिश ह्या दोन माल्टामधील राजकीय भाषा आहेत.
March 12, 2019
Category:
शहरे आणि गावेमार्शल द्वीपसमूह हा प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे.
March 11, 2019
Category:
शहरे आणि गावेमॉरिटानिया हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे.
March 11, 2019
Category:
शहरे आणि गावेमाँटेनिग्रो हा बाल्कन प्रदेशातील एक देश आहे. माँटेनिग्रोच्या उत्तरेला व वायव्येला बोस्निया आणि हर्झगोव्हिना, ईशान्येला सर्बिया, पूर्वेला कोसोव्हो, दक्षिणेला आल्बेनिया तर पश्चिमेला क्रोएशिया हे देश व नैऋत्येला एड्रियाटिक समुद्र आहेत. पॉडगोरिका ही माँटेनिग्रोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
March 11, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti