व्यक्ती-परिचय

अजित प्रधान

Category:

 

अजित प्रधानांकडे प्रामुख्याने १९८०पर्यंतच्या हिंदी चित्रपट संगीताचा संग्रह आहे. शंकर-जयकिशन आणि ओ. पी. नय्यर या दोन संगीतकारांचं जवळजवळ सगळं कलेक्शन त्यांच्याकडे आहे. त्याशिवाय सी. रामचंद्र, एस. डी. बर्मन आणि त्या काळातल्या बहुतेक सगळ्या संगीतकारांच्या रेकॉर्ड्स त्यांच्या खजिन्यात आहेत.

  January 31, 2022


व्यक्ती-परिचय

उत्तम बंडू तुपे

Category:

 

आपल्या साहित्यातून उपेक्षित आणि ग्रामीण जीवनाचे चित्र करणारे ज्येष्ठ साहित्यिक व झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांची ‘झुलवा’ ही कादंबरी प्रचंड गाजली. तेव्हापासून ते ‘झुलवा’कार म्हणूनच ओळखले जाऊ लागले.

  January 31, 2022


लेखसंग्रह

नट, भाषा आणि गैरसमज

Category:

 

नटाला भाषेची ओळख असणे, जाण असणे तितकेच महत्वाचे आहे पण ते अभिनय करत असताना इतर दैनंदिन जीवनात भाषेचे स्वातंत्र्य ठेवता आले पाहिजे आणि त्याचबरोबर अभिनय करत असताना आपले पात्र काय आहे? त्या पात्राची काय भाषा आहे? याचा अभ्यास करणे हे महत्वाचे आद्यकर्तव्य आहे.

  January 27, 2022


साहित्य - ललित

नाट्य तपस्वी मामा पेंडसे

Category:

 

१९२९ ते १९६९ अशी सलग ४० वर्षे मामांची रंगयात्रा व्यावसायिक रंगभूमीवर अव्याहत सुरू होती. या यात्रेमध्ये ‘आग्र्याहून सुटका’, ‘बेबंदशाही’, ‘तोतयाचे बंड’, ‘सवाई माधवरावाचा मृत्यु’, ‘भाऊबंदकी’, ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘खडाष्टक’, ‘एक होता म्हातारा’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘स्वामिनी’, ‘सन्यस्त खङ्ग’, ‘देव नाही देव्हाऱयात’, ‘सत्तेचे गुलाम’, ‘स्वर जुळता गीत तुटे’, ‘आंधळ्यांची शाळा’, ‘लोकांचा राजा’, ‘कुलवधू’, ‘महापूर’, ‘नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ इत्यादी पन्नासएक नाटकांमधून मामांनी आपल्या लक्षवेधी अभिनयाचे दर्शन प्रेक्षकांना घडवले.

  January 26, 2022


साहित्य - ललित

ठाण्याची रंगपरंपरा

Category:

 

आज महाराष्ट्राच्या सह-सांस्कृतिक राजधानीचा मान मिरवणाऱया ठाणे शहराचा साधारणत सातव्या शतकापासून लिखित इतिहास आढळतो. या इतिहासात डोकावल्यावर लक्षात येते की, इतिहासकाळात ठाणे हे वैभवाच्या शिखरावर असलेलं, भरभराटीस आलेलं, व्यापारी उलाढालींचे आणि राजकीय हालचालींचे केंद्र असलेलं संपन्न नगर होतं. नाटकाच्या संदर्भातील पहिली नोंद मिळते ती रावबहादूर भास्कर दामोदर पाळंदे यांच्या संदर्भातील. ऑफिशिएटिंग मराठी ट्रान्सलेटर म्हणून सरकार दरबारी काम पाहिलेले पाळंदे साहित्यिक होते.  ‘गीत सुधा’ आणि ‘रत्नमाला’ हे ग्रंथ त्यांनी लिहिले होते. मुख्य म्हणजे ‘विक्रमोर्वशिय’ या संस्कृत नाटकाचे त्यांनी मराठीत गद्य पद्यात्मक भाषांतर केले होते.  तिथून ठाण्याची नाट्यपरंपरा उगम पावली, असं म्हणता येईल.

  January 17, 2022


लेखसंग्रह

काशी विश्वनाथ धाम

Category:

 

काशी विश्वनाथ धाम हे भारतीय संस्कृती आणि श्रद्धा यांचा सर्वात जुना आणि महान केंद्रबिंदू आहे. आज ते गेल्या तीन हजार वर्षातील सर्वात मोठे आणि भव्य स्वरूप अनुभवत आहे. 250 वर्षांपूर्वी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिरोे नूतनीकरण केले. त्यानंतरचे हे सर्वात मोठे नूतनीकरण आहे.

  December 14, 2021


व्यक्ती-परिचय

पं. तुळशीदास बोरकर

Category:

 

पं.तुळशीदास बोरकर उर्फ बोरकर गुरुजी संवादिनी (हार्मोनियम) वादन क्षेत्रातील ऋषितुल्य नाव. आज घडीला संवादिनी अर्थात पेटीवर प्रभुत्व असणारी जी काही मान्यवर मंडळी आहेत त्यातील हे अग्रगण्य नाव होते.

  November 27, 2021